असाच वाद सुरू झाला, अमित शहांना धोबीपछाड देत अहमद पटेलांनी रात्री 3 वाजता फटाके फोडले.. 

पाच वाजता मतमोजणी सूरू होईल. तासा दिड तासात मतदानमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पार्टी होईल. कोणीही जिंकलं तरी हमारी पावरी हो रही हैं म्हणून आम्हाला स्टेटस टाकता येईल. 

सगळं कसं व्यवस्थित ठरवलेलं.

पण भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला आणि मतमोजणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. तर झालं अस की राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांना दाखवली तर कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आपली पतपत्रिका पटोलेंच्या हाती दिली. सोबतच सुहास कांदे यांनी भाजपच्या नेत्यांना मतपत्रिका दाखवण्यात आली.

असा दावा करत भाजपने ही मते बाद करावीत असा आक्षेप घेतला.. 

दूसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर देखील कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. आत्ता या सर्व घडामोडी केंद्रिय निवडणूक आयोगाच्या दरबारात गेलेल्या असून तिथे ही मते बाद करावीत की नाहीत याबद्दल निर्णय होईल व पुन्हा मतदानमोजणीस सुरवात होईल.. 

पण अशा राड्यातला सर्वात भारी किस्सा आहे तो अमित शहा विरुद्ध अहमद पटेल यांचा.

अमित शहा म्हणजे चाणक्य. पण या चाणक्यनितीला धोबीपछाड दिलेला तो अहमद पटेल यांनी..

2017 सालचा किस्सा.. 

या काळात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी दोन जागांवर भाजपच्या जागा निवडणूक येणार होत्या. तिसऱ्या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येवू शकत होता. या तिसऱ्या जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार होते अहमद पटेल.. 

मात्र याची सुरवात राज्यसभेच्या निवडणूकी अगोदरच झाली होती. कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेस सोडली होती. त्यांच्या सोबत दोन कॉंग्रेस आमदारांनी देखील राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या दोन दिवसातच अजून तीन कॉंग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. 

अशातच राज्यसभेच्या निवडणूका लागल्या होत्या. कॉंग्रेसला तिसऱ्या जागेवर विजयी होण्यासाठी 45 मतांची आवश्यकता होती.. 

कॉंग्रेसकडून होते अहमद पटेल. आत्ता या पिक्चरमध्ये एन्ट्री घेतली ती अमित शहा यांनी. कॉंग्रेसच्या चाणक्याला धोबीपछाड द्यायचा म्हणून अमित शहा गुजरातमध्ये आले. त्यांनी फिल्डिंग लावायला सुरवात केली. 

भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी बलवंत राजपूत यांना उतरवण्यात आलं. हे जूने कॉंग्रेसीच होते. आधीच काठावर आलेली संख्या त्यात जूनाच कॉंग्रेसी भाजपकडून उतरवल्याने क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता होती.  अशातच जेडीयू आणि NCP ने देखील कॉंग्रेसचा पाठींबा काढून घेतला. कॉंग्रेसने रिसॉर्ट पॉलिसी स्वीकारली आणि आपल्या आमदारांना थेट मतदानादिवशी मैदानात उतरवलं.. 

राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. 44 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. मतदान पार पडलं आणि कॉंग्रेसकडून आपल्याचं दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आले. 

झालं अस की मतदान करून बाहेर पडताना कॉंग्रेसच्या एका आमदाराने अमित शहांकडे पहात व्हिक्ट्री साईन दाखवलं. त्यावरून कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आणि कॉंग्रेस थेट निवडणूक आयोगाकडे गेलं.. 

रात्री 12 वाजता भाजपकडून अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, पियुष गोयक असे दिग्गज नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाले तर कॉंग्रेसकडून कपिल सिब्बल, रणदीप सुरजेवाला यांच्यासह इतर नेते आयोगात बाजू मांडण्यासाठी गेले.. 

रात्री 12 वाजताच आयोगाने CCTV फुटेज पाहून आपला निर्णय कळवला.. 

हा निर्णय पुर्णपणे कॉंग्रेसच्या बाजूने झुकला. निवडणूक आयोगाने दोन मत रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही दोन्ही मत कॉंग्रेस आमदारांची होती मात्र त्यांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. दोन मते रद्द झाल्यानंतर मतांचा कोटा 45 वरून 43.51 इतका झाला. अर्थात 44 मतांची आवश्यकता आत्ता पटेलांना होती.. 

रात्री 12 नंतर मतमोजणी सुरू झाली आणि रात्री 2 वाजता निकाल लागला. या निकालात अहमद पटेल विजयी झाले. अमित शहांनी अहमद पटेल यांना पाडण्याचे हरएक प्रयत्न केले पण ते यशस्वी ठरले नाहीत.. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.