धर्मेंद्र, दिलीपकुमार, राजकुमार, देवानंद यांनी नाकारलेला जंजीर बच्चनला मिळाला… 

कोणाच्या नशिबात काही लिहलेलं असेल हे सांगता येत नाही. आत्ता आम्ही नशिबाच्या गोष्टी का करतोय हे सांगण्यासाठीच हा किस्सा. हा किस्सा वाचल्यानंतर तुम्हाला पण वाटले, 

बच्चनच्याच नशिबात होतं हे… 

झाले अस की सलीम खान म्हणजे सल्लू भाईचे वडिल यांनी एक सिनेमा लिहलेला. हा सिनेमा लिहताना त्यांच्या डोळ्यापुढे धर्मेंद्र होता. धर्मेंदला डोळ्यासमोर ठेवूनच हा सिनेमा लिहण्यात आलेला होता. सिनेमा लिहल्यानंतर त्यांनी तो थेट धर्मेंदला वाचून सांगितला… 

धर्मेंन्द्र तेव्हा मोठ्ठा स्टार होता. सलीम खान यांनी लिहलेल्या सिनेमाचं नाव होतं जंजीर. धर्मेंद्रला ही स्टोरी खूप आवडली. त्याने सलीम यांना रोख साडेसात हजार मोजले आणि ही स्टोरी विकत घेतली. याच काळात प्रकाश मेहरा यांनी धर्मेंद्रला सोबत घेवून समाधी सिनेमा केलेला.  त्यामुळे प्रकाश मेहरा आणि धर्मेंद्रच चांगल ट्युनिंग जमत आलेलं. 

झालं अस की एक दिवस धर्मेंद्रने प्रकाश मेहरांना घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्या हातात जंजीरची स्क्रिप्ट ठेवली. प्रकाश मेहरांना देखील ही स्टोरी सुपरहिट ठरणार याचा अंदाज आला. धर्मेंद्र या सिनेमाचा नायक असणार आणि सिनेमा प्रकाश मेहरा करणार हे फिक्स झालं.. 

बातमी सिनेसृष्टीत पोहचली.

तिकडे प्रकाश मेहरा आणि धर्मंद्रचे चुलतभाऊ रंजीत विर्क यांच्यात भांडण झाली होती. रंजीत विर्क यांनी क्रोधी सिनेमा केला होता. ही गोष्ट जेव्हा रंजीत विर्क यांना समजील तेव्हा त्याने आपल्या बहिणीला ही गोष्ट सांगितली. बहिण तडक धर्मेंद्र यांच्याकडे गेली आणि वचन घेतलं की तुम्ही प्रकाश मेहरा यांच्यासोबत सिनेमा करणार नाही. 

घरगुती संबंध बिघडायला नकोत म्हणून धर्मेंद्रने प्रकाश मेहरांना नकार कळवला. पण सोबतच आपण या सिनेमासोबत राहणार असल्याचं देखील कळवलं.. 

दूसरीकडे एक सुपरस्टार जन्म घेण्याच्या तयारीत होता. बच्चन त्या काळात सर्व मोठ्या हिरोंना भेटायचा आणि काही रोल असला तर माझं नाव सुचवा म्हणून गळ घालायचा. त्या काळात बच्चनच्या नावाने फक्त एकच सुपरहिट सिनेमा होता तो पण आनंद… 

आनंद सिनेमाच्या सक्सेसचं क्रेडिट पुर्णपणे राजेश खन्नाला देण्यात आलं होतं. त्यामुळे बच्चन तसा फ्लॉपच होता. अशीच काम देण्याची गळ बच्चनने धर्मेंद्रला देखील घातली होती… 

दूसरीकडे प्रकाश मेहरांनी दिलीपकुमार, राजकुमार, देवानंद अशा सर्वांना विचारणा केली. हे त्या काळात मोठ्ठे स्टार होते. धर्मेंद्रने नाकारलेला सिनेमा म्हणूनच ते या स्टोरीकडे पहात होते. त्यामुळे हा सिनेमा करण्यात कोणालाच इंटरेस्ट नव्हता.. 

प्रकाश मेहरांनी ही अडचण बोलून दाखवली तेव्हा धर्मेन्द्रने बच्चनच नाव सुचवलं. आत्ता नव्या पोराला घेवूनच बघुया म्हणून बच्चनला होकार कळवण्यात आला.. 

दुसरीकडे धत्रुघ्न सिंन्हा ही बातमी समजली. त्याने धर्मेंन्द्रला विचारलं की, ही फिल्म मी करायला तयार होता. मी केली असती. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले हजीर तो वजीर…

त्यानंतर सिनेमाच्या हिरोईनसाठी मुमताजचं नाव सिलेक्ट झालं होतं. पण धर्मेंद्र नाही आणि कोणत्यातरी नवीन हिरो बरोबर काम करायचं म्हणून तिने पण नकार कळवला आणि नवी हिरोईन आली ती म्हणजे जया भादुरी…

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Dinesh says

    अर्धवट बातमी आली आहे जंजीर ची 🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.