महाआयटी घोटाळ्याचा आरोप होत असलेले हे अमोल काळे कोण आहेत ?

सद्द्याचं राजकीय वातावरण पाहता दोन गोष्टी रोजच चर्चेत आहेत. एक म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि दुसरी म्हणजे राऊतांच्या पत्रकार परिषदा…..

पण यात आता आणखी एक व्यक्ती चर्चेत आला आहे ते म्हणजे अमोल काळे. थोडक्यात हे नाव आणि त्यांच्यावरचे आरोप हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या कथित महाआयटी घोटाळ्या संबंधित आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

तसेच संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे, या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते. तेंव्हापासून अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे दोन्ही नावे प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चली जातायेत.

इतक्यात कथित आरोपी अमोल काळे लंडनला पळून गेल्याची चर्चा होती, 

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हणले कि, उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सवाल केलेला कि, तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे अमोल काळे ? असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.  त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमोल काळे यांना देशाबाहेर पळवून लावण्यात आल्याचा आरोप केला.त्यामुळे आता अमोल काळे या नावाभवतीचं गुढ आणखीनच वाढले आहे. 

 

आणि तितक्याच अमोल काळे हा व्यक्ती माध्यमांसमोर प्रकट झाली आहे.

अमोल काळे काय म्हणाले?  अमोल काळे हे एक उद्योजक असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष देखील आहेत. 

मागच्या दोन दिवसांपासून महाआयटी घोटाळा प्रकरणात अमोल काळे सहभागी असल्याचं बोललं जात होतं. पण याबाबत स्वतः अमोल काळे यांनी स्वतःची बाजू मांडली. “आपण राज्य शासनाचे कोणतेही कंत्राट घेतले नाही, माझ्या खासगी व्यवसायाची संपूर्ण माहिती माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद आहे. देशाबाहेर पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या संदर्भात होत असलेली वक्तव्ये दिशाभूल करणारी असून बदनामी करणारी आहेत. अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अमोल काळे यांनी स्पष्ट केले. 

902d504e548a24dcae1787e8a8296910 original

महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे यांना देशाबाहेर पळवून लावले जात असल्याचा आरोप राऊत यांनी लावला होता. अमोल काळे लंडनला पळून गेले आहेत तर बाकीचे दुबईला पळून गेले आहेत आता केंद्राच्या मदतीने त्यांना माघारी आणा, असं नवाब मलिक म्हणाले होते.

मात्र हि महाआयटी कंपनीकडे नेमकी कोणती कामे होती ?

संजय राऊत यांनी भाजपच्या सत्ताकाळात महाआयटी कंपनीच्या माध्यमातून २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर ही कंपनी चर्चेत आली. हि तीच वादग्रस्त महाआयटी कंपनी आहे जिला नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने तब्बल १८९ कोटींची कामे दिली आहेत. तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटरचे कामही महाआयटीला देण्यात आल्यामुळे ही कामेही आता वादात सापडण्याची शक्यता आहे.

स्मार्टसिटी कंपनीमार्फत माहिती व तंत्रज्ञानासंदर्भातची जी कामे ‘महा-आयटी’ या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत करण्याचे बंधन घातल्यानंतर शहरात सीसीटीव्ही बसविण्यापासून ते कमांड कंट्रोल सेंटर ऍक्टिव्ह करण्यापर्यंत कामे या कंपनीला देण्यात आले होते. स्मार्टसिटी कंपनीकडून १८९ कोटींची माहिती तंत्रज्ञान संदर्भातील कामे हाती घेण्यात आली होती. तेंव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्मार्ट सिटी कंपन्यांमार्फत सुरू आयटी संदर्भातील कामे राज्य शासनाच्या महाआयटी कंपनीमार्फतच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक स्मार्टसिटीची कामे आपोआप महाआयटीकडे वर्ग झाली होती असं सांगण्यात येतंय. 

नाशिकमध्ये जवळपास आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व स्मार्टसिटी कंपनी व पोलिस आयुक्त कार्यालयात कमांड कंट्रोल सेंटर उभारण्याचे काम या कंपनीकडे दिले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयातील सेंटरचे काम अपूर्ण आहे तर स्मार्टसिटी ऑफिसमध्ये कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित झाले असले तरी सिग्नलवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त जोडले गेले आहेत. त्यात अजूनही सहाराच्या मेन रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. कॅमेरे बसविण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहेत तरी अजून कुठेही कॅमेरे बसवले नाहीत असं बोललं जातंय.

यापूर्वीच ४५ कोटी रुपये महा- आयटीला दिले गेलेत. आधीच हि सर्व कामे अर्धवट आहेत, संथ गतीने चालू आहेत आणि त्यात या महा-आयटी कंपनीकडून पुन्हा नव्याने ५५ कोटी रुपयांची मागणी  स्मार्टसिटी कंपनीकडे केली आहे तेंव्हा देखील हि कंपनी चर्चेत होती. काम देखील अपूर्ण अन त्यात कंपनीने पैशांसाठी तगादा लावल्यामुळे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महा- आयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या केलेल्या आरोपामुळे स्मार्टसिटी कंपनीकडे मागण्यात आलेले ५५ कोटी रुपये पुन्हा चर्चेत आले आहेत.

आता संजय राऊत यांच्या आरोपांनंतर देखील आता या कंपनीकडे सर्वांचे लक्ष लागलेच आहेच शिवाय  या दोन्ही नेत्यांचे आरोप आणि अमोल काळे यांनी स्पष्ट केलेली त्यांची भूमिका यानंतर हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहणं महत्वाचं आहे. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.