एका जाहिरातींमुळं आमिर खानचे दिवाळीच्या आधीचं फटाके फुटलेत

जाहिरात आणि त्यावरून  निर्माण झालेला वाद काही नवीन नाही. एखादी जाहिरात धार्मिक, किंवा सामाजिक नियमांच्या जरा हटके असेल किंवा त्यात कोणाला काही चूक सापडली तर ती जाहिरात, कंपनी, ब्रँड अँबेसेडर सगळेच ट्रोल होतात. कधी कधी तर हा वाद डायरेक्ट कोर्टात सुद्धा जातो.

नुकताच फॅब इंडियाची दिवाळीच्या निमित्तानं काढलेली जाहिरात ट्रोल झाली. ‘जश्न-ए-रिवाज’ अश्या टायटलने ही जाहिरात लॉन्च करण्यात आली होती. पण वाद सुरु झाला तो या नावामुळेचं. ट्रोलर्सकडून म्हंटल गेलं कि, उर्दू नावाचा वापर करून हिंदूंच्या सणांचा अपमान केला जातोय. ज्यानंतर अर्थातच वाद सुरूच आहे.

आता त्यात आणखी एक नवा वाद सुरु झालाय. ज्यामुळे फिल्मस्टार परफेक्शनिस्ट आमीर खान सोशल मीडियावर ट्रोल होतोय. दिवाळी निमित्त लॉन्च झालेल्या आपल्या नवीन जाहिरातीमुळे कंपनीसोबतच आमिरला सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 

वास्तविक, आमिर खानने CEAT टायर कंपनीची जाहिरात केली आहे. दिवाळीच्या थीमवर ही जाहिरात आहे. ज्यामध्ये आमिर खान फटाके रस्त्यावर  न फोडण्याचा सल्ला देतोय. पण सोबतच तो असेही म्हणतोय कि, फटाके फोडायचे असतील तर आपल्या सोसायटीत फोडा. कारण रोड हा गाडी चालवण्यासाठी आहे, फटाके फोडण्यासाठी नाही.

आता रस्त्यावर फटाके फोडायचे नाही, या आमिरच्या वाक्यामुळे हा वाद सुरु झालाय. ट्रोलर्सच्या म्हणण्यानुसार हा हिंदूंचा आणि त्यांच्या सणांचा अपमान आहे. यावरून सोशल मीडियावर  #AamirKhan, #Shameonceattyres आणि #boycottceattyres असे हॅशटॅग ट्रेंड होतायेत.

आता त्याआधी सिएट टायरची ही जाहिरात एकदा पहाचं.

 

या जाहिरातींवरून सोशल मीडियावर तर वाद सुरूच आहे, मात्र त्यात आता कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे उडी घेतलीये. हेगडे यांनी आमिर खानच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

उत्तरा कन्नड मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या जाहिरातीविरुद्ध डायरेक्ट टायर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वर्धन गोयंका यांना पत्र लिहिले. त्यांनी पत्रात लिहिले की,

‘तुमच्या कंपनीची अलीकडील जाहिरात, ज्यात आमिर खान लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देतात, हा एक चांगला संदेश आहे. सार्वजनिक समस्यांकडे कंपनीचे विशेष लक्ष कौतुकास्पद आहे परंतु रस्त्यांवर फटाके फोडण्याबद्दल जागरूकता पसरवण्याबरोबरच शुक्रवारी आणि इतर महत्त्वाच्या दिवशी नमाजच्या नावाने मुस्लिम समुदायाकडून रस्ता अडवण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.”

हेगडे पूढे म्हणतात, ‘हे चित्र अनेक शहरांमध्ये अगदी कॉमन झालाय. जिथे मुस्लिम नमाज पढण्याच्या नावाखाली रस्ते अडवतात. त्या वेळी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहनेही वाहतुकीमध्ये अडकतात, ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, रस्त्यावरच्या लोकांना येणारी आणखी एक समस्या सोडवा. जुमा आणि दिगरसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी नमाजच्या नावाने रस्ते बंद करू नका असे मुस्लिम समुदायाला सांगा.’

‘तुम्ही सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल उत्सुक आणि संवेदनशील असल्याने आणि तुम्हीही हिंदू समाजातील आहात. मला विश्वास आहे की,तुम्ही हिंदूंसोबत शतकानुशतके होत असलेल्या भेदभावाबद्दल जागरूक असाल. हिंदूविरोधी कलावंतांचा एक गट नेहमी हिंदूंच्या भावना दुखावतो, आणि ते कधीही त्यांच्या समाजाच्या चुकीच्या गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न करत नाहीत.’ असही हेगडे यांनी आपल्या पात्रात म्हंटलं. 

अनंतकुमार हेगडे एवढ्यावरचं थांबले नाहीत त्यांनी टायर कंपनीला जाहिरातीवर लिहिले की,

‘आशा आहे की येत्या काही दिवसांत कंपनी हिंदूंच्या भावनांचा आदर करेल आणि त्यांना दुखावणार नाही’.

हेगडे यांनी या पत्रात मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावून मुस्लीम समाज अजान देतात याकडेही  कंपनीचे लक्ष वेधले. यामुळे ध्वनी प्रदूषण होते. आणि जुम्म्याच्या वेळी तर तो आवाज आणखीचं वाढतो, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होतो.

hhed

आता हेगडेंच्या या पत्रानंतर सोशल मीडियावर सुद्धा त्यासंबंधित फोटो व्हायरल व्हायला लागलेत. ज्यात मुस्लिम समुदाय रस्त्यावर नमाज पठण करताना दिसत आहे. 

अमीर खान सोबतच कंपनीतर ट्रोल होतंच आहे. सोबतच हर्ष गोयंका यांनाही ट्रॉल केलं जातंय. त्यांचे हिंदू विरोधी काही जुने ट्विट रिट्विट करून गोयंका यांना ट्रोल केलं जातंय. हर्ष गोयंका नेहमीचं हिंदू विरुद्ध आहेत, असं बोललं जातंय. 

आता तसं पाहिलं तर आमिर खान याआधीही वादात सापडलाय. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात सांगितले होते की, त्यांची पत्नी किरण भारतात राहण्यास घाबरते. ज्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.