टँकरच्या व्यवसायावर नगरची कल्याणी महिन्याला २ लाख रुपये कमावतेय

कुठलाही देश विकसित आहे असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा तिथल्या प्रत्येक महिला आणि पुरुष दोघांना जगण्याचा, शिक्षणाचा, नोकरी आणि व्यवसायाचा समान अधिकार मिळतो. आज भारत सुद्धा या विकसित होणाऱ्या देशांकडे वाटचाल करतोय. पुरुष-महिला समानता या टार्गेटपर्यंत  बऱ्यापैकी पोहोचलेला दिसत आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेतायेत, नोकरी करतायेत अगदी स्वतः चा व्यवसाय सुद्धा.  

पण नाही म्हंटल तरी, अजुनही अशी बरीच क्षेत्र आहेत, जे आजही पुरुषी क्षेत्र म्हणून पाहिलं जात. खासकरून गाडी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय.  म्हणजे एखादी महिला गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतेय अशी बरीच उदाहरण आपण पहिली असतील. पण एखाद्या महिलेचा ट्रान्सपोर्टच्या गाडीचा स्वतःचा व्यवसाय हे गणित जरा न पटणार वाटतं. कारण या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात पुरूषांचीच पकड जास्त पाहायला मिळते. पण ही लाईन मोडून काढत आणि आपल्या पुढच्या सगळ्या अडचणींना फेल ठरवत अहमदनगर मधल्या एका कल्याणीने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु करून स्वतःची वगेळी आणि हटके ओळख निर्माण करलीये.  

अहमदनगर जिल्यातील रामवाडी या झोपडपट्टी भागात राहणारी कल्याणी हिवाळे. मूळ गाव मिरजगाव पण सध्या राहायचं ठिकाण पुण्यातलं भूगाव. घरची परिस्थती तशी सामान्यचं होती. आई, वडील, तीन बहिणी एक भाऊ असा एकूण परिवार. सगळ्याच भावंडांचं शिक्षण सुरु असल्यानं घरची आर्थिक जबाबदारी सगळी वडिलांवर. 

पण २०१७ ला कल्याणीच्या वडिलांचा रोड ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे चार मुलांचं शिक्षण आणि घर खर्च एकट्या आईवर आला. यात कल्याणी सगळ्या भावंडांमध्ये मोठी होती. आपल्यामागे आजून बाकीच्याचं शिक्षण राहिलयं. या विचारानं कल्याणीने शिक्षण घेता घेता नोकरी करायची ठरवली. 

बोल भिडूशी बोलताना कल्याणीने सांगितल कि, 

घराला हातभार लावण्यासाठी मी स्नेहालय या संस्थेबरोबर काम करायला लागले. तिथं बालभवन मधल्या विद्यार्थ्यांना मी शिकवायचे. याचं पगारातून स्वतः शिक्षण सुद्धा घेतलं आणि घरचा खर्च सुद्धा उचलला. नोकरी करता करताचं आधी बी. एस्सी केलं, मग बी.कॉम आणि पुढे एमबीए पूर्ण केलं. 

एवढं शिक्षण घेतल्यावर कल्याणीला चांगली नोकरी मिळणार हे सहाजिकचं होत. पण कल्याणीला फक्त नोकरी करून गरजेपुरतं पैसे कमवायचे नव्हतं, तिला व्यवसाय करायचा होता. जेणेकरून ती आपल्याला घरच्यांना सुद्धा सांभाळू शकेल. 

कल्याणी सांगते, ‘डिक्की (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) ही एक सामाजिक संस्था आहे, जी महिलांना आत्मनिर्भर बनवन्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. संस्ठेचा दरवर्षी महिला दिनानिमित्त कार्यक्रम करत असतो. असचं २०१८ च्या महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाने मी सहभागी झाले होते. तिथे बऱ्याच महिला उद्योजिका मार्गदर्शनासाठी आल्या होत्या. 

तेव्हा मी कॉलेज स्टुडंटचं होते. मला याबाबत जास्त काही माहित नव्हतं. मी पहिल्यांदाच अप्रोच झाले होते. मला व्यवसाय तर करायचा होता, पण कोणता करावा याबाबत काहीच कल्पना नव्हती. पण तिथे गेल्यावर बऱ्याच गोष्टी समजल्या. भारतात फक्त १४ टक्केचं महिला व्यावसायिक आहेत, हे ऐकल्यावर जरा आश्चर्य वाटलं.

तेव्हा या संस्थेच्या माध्यमांतूनच ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी काही टेंडर काढलं गेले. कल्याणी सांगते, घरच्यांनी सुद्धा तिला यासाठी सपोर्ट केला. तिला या व्यवसायाबद्दल काहीच माहित नव्हतं. त्यामुळे अगदी बेसिक पासून सुरुवात केली. म्हणजे टेंडर भरण्यापासून ते टँकर कसा असतो, त्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाबद्दल एकून सगळंच. त्यात तब्बल ५ ते ६ हजार जणांनी टेंडर भरलेलं ज्यातून जवळप ३०० टेंडर पास झाले, त्यातली एक कल्याणी होती. 

शेवटी कल्याणी या व्यवसायात घुसली आणि एक-एक करून गोष्टी उलगडत गेल्या. मुळात पुरुषी असणारा हा व्यवसाय एक महिला सांभाळते म्हंटल्यावर अडचणी बऱ्याच होत्या. टँकरला ड्रायव्हर शोधण्यापासून कंपन्यांसोबत डील करण्यापर्यंत. एखादी महिला पुरुषांच्या हाताखाली काम करू शकते, पण पूरूष महिलेच्या हाताखाली काम करायला आजही बिचकतात. त्यात सुद्धा अशा गाड्यांच्या व्यवसायात मॅनेजमेंट हे पुरुषांच्याचं हातात असत. 

 कल्याणीच्या म्हणण्यानुसार, मला या व्यवसायात मोठी संधी दिसली. ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट शिकायला वेळ लागला पण शेवटी शिकले. असं म्हणतात ना माणूस एखाद्या गोष्टीत घुसला कि, हातपाय मारायला लागतो. तसचं माझ्याबाबतीत झालं आणि मी या व्यवसायात उतरले. 

पण अडचण अशी कि या व्यवसायासाठी गुंतवणुकीची गरज तर होती, मी तेव्हा विद्यार्थिनी असल्यामुळं एवढं मोठं लोन मिळणं जरा अवघड होत. तेव्हा भारत सरकारच्या स्टॅन्डअप इंडिया या स्कीमचा मला फायदा आणि या स्कीममधून मला ४५ लाखांचं लोन मिळालं.  लोन मिळाल्यानांतर मी लगेच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. 

वडिलांच्या नावानेच ‘यशवंत लॉजिस्टिक्स’ सुरु केलं. यासाठी कल्याणीने स्वतःचा टँकर सुद्धा विकत घेतला आणि भारत गॅससोबत टायअप केलं. आज अख्ख्या महाराष्ट्रात तिचा टँकर एलपीजी गॅस प्रोव्हाइड करतो. या व्यवसायातून आज कल्याणी महिना १.५० ते २ लाख रुपये कमावतेय. ज्यामुळे घर चालवण्याबरोबर ती आपल्या लहान भावा – बहिणीचं शिक्षण सुद्धा करतेय. 

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.