उत्तरप्रदेशच्या राजकारणात अमिताभ ठाकूर यांच्यामुळे येणारी वादळ नवीन नाहीत….

युपीमध्ये आपली वेगळी ओळख असलेले आयपीएस अधिकारी म्हणजे अमिताभ ठाकूर. हे अमिताभ ठाकूर तेच आहे ज्यांच्या घराबाहेर त्यांनी जबरिया रिटायर्ड अशी पाटी लावली होती. मुलायमसिंगांना देखील या अधिकाऱ्याने आपला हिसका दाखवला होता आणि सगळ्या देशाला चकित केलं होतं.

सध्या जेलमध्ये भरती असलेल्या अमिताभ ठाकूर यांच्यावर सरकारी कामात दखल दिल्याने आणि एका घटनेत दोन व्यक्तींना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप असून अजून एक केस त्यांच्यावर दाखल झाली असून त्यांच्या पत्नीवरही एफआयआर दाखल केली आहे. 

युपीच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथ करणाऱ्या कारवाया आणि घटना या अमिताभ ठाकूर यांच्याभोवती फिरतात. तर आपण सगळ्यात आधी अमिताभ ठाकूर यांच्या नावाभोवती फिरणाऱ्या काही महत्त्वाच्या घटना बघूया.

सगळ्यात आधी फेमस झालेली घटना म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तेव्हा धोनीला एका नोटेवर मेसेज आला होता त्यावर लिहिलं होतं कि मॅच हारने केलिए धन्यवाद. हि नोट पाठवली होती अमिताभ ठाकूर यांनी. ह्या प्रकरणामुळे अमिताभ ठाकूर चर्चेत आले होते. 

त्यानंतर आपल्या कार्यकाळाच्या अगोदरच आयपीएस पदावरून जबरदस्तीने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या निवृत्तीबाबत कारण दिलं कि सेवेचा उरलेला कार्यकाळ निभावण्यास ते सक्षम नाही. २०१७ मध्ये अमिताभ ठाकूर यांनी बदलीचा प्रस्तावसुद्धा सादर केला होता. पुढे मुलायम सिंह यादवांना धमकी दिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं. हे सुद्धा प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध पक्ष उभारणी.

यावेळी त्यांच्यावर अटक करताना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे खटले दाखल केले असले तरी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणुक लढवण्याची घोषणा केल्यानेच सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागले असल्याचे आरोप केले जात आहेत.

अमिठभ थकून योगी आदित्यनाथ यांना टक्कर देण्यासाठी एक नवीन पक्ष उभारत आहेत. सोबतच आगामी निवडणुकीत त्यांच्या पत्नी नूतन यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध लढण्याचं ठरवलं होतं. मात्र नूतन यांनी नवीन पक्षाची घोषणा केल्यावर अनेक लोकांनी त्यांचं समर्थन केलं होतं पण पक्ष सुरु करण्यापूर्वीच त्यांनाही अटक करण्यात आली.

युपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर सडकून टीका करण्यातही अमिताभ ठाकूर आघाडीवर असतात. विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणातही अमिताभ ठाकूर यांनी अगोदरच भविष्यवाणी केली होती कि त्याचा एन्काऊंटर होणार आहे. हि घटनाही खरी ठरली होती. 

योगी आदित्यनाथ यांच्यावर नूतन ठाकूर यांनी आरोप लावले कि,

आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक बेकायदेशीर, अनुचित, स्वार्थी, भेदभाव करणारे आणि लोकांना त्रास होईल असे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ जिथून निवडणूक लढवतील तिथे विरुद्ध मी उभी राहणार आहे.

हि आमच्या सिद्धांताची लढाई आहे आणि वाईट कामांना दिलेलं प्रत्युत्तर आहे.  योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध उभं राहिल्याने त्यांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बेहिशेबी मालमत्ता, बलात्काराचे आरोप, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे अनेक आरोप ठाकूर दाम्पत्यावर लावण्यात आले आहेत आणि त्यांना अटक झाली आहे. युपीच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहे त्यामुळे याचा निकाल काय लागतो यावर सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.