लालू यादव चारा खातात हे उघड करणारे खरे आता मोदींच्या सल्लागार पदी निवडले गेलेत…

प्रधानमंत्री कार्यालयात पंत्रप्रधानांना सल्ला देण्यासाठी पंतप्रधान एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींची, अधिकाऱ्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करत असतात.

2019 मध्ये मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर दोन वर्षांतच तीन सल्लागारांनी वेळेआधीच एक्झिट घेतली होती. अमरजित सिन्हा हे मोदींचे सामाजिक क्षेत्रात काम केलेले सल्लागार होते. ते आयएएस अधिकारी आहेत.त्यांचा  दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास  सात महिन्यांचा कालावाधी शिल्लक असताना त्यांनी वेळेआधीच राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

मोदींनी नवीन सल्लागार नेमले आहेत. त्यांनी सल्लागारपदी अमित खरे  यांची नियुक्ती केली आहे.हा  प्रत्येक मराठी माणसासाठी  अभिमानाची गोष्ट आहे.

आधी आपण अमित खरे कोण आहेत हे आधी जाणून घेऊ… त्यानंतर त्यांच्याबद्दल एक भन्नाट किस्सा जाणून घेणार आहोत.

अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे यांचा जन्म हा नागपूर चा.अमित खरे हे १९८५ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ही नियुक्ती करारावर केली जाते. अमित खरे हे ३० सप्टेंबरला सचिव (उच्च शिक्षण) पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाचे नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ला मंजुरी दिली होती.

अमित खरे यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य आणि विविध क्षेत्रातील व्यापक अनुभवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्राच्या त्यांनी उज्ज्वला योजनेतही योगदान दिले. त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागात सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढील काही महिन्यांत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ला २९ जुलै २०२० ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

पण तुम्हाला माहितीये का कि लालू प्रसाद यांना जेल ची हवा खायला घालणारे हे सुद्धा अमित खरेच होते. त्यांनीच चारा घोटाळा उघडकीस आणला होता.

अमित खरे यांच्या मोठ्या यशामध्ये चारा घोटाळ्याचा खुलासा सामील आहे. त्यांनी प्रथम चायबासाचे जिल्हा अधिकारी असताना सरकारी निधीच्या अपव्ययाशी संबंधित हे प्रकरण पकडले होते.

खरे यांची नियुक्ती जेव्हा चाईबासा इथं उपायुक्त म्हणून कऱण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी या घोटाळ्याबद्दल खुलासा केला होता. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसं लालूप्रसाद यांच्यावरचे आरोप अधिक पक्के होत गेले आणि अखेर त्यांना जेलची हवा खावीच लागली. 1996 मध्ये त्यांनी या प्रकरणात पहिल्या प्रकरणाची नोंदणी करण्याचे आदेश दिले.

चायबासा (झारखंड) मध्ये बनावट पैशांचा भांडाफोड झाल्यानंतर बिहार पोलिसांनी (त्या दिवसांमध्ये झारखंड बिहारचा भाग होता) गुमला, रांची, पाटणा, डोरंडा आणि लोहरदगा या तिजोरीतून कोट्यवधी रुपये बनावट बिलाद्वारे काढण्याचे गुन्हे दाखल केले.झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता त्यानंतर राजद सुप्रीमो लालू यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री असलेले जगन्नाथ मिश्रा यांना या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला.

अमित खरे यांनी प्रामाणिकपणे तपास करून चारा घोटाळा उघडकीस आणला. ते कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी  पडले नाहीत.

तुम्हाला लालू प्रसाद यांना या प्रकरणात झालेली शिक्षा ऐकून तुम्हाला धक्काच बसेल..

लालूंना भारतीय दंडविधानांतर्गत सात वर्षांची व भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत सात वर्षांची शिक्षा सुनावली. म्हणजेच, त्यांना १४ वर्षांसाठी तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच प्रकरणात आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली होती.

चारा घोटाळ्यात एकूण पाच प्रकरणांचा समावेश आहे. त्यातील तीन प्रकरणांत आधीच लालूंना शिक्षा सुनावण्यात आली होती. चाईबासा कोषागारच्या दोन प्रकरणांत दहा तर, देवघर कोषागारातून बेकायदेशीररित्या पैसे काढल्याप्रकरणी साडेतीन वर्षांची अशी एकूण साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली आहे. नंतर सुनावण्यात आलेल्या १४ वर्षांच्या शिक्षेमुळं त्यांना एकूण साडेसत्तावीस वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत.

अमित खरे यांचा बिहार झारखंड मधील हा जिगरबाज प्रवास इथेच थांबत नाही..

झारखंडमध्ये जादूटोणा करण्याची प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये अमित खरे यांचे नाव प्रथम येते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी जादूटोणा विरोधात सामाजिक जागरूकता मोहीम सुरू केली. यामुळे राष्ट्रीय स्तरावर जादूटोणा विरोधात चर्चा सुरू झाली. पाटणा दरभंगाचे जिल्हा दंडाधिकारी होते आणि त्यांनी बिहारमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षा आयोजित करून गुणवत्ता घोटाळा रोखला.

लालू प्रसाद यादव सारखा मोठ्या नेत्याविरुद्ध आरोप सिद्ध करायला जिगर लागते. आणि हे जिगर दाखवलं होत अमित खरे ह्या मराठी माणसाने…त्यांची पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नेमणूक झाली हि त्यांच्या कर्तृत्वात भर घालणारी असेल एवढं मात्र नक्की 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.