अमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री करणार होते.
अमित शहांचा फोन येतो आणि चक्र फिरतात. पण अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही.
पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित शहांचा फोन उचलला नव्हता..
हे धाडस जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता यांनी केलं होतं.
फक्त हे धाडस म्हणता येणार नाही कारण त्यांना माहितच नव्हतं अमित शहांचा फोन येतोय आणि तो देखील उपमुख्यमंत्री करण्यासाठी.
जम्मू काश्मिरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद गुप्ता यांनी जम्मूच्या सहगल हॉलमध्ये पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांना हा किस्सा सांगितला होता.
ते म्हणाले होते,
“मी फोन चार्जिंगला लावून निवांत बसलो होतो. फोन चार्जिंग झाला का हे पहायला मी फोन पाहिला तेव्हा त्यावर पंधरा मिस्डकॉल आले होते. माझ्याकडे तो नंबर सेव्ह नव्हता. इतके फोन कोणी केले म्हणून मी त्या नंबरवर फोन केला.
रिंग वाजली आणि पलिकडून उत्तर आलं,
“आपणाला जम्मू काश्मिरचं उपमुख्यमंत्री करण्यात येत आहे.”
इतकं सांगून तो फोन कट झाला.
हिकडे कविंद्र गुप्ता टेन्शनमध्ये आले. बातमी कोणी दिली म्हणून त्यांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला तेव्हा उत्तर आलं,
“ मैं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोल रहां हू”
पुन्हा लगेच फोन कट करण्यात आला.
या सर्वात चांगली गोष्ट अशी कि, इतकं कांड होवून देखील कविंद्रंना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यावर अमितभाई शहा ठाम राहिले.
हे ही वाच भिडू.
- पटेल आणि शहांच्या भांडणात पहिल्यांदा लोकशाहीचा फायदा झाला आहे !
- राजे महाराजे राजकारणी यांच्या BCCI वर दादा.
- दिल्लीचा रंगीला बादशहा, ज्याने फक्त स्वत:चे नग्न पेंटिंग काढून घेण्यातच धन्यता मानली.