कट्टर विरोधक असूनही दिग्विजय सिंग यांना अमित शहांनी सरप्राईज मदत केलेली

राजकारणात घट्ट मैत्रीची जशी उदाहरण आहेत, तशीच उदाहरणं विरोधाची सुद्धा आहेत. म्हणजे निवडणुकीच्या वेळी आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या पलीकडेसुद्धा कट्टर दुष्मनी म्हणता येईल. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा. 

मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजय सिंह हे आरएसएस आणि अमित शहा यांचे कठोर टीकाकार आहेत. त्यांचं सहसा पटत नाही. एवढंच नाही तर दिग्विजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार अमित शहा आणि त्यांची कधी समोरासमोर कधी भेट सुद्धा झाली नाही. 

पण याचं दिग्विजय सिंह यांनी नुकताच भोपाळमध्ये झालेल्या एका सभेदरम्यान आपले विरोध असणाऱ्या अमित शहा यांचं भरभरून कौतुक केलं. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण त्यांनी स्वतः हा किस्सा सांगितलाय. 

तर ही घटना चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ ची आहे. जेव्हा दिग्विजय सिंह आपली पत्नी अमृता यांच्यासोबत पायी ‘नर्मदा परिक्रमा यात्रे’ला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र ओपी शर्मा सुद्धा होते. ज्यांनी ‘नर्मदा के पथिक’ नावाचे पुस्तक लिहिले आणि याचं पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी दिग्विजय सिहांनी किस्सा सांगितलंय. 

दिग्विजय सिंह यांनी ३० सप्टेंबर २०१७ रोजी नरसिंगपूर जिल्ह्यातील बर्मन घाट येथून तीन हजार किलोमीटरहून अधिक लांबीची नर्मदा परिक्रमा सुरू केली होती, जी सहा महिन्यांनंतर बर्मन घाटावर संपली.

पुस्तकाच्या प्रकाशना दरम्यान दिग्विजय सिंह म्हणाले की, एकदा आम्ही सगळे गुजरातमधील एका ठिकाणी रात्री दहाच्या आसपास पोहोचलो. घनदाट जंगल होत त्यात रात्रीची वेळ. जंगलाच्या पलीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि रात्रभर राहण्याची सोय नव्हती.

त्यानंतर एक वन अधिकारी तेथे आला आणि सांगल्याना हे जाणून आश्चर्य वाटेल त्यांनी मला सांगितले की, अमित शाहजींनी त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सहकार्य करण्याची सूचना केली होती. 

त्यावेळी गुजरातमध्ये निवडणुका सुरू होत्या आणि मी त्यांचा सर्वात मोठा टीकाकार होतो, पण आमच्या यात्रेदरम्यान आम्हाला कोणतीही अडचण येऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. वनाधिकार्‍यांनी आमच्यासाठी डोंगरातून रस्ता काढून दिला आणि आमच्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्थाही केली.

सिंह पुढे म्हणाले की, महत्वाची गोष्ट म्हणेज आजपर्यंत मी अमित शहा यांना भेटलो नाही, परंतु योग्य वेळी आम्हाला मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले. राजकीय समन्वय, सौहार्द आणि मैत्रीचे हे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. ज्याचा राजकारण आणि विचारसरणीशी काहीही संबंध नाही.

आपला हा किस्सा सांगतानाच दिग्विजय सिंह म्हणाले की, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर टीकाकार असले तरी नर्मदा यात्रेदरम्यान दर चार-आठ दिवसांनी त्यांचे कार्यकर्ते मला भेटायचे. मी त्यांना विचारायचो सुद्धा, कि ते एवढा त्रास कशाला घेतायेत, तेव्हा कार्यकर्त्यांनी सांगितले कि. त्यांना मला भेटण्याचा आदेश दिले आहेत.

काँग्रेस नेत्याने आठवण करून दिली की, ते भरूच परिसरातून जात असताना आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी एके दिवशी आमच्या गटाची मांझी समाजाच्या धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था केली आणि ज्या हॉलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती, त्या हॉलच्या भिंतींवर आरएसएसचे ज्येष्ठ नेते केशव बळीराम हेडगेवार आणि माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचे फोटो होते.

सिंह म्हणाले,

 मी यासाठी सांगतोय कि, धर्म आणि राजकारण वेगळे आहे  आणि यात्रेदरम्यान त्यांनी सर्वांची मदत घेतली. भाजपच्या युवा विंग भाजयुमोचे एक नेता आणि इतर तीन भाजप कार्यकर्ते त्यांच्या नर्मदा परिक्रमा यात्रेत सामील होते आणि ते आता त्यांच्या नर्मदा कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत.

दिग्विजय सिंह यांनी आठवण करून दिली की दिवंगत अध्यात्मिक नेते दादाजींनी त्यांचे अनुयायी आणि अभिनेते आशुतोष राणा यांना नर्मदा परिक्रमेच्या समारोपाच्या वेळी बर्मन घाटावर ‘भंडारा’ची व्यवस्था करण्याची सूचना केली होती. नर्मदा परिक्रमा यात्रेला सिंग यांच्यासोबत गेलेल्या त्यांची पत्नी अमृता यांनीही त्यांच्या प्रवासाचे किस्से शेअर केले आणि नर्मदा नदीच्या पर्यावरण रक्षणाच्या गरजेवर भर दिला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.