अमिताभच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्कँडल अमृतासिंगशी जोडलं गेलेलं आहे.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. शहेनशहा अमिताभचा पडता काळ सुरू होता. त्याच वय चाळिशीपार पोहचल होतं. अनेक सिनेमे फ्लॉप झाले होते. त्याला मिळणाऱ्या ऑफरचा ओघ कमी झाला होता.

अशातच स्टार अँड स्टाईल या फिल्म मॅगझीनने कव्हर स्टोरी केली,

“Amitabhs Secret Passion for young actress”

सगळ्या भारतभरात खळबळ उडाली. बच्चनच्या आयुष्यात रेखासोबतच प्रेमप्रकरण, राजकारण, बोफोर्स, परवीन बाबी असे अनेक वाद येऊन गेले होते, पण या वेळीच स्कॅंडल जरा विचित्र व जास्त सिरियस होत.

IMG 6126

ही घटना झाली होती मुंबई मधल्या पियानो बार मध्ये. अमिताभ बच्चन आणि डॅनी डेंझगोपा रात्री उशिरा या पार्टी मध्ये येऊन पोहचले.

थोड्या वेळात फिल्म ऐक्ट्रेस अमृता सिंग आपल्या फ्रेंड्स सोबत सामील झाली.

अमृता सिंग त्याकाळची आघाडीची अभिनेत्री होती. दिल्लीच्या हायक्लास वर्तुळात वाढलेली अमृता तिच्या बिनधास्त रोल साठी फेमस होती.

अमिताभ तिला लहानपणापासून आवडायचा. अमिताभ प्रमाणेच अमृताची आई रुकसाना सुलताना गांधी घराण्याच्या खास वर्तुळातली समजली जायची.

बच्चनची हिरॉईन म्हणून काम करायचं तीच स्वप्न होतं.

ते काही वर्षांपूर्वी पूर्ण देखील झालं होतं. शूटिंग दरम्यान अमिताभची आणि तिची चांगली मैत्री झाली होती. अमिताभला आपल्या पेक्षा 16 वर्षांनी लहान असलेली अमृता आवडू लागली होती.

त्या दिवशीची पार्टी प्रचंड रंगली होती. दारू म्युजिक पाण्यासारख वाहत होतं. त्या बेधुंद वातावरणात लोक बेहोष होऊन नाचत होते.

थोड्या वेळात अमृता पार्टी मधून निघू लागली पण अमिताभने तिला रोखले.

पार्टीच्या एका कोपऱ्यात ती अमिताभ आणि डॅनी सोबत गप्पा मारत उभी होती. गप्पा मारताना डॅनी अमृताशी फ्लर्ट करत होता आणि तीही हसत खिदळत त्याला प्रतिसाद देत होती. दोघे डान्स फ्लोअर वर कपल डान्स करू लागले.

प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे की बच्चनला या दोघांच गुलुगुलू करणे पसंद पडले नाही. त्याच्या रागाचा पारा चढला.

आधीच वातावरण धुंद होत अशात बच्चनच स्वतःवरच नियंत्रण सुटलं.

त्याने सर्वांसमक्ष डॅनीला ढकलून अमृतापासून अलग केलं आणि तिला पकडून मिठी मारली. एवढ्यावर गोष्ट थांबली नाही.

तो चक्क तिला किस करू लागला.

प्रचंड धक्का बसलेल्या अमृताने धडपडत स्वतःची सुटका करून घेतली आणि धावत पळत लेडीज रेस्टरूम गाठलं. अमिताभ अमृताच्या मागे मागे लेडीज रेस्टरूम कडे गेला. तिथे देखील या दोघांची जोरदार भांडणे झाली.

अमिताभने विनोद खन्ना आणि रवी शास्त्रीच नाव घेऊन अमृता सिंग वर अभद्र आरोप केले.

डॅनीने त्याला कसंबसं आवरलं आणि पार्टी मधून बाहेर घेऊन गेला.

पार्टीचा रंग क्षणात उतरला होता. सुपरस्टार असूनही नम्र आहे अशी प्रसिद्धी असलेल्या बच्चन चा बुरखा टराटरा फाटला होता. आता पर्यंतचे वाद वेगळे पण यावेळी अमिताभने चक्क एका मुलीवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला होता.

ही घटना घडली तेव्हा जया बच्चन भारतात नव्हत्या. अमिताभने आपलं राजकीय वजन वापरून हे प्रकरण मिटवून टाकलं.

तरीही इंडस्ट्रीमध्ये दबक्या आवाजात चर्चा होतीच.

अमृता सिंग आणि विनोद खन्नाच्यात अफेअर होत आणि विनोदला आपला प्रतिस्पर्धी समजणाऱ्या बच्चनने मुद्दाम हा सगळा गोंधळ घातला असे काही जणांचे म्हणणे होते.

अमृताची आई रुकसाणाने तिला विनोद खन्नाशी ब्रेक अप करायला लावलं. बच्चनशी पंगा घेणे फिल्मइंडस्ट्रीमध्ये त्याकाळी तरी शक्य नव्हते.

नाही म्हणायला अमिताभने अमृताची हात जोडून माफी मागितली आणि या सगळ्या स्कँडलवर संपूर्ण पडदा पडला.

स्टार अँड स्टाईलने ही स्टोरी प्रसिद्ध केली पण त्यावर ना अमिताभने प्रतिक्रिया दिली नाही अमृताने. टिपिकल फिल्मी गॉसिप असं म्हणत ही घटना कायमची पुसून टाकण्यात आली.

अमिताभ व अमृता सिंग यांच्यात आता कोणतेही वितुष्ट नाही.

या नंतरही त्यांनी एकमेकांसोबत काही सिनेमात काम केलंय. अमृताची मुलगी सारा अली खान हीच कौतुक करताना बच्चन कधी थकत नाही.

नुकताच एका लग्नात अमिताभने अमृता व तिची दोन्ही मुले सारा व इब्राहिमसोबतच फोटो देखील शेअर केला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.