आज त्याचा बॉडीगार्ड पण करोडपती असला तरी बच्चनने एकेकाळी कोळसा खाणीत काम केलंय ….

बॉलिवूड आणि स्ट्रगल यांचं नातं विशेष आहे. दररोज मुंबईत हजारो लोकं सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी येतात. आज जे काही यशस्वी झालेले अभिनेते आपण बघतो त्यांचाही स्ट्रगल खूप मोठा असतो. अगोदरच गावखेड्यातून आलेले तेव्हाचे हिरो लोकं पडेल ते काम करायचे, अर्धा वडापाव खाऊन मुंबईत फिरायचे आणि बराच काळ हा संघर्ष करून आज त्यांना सक्सेस मिळालं आहे.

अशीच गोष्ट आहे महानायक बिग बी अमिताभ बच्चनची. अगोदर भयंकर स्ट्रगल करून आलेला अमिताभ बच्चन आज काय दर्जाचा अभिनेता आहे हे आपण जाणतोच. पण त्याही अगोदर तो काय करत होता ते जाणून घेऊया.

My pain is my destiny and I can’t avoid it…..

हा डायलॉग आहे अमिताभ बच्चनच्या काला पथर सिनेमातला. हिंदी सिनेमातल्या काही मॅजिकल डायलॉग पैकी एक डायलॉग हा आहे.

२७ डिसेंम्बर १९७५ या दिवशी झारखंडमधील धनबाद जवळच्या चासनाला कोळसा खाणीत एक दुर्दैवी घटना घडली होती. या कोळसा खाणीच्या दुर्घटनेत ३७५ जणांचा जीव गेला होता. याच घटनेवर आधारित दिग्दर्शक यश चोप्रा यांनी काला पथर सिनेमाची निर्मिती केली. काला पथर या सिनेमात अमिताभ बच्चन, शशी कपूर, शत्रूघन सिन्हा, राखी, परवीन बाबी, नितु सिंग अशी त्यावेळची सगळी टॉप कास्ट या सिनेमात होती.

तर ही गोष्ट ताजी होण्यामागचं कारण म्हणजे यश चोप्रा दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनित काला पथर या सिनेमाला ४२ वर्ष झाली त्यानिमित्ताने अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर काला पथर या सिनेमाची आठवण शेअर केली आणि त्यात सांगितलं की,

सिनेमांमध्ये येण्याअगोदर मी कोळसा खाणीत कामाला होतो. हीच आपली पहिली नोकरी असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या कोळसा खाणीत आपणही काम केल्याचं बिग बी सांगतात.

काला पथर सिनेमातले बरेच प्रसंग आपण अनुभले असल्याचं बिग बी सांगतात. कोलकाता कंपनीच्या कोळसा विभागात मी कामाला होतो आणि धनबादच्या आसनसोल इथल्या कोळसा खाणीतही आपण काम केलं असल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

कॅप्टन विजय पाल सिंग ही भूमिका बिग बि यांनी साकारली होती. या सिनेमाची थोडक्यात स्टोरी होती की कॅप्टन विजयपाल सिंग हा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असतो. जहाजावर असताना ३०० लोकांचा जीव धोक्यात असताना कॅप्टन विजय तिथून पळून जातो. या घटनेवरून त्याच्यावर जोरदार टीका होते. आईवडील आणि समाजाकडून त्याला नाकारलं जातं.

या सगळ्या प्रकरणाचा विसर पडावा म्हणून विजय कोळसा खाणीत काम करू लागतो. पण याच कोळसा खाणीत दुर्दैवी घटना घडते आणि खाणीत पाणी भरू लागतं. यावेळी विजय आणि त्याचे सगळे कामगार खाणीत अडकलेले असतात. पण इथं विजय आपलं शौर्य आणि बुद्धीची कमाल दाखवून जीव वाचवतो याबद्दलची ही कथा होती. हा सिनेमा तेच भरपूर गाजला होता. खऱ्या घटनेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता.

आज घडीला सिनेमा क्षेत्रांमध्ये सगळ्यात टॉपचा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचा उल्लेख ओघाने येतोच पण हा करोडपतीच्या सेटवरचा माणूस एकेकाळी कोळसा खाणीत कामाला होता हे ही तितकंच मोठं आश्चर्य आहे. काला पथर सिनेमातले कोळसा खणीतले काही प्रसंग आपल्या जीवनाशी संबंधित असल्याचं बच्चन यांनी सांगितलं होतं. या सिनेमातली तगडी स्टारकास्ट, जबरदस्त डायलॉग यामुळे सिनेमा चांगला चालला होता.

१९७५ च्या चासनाला दुर्घटनेच्या आठवणी निघाल्यावर अनेक लोकांची मन हळवी होतात, जवळपास ३७५ लोकांनी यात जीव गमावला होता. बिग बी यांचं खाणीमधलं पहिलं काम होतं त्याबद्दलची ही आठवण त्यानी इन्स्टाग्रामवर शेअर केली जी सध्या भरपूर व्हायरल होत आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.