अमित शहांनी १५ वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. नंतर माहिती झालं, उपमुख्यमंत्री करण्यासाठी फोन करत होते.

अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही. पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित शहांचा फोन उचलला नाही.

तर किस्सा असा झाला की जम्मू काश्मिरचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता यांनी हा किस्सा जम्मूच्या सहगल हॉल येथे पत्रकारांनी बोलताना सांगितला.

ते म्हणाले, “मी फोन चार्जिंगला लावून निवांत बसलो होतो. फोन चार्जिंग झाला का हे पहायला मी फोन पाहिला तेव्हा त्यावर पंधरा मिस्डकॉल आले होते. माझ्याकडे तो नंबर सेव्ह नव्हता. इतके फोन कोणी केले म्हणून मी त्या नंबरवर फोन केला. रिंग वाजली आणि पलिकडून उत्तर आलं, “ आपणाला जम्मू काश्मिरचं उपमुख्यमंत्री करण्यात येत आहे.” इतकं सांगून तो फोन कट झाला.”

हिकडे कविंद्र गुप्ता टेन्शनमध्ये आले. बातमी कोणी दिली म्हणून त्यांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला तेव्हा उत्तर आलं, “ मैं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहां बोल रहां हू” पुन्हा लगेच फोन कट करण्यात आला.

या सर्वात चांगली गोष्ट अशी कि, इतकं कांड होवून देखील कविंद्रंना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.