वडील कर्जबाजारी झाले म्हणुन अभिषेक बोस्टनमधलं शिक्षण अर्ध्यात टाकून आला होता….

बॉलिवूड म्हणल्यावर मोजकीच काही नावं चटकन आठवतात त्यात एक नाव तर कंपल्सरी असतं म्हणजे असतंच ते म्हणजे बॉलिवूडचा बिग बी अमिताभ बच्चन. या माणसाशिवाय बॉलिवूड आणि बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अनेक दशकं या माणसाने बॉलिवूडवर हुकूमत गाजवली आणि टिकवलीसुद्धा. आजही अमिताभ बच्चन त्याच एनर्जिने बॉलिवूडमध्ये काम करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतक्या वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपली जादू या माणसाने पसरवली की भारतातल्या खेडोपाड्यात प्रत्येक माणसाला अमिताभ बच्चन हे नाव माहीत असतं. इतकं आकर्षण असलेले महानायक अमिताभ बच्चन एकदा कर्जबाजारी झाले होते आणि तेव्हा अभिषेक बच्चन बोस्टन मध्ये शिकत होता तेव्हाचा हा किस्सा.

अलीकडेच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनने हा किस्सा सांगितला. अभिषेक बच्चन अभिनय शिकण्यासाठी बोस्टन विद्यापीठात गेला होता. त्यातही अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाला सांगितल होतं की भाषा शार्प कर,हिंदी चांगली कर तरच रोल मिळतील. अधून मधून अमिताभ बच्चन अभिषेकला फोनही करायचे. अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला तो म्हणजे 2000 साली आलेल्या रिफ्युजी या सिनेमातून. बोस्टन विद्यापीठात शिकल्यावर हा पहिलाच सिनेमा अभिषेक बच्चनला ऑफर झाला होता.

अभिषेक बच्चनचं इकडे सगळं व्यवस्थित सुरू होतं पण तिकडे अमिताभ बच्चन कर्जबाजरीपणामुळे त्रस्त होते. सिनेमे पडू लागले, पैशाचे वांदे झाले, सगळ गणित कोलमडलं. इतकी बिकट परिस्थिती आली होती की रात्री जेवायचं काय इथवर सगळ येऊन पोहचलं होतं. आर्थिक अडचणीतून बच्चन कुटुंब जात होतं. बाहेरील लोकांकडून अभिषेक बच्चनला हा प्रकार समजला. मग त्याने अमिताभ बच्चन यांना फोन केला आणि सांगितलं की मी तडक घरी परततो, हे शिक्षण अर्ध्यात टाकून मी येतो, कारण अश्या काळात मला तुमच्या सोबत असणं आवश्यक वाटतं. एका मुलाच्या नात्याने हे मी माझं कर्तव्य समजतो.

अभिषेक बच्चनला हे ही माहित नव्हतं की घरात काय खायचं इथवर प्रकरण पोहचलं आहे. इतकं आर्थिक संकटं टाळणं अशक्य होतं तेव्हा अर्ध्यात शिक्षण सोडून अभिषेक घरी आला आणि वडिलांना मॉरल सपोर्ट देत राहिला, प्रसंगी स्टाफ लोकांकडून पैसे उधार घेतले आणि रात्रीच्या जेवणाची सोय केली. वडील मुलाचं नात नव्याने पुढे आलं. अभिषेक बच्चनला आपल्या वडिलांची अशी परिस्थिती पहावली नाही आणि त्यानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

नंतर मग अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीची hosting मिळाली आणि हा शो जबरदस्त हिट झाला. सगळं स्थिरस्थावर झालं आणि आर्थिक अडचणीतून बच्चन कुटुंबीय बाहेर आलं. इतकी बिकट वेळ असूनही अभिषेक बच्चनने धीर सोडला नाही आणि वडिलांसोबत राहीला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.