बच्चन म्हणतो,” त्या काळात मला कोणी फरशी पुसायचं काम दिल असत तरी मी ते केलं असत”

अमिताभ बच्चनला या शतकाचा महानायक म्हंटले गेले आहे. अमिताभ बच्चन हे नाव सिनेसृष्टीत इतके मोठे आहे की आजवर इतक प्रेम कोणत्याच सिनेकालाकाराला भेटले नसेल तितके प्रेम अमिताभ बच्चनन यांना भारतीय प्रेक्षकांन दिले आहे.  त्यांनी त्यांच्या इतक्या प्रदिर्घ कार्यकाळात अमाप पैसा तर मिळवलाच पण नावही कमावले.

या सुपरस्टारला लोकांच्या मनावर राज करता करता आत्ता चार दशके उलटून गेली आजही लोक त्यांना तेवढाच प्रेम करतात.याचा अर्थ त्यांनी कायमच यशाच्या शिखरावरचे दिवस पहिले असे नाही. काही काही वेळा त्यांच्याही आयुष्यात काही लो पोईंट आले. मग त्यांचे राजकारणात जाणे असो, रेखा बरोबरच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा असो किंवा बोफोर्स स्कडल मध्ये त्यांच आलेलं नाव असो.

अमिताभ बच्चन सुद्धा आपल्या सारखा जिवंत माणूस आहे. विशेष म्हणजे त्याला सुद्धा संसार आहे, त्याला सुद्धा रोजचे बायका पोरांचे प्रश्न पडतात हे आपण बऱ्याचदा विसरून जात होतो. पण १९९८ साली हे प्रकर्षाने जाणवून आले.

अमिताभ यांचे वय तेव्हा ५७ वर्ष इतके होते लोक या वयात निवृत्तीचा विचार करत असतात. अमिताभने मात्र या वयात आयुष्भर कमावलेले सर्व गमावले होते. हो तो कर्जबाजारी झाला होता इतका की लोकांची देणी देण्यासाठी तो पडेल ते काम करायला तयार होता. सिमी ग्रेवालने घेतलेल्या एका मुलाखतीत तो असं म्हणतो की

“त्याकाळी जर मला कोणी फरशी पुसायला सांगितली असती तरी मी पैश्यासाठी ती पुसली असती इतकी माझी आर्थिक स्थिती वाईट होती.”

त्याचे झाले असे की अमिताभने १९९५ साली ABCL Amitabh bachhan corporation limited नावाची कंपनी काढली होती. फिल्म प्रोडक्शन आणि इवेन्ट मॅनेजमेंट करणारी ही कंपनी होती. पहिल्याच वर्षी कंपनीने पंधरा कोटींचा फायदा ही कमावला. अमिताभने या कंपनीसाठी लोकांकडून वा बँकेंकडून पैसे उचलले होते. अर्शद वारसी, चंद्रचूडला लॉंच करणारा तेरे मेरे सपने बनवला. तो ठीक चालला.

१९९६ साली या कंपनीने मिस वर्ल्ड ही स्पर्धा आयोजित केली म्हणजे त्या स्पर्धेचे इव्हेंट मॅनेजमेंट त्यांनी केले. बंगलोर मध्ये कंपनीने हा कार्यक्रम अत्यंत मोठा केला पण झाले काही वेगळेच कंपनीला चार कोटीचे नुकसान झाले. पुढे अनेक प्रोजेक्ट्स आणि पिक्चर मध्ये कंपनीने  पैसे लावले.

१९९७ साली अमिताभच्या एबीसीएलचे मृत्यूदाता, मेजरसाब, सात रंग के सपने असे तीनचार सिनेमे आले. यातल्या दोन फिल्ममध्ये खुद्द बच्चनने काम केलेले पण यातला कुठलाच सिनेमा अपेक्षित यश मिळवू शकला नाही. कंपनी अजूनच तोट्यात आली इतकी की १९९९ मध्ये कंपनीचे दिवाळे निघाले.

देणेकरी बच्चन यांच्या घरी ऑफिस मध्ये रोज येऊ लागले त्यांचे पैसे मागू लागले. अमिताभ बच्चन यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. मिडिया, पेपर मधुन अमिताभ वर टीका होत होती. लोक महानायक अमिताभला वाटेल त्या भाषेत बोलत होते एकंदरीत तो काळ परीक्षा बघणारा होता. अमिताभ यांनी त्या काळात खूप अपमान सोसला तो निमूट पणे गिळला.

त्याचा सुप्रसिद्ध प्रतीक्षा बंगलासुद्धा कॅनरा बॅंकेच्या कर्जापायी जप्त होणार होता. प्रकरण कोर्टात हि गेले मुंबई हाय कोर्टाने अमिताभला स्वतःची मालमता विकण्याची परवानगी नाकारली. अमिताभ वर एकूण नव्वद कोटींचे कर्ज होते. अमिताभला अनेकांनी कंपनीचे दिवाळे घोषित करून मोकळा हो असा सल्ला दिला. पण अमिताभने जबाबदारी घेतली आणि सर्व कर्ज स्वतः फेडायचे ठरवले.

त्या काळात अमिताभ यांच्याकडे इतके काम नव्हते आणि समोर हा कर्जाचा डोंगर उभा होता. सूर्यवंशम सोडला तर कोणताच सिनेमा चालत नव्हता. मुलाला अभिषेक बच्चनला लॉंच करायचं होत आणि त्यात राहत घर लिलावात निघून रस्त्यावर यायची पाळी आली होती.

याच दरम्यान अमिताभ यांना कोण बनेगा करोडपती हा नवीन शो साठी  विचारण्यात आले. त्याकाळी टीवीला इतके महत्व नव्हते. सिनेमा सारख्या ७० mmच्या मोठ्या पडद्यावरून टीवी मध्ये जाणे म्हणजे लोकांना अपमानास्पद वाटायचे आणि इथे तर बॉलीवूड चा सुपरस्टार अमिताभ वर टीवी मध्ये काम करण्याची वेळ आली होती.

अमिताभने आपल्या बायकोला जयाला विचारले. तिने सल्ला दिला की असं काही करू नकोस. पण परिस्थिती तशी नव्हती , मघाशी सांगितल्याप्रमाणे अमिताभ फरशी पुसायला हि तयार होता. त्याने होकार दिला आणि शो सुरु झाला.

अमिताभला या सेट वर फक्त सूत्रसंचालन करायचे होते पण नियतीने त्याला त्याचा खरा अभिनय याच शो मध्ये करायला लावला. स्वतःच्या पैशाच्या सर्व अडी अडचणी , देनेकार्यांचे टेन्शन सोडून हसत मुखाने लोकांना सामोरे जायला लागला, लोकांना करोडोची स्वप्ने विकू लागला.

अत्यंत उत्साहात बच्चन यांनी त्या शो चे सूत्रसंचालन केले. अमिताभ यांची अत्यंत स्वच्छ आणि अस्खलित हिंदीने व त्यांच्या भारदस्त आवाजाने भारतीय प्रेक्षकांना लॉक केले होते.

लोक अमिताभचे परत एकदा दिवाने झाले. प्रत्येक एपिसोड बरोबर अमिताभ यांची लोकप्रियता आणि आर्थिक स्थिती सुधारत गेली. अमिताभ यांना त्याकाळी समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंग आणि सहारा समुहाचे उद्योजक सुब्रोतो रॉय या दोन मित्रांनी ही आर्थिक मदत केली होती.

याच कोण बनेगा करोडपतीने अमिताभ यांना या इतक्या मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढले. अमिताभ त्याकाळी राब राब राबला मिळेल ते काम घेतले सिनेमे घेतले ,टीवी वर च्या लहानसहान जाहिराती ही त्याने केल्या आणि या नायकाने सर्वच्या सर्व नव्वद कोटीचे कर्ज फेडले. अमिताभ मोठ्या धीराने एक एक दिवस काढत होते.

काही माणसांनी अमिताभवर या काळात विश्वास दाखवला होता त्यात धीरुभाई अंबानी, डायरेक्टर यश चोपडा हे देखील होते.  यश चोपडा यांनी अमिताभला मोहबत्ते मध्ये महत्वाची भूमिका दिली. जी खूप लोकप्रिय झाली. पुढे अमिताभ यांनी जे यश मिळवले ते वादादित आहे. अमिताभ म्हणतात,

“या संकटांनी खरतर मला माणूस म्हणून खूप घडवले. आयुष्यात संकटे नसतील तर जगण्याची मजा निघून जाईल.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.