तिकडं अफगाणिस्तानात लोकं भूकमारीनं मरत असताना अमेरिकेने त्यांचे ३.५ बिलियन डॉलर चोरलेत

अफगाणिस्तानातील परिस्तिथी तालिबानच्या येण्यानं अजूनच बिघडली आहे. तालिबानमुळे सुलतानी संकटात अडकलेल्या अफगाणी लोकांना आता भूकमारीच्या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

WFP च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की अफगाण लोकसंख्येच्या ९८% लोकसंख्येला खायला पुरेसे अन्न नाही आहे. 

इतक्या दिवस बाहेरील मदतीवर अफगाणीस्तान तग धरून होतं मात्र तालिबान सत्तेवर आल्यानंतर आता तीही आटली आहे. त्यामुळं अफगानी लोकांना आता तातडीनं मदतीची गरज आहे. आणि अशातच अमेरिकेने अशी काय हरकती केल्यात त्यामुळं आता अमेरिकेवर जगभरात थू थू होतंय.

ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा, अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेने न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह शाखेत $7 अब्जांपेक्षा जास्त ठेवी ठेवल्या होत्या. 

अफगाणिस्तानची परिस्थिती सतत बिघडत चालली असताना, बिडेन प्रशासन त्या गोठवलेल्या निधीचे काय करेल हा विचित्र प्रश्न कायम होता. तालिबानला नवीन राज्यकर्ते म्हणून ओळखल्याशिवाय, त्या निधीचे अमेरिका काय करू शकते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

या प्रश्नांना आता उत्तर मिळालंय. व्हाईट हाऊसने “अफगाणिस्तान सेंट्रल बँकची काही मालमत्ताअफगाणिस्तानच्या लोकांसाठी ठेवण्याचा  ” कार्यकारी आदेश काढला आहे.

 या ऑर्डरनुसार $३.५ अब्ज  संपत्तीचा वापर अफगाण लोकांच्या फायद्यासाठी करण्यात येइल असं बायडन प्रशासन म्हणतंय. पण हि अर्धीच स्टोरी आहे. अफगाणिस्तान सेंट्रल बँकेच्या उरलेल्या $७ अब्जपैकी उरलेल्या ३.५ अब्ज डॉलर्ससाठी अमेरिकेचा वेगळाच प्लॅन आहे. अमेरिकेचं  फेडरल सरकार ९/११ च्या पीडितांना भरपाई देण्यासाठी या उरलेल्या मालमत्तेचा वापर करेल.

आता तालिबानचं अफगाणिस्तानात सरकार असल्यानं त्यांच्याकडून ९/११ची भरपाई घ्यावी अशी मागणी अमेरिकेतले काही ग्रुप करत होते. 

आणी जो बायडननं पण त्यांचं ऐकत अशी ऑर्डर काढली आहे. त्यामुळं ज्या अफगाणी लोकांना जेव्हा मदतीची अत्यंत जास्त गरज आहे तेव्हाच हा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेने जे बिलियन डॉलर खर्च करून अफगाणिस्तानवर युद्ध लादलं त्या पैश्यातून ९/११ मधल्या मृतांना आणि जखमींना मदत करता आली असती.  

मात्र अमेरिकेने तसं ना करता ऐन गरजेच्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानला खिंडीत पकडलंय

आता अफगाणिस्तानला यामुळं शॉर्ट टर्म साठी थोडा फंड मिळेल मात्र त्याचबरोबर अमेरीकेने पाकीटमार केलीय हे ही तेव्हडंच खरं आहे. तसेच बाकीचे देश ज्यांनी मोठ्या प्रमाणात डॉलर अमेरिकेच्या बँकेत ठेवले आहेत त्यांनाही ही धडा आहे की अमेरिका कशी ऐन टाईमला धोका देऊ शकतेय. त्यामुळं अमेरिकेने जे अफगाणिस्तानचे ३.५ बिलियन डॉलर चोरलेत ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे.

हे ही वाच भिडू :

   

 

Leave A Reply

Your email address will not be published.