अमरिंदर सिंग यांनी आपल्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडच्या व्हिसासाठी अर्ज केला होता

पंजाबमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून अमरिंदर सिंग यांना ओळखलं जायचं. हे चित्र काही महिन्यांपूर्वी पर्यंत सुरळीत होत. पण २०२२ मध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार हे जाहीर झालं. ज्यासाठी वर्षभर आधीच तयारी सुरु झाली. आता पक्षाकडून निवडणुकीची रणनीती आखण्याचं काम सुरु असतानाचं पक्षांतर्गत खटके उडायला सुरुवात झाली.

ज्याचा परिणाम म्हणून अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि चरणजित सिंह चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले. मात्र यांनतर अमरिंदर सिंग वर्सेस काँग्रेस असा वाद सुरु झालायं.  अमरिंदर सिंग कधी पक्षाच्या कारभारावर बोट ठेवतात, तर कधी काँग्रेस मंडळी कॅप्टनवर आरोप लावतात.

आता या दरम्यान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी मैत्रीबद्दल मुद्दा उकरून काढलाय. ही पाकिस्तानी मैत्रीण आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय. आता डायरेक्ट पर्सनल लाईफमध्ये हात घातलाय म्हंटल्यावर वातावरण तर पेटणार ना भिडू. 

आता सगळ्यात आधी अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी मैत्रीबद्दल जाणून घेऊ. तर या पाकिस्तानी मैत्रिणीचं नाव आहे अरूसा आलम.

अरुसा आलम एक पाकिस्तानी संरक्षणविषयक  पत्रकार आहे आणि पंजाबमधील पटियाला महाराजा आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची जवळची, महिला मित्र म्हणून ओळखली जाते. त्या चंदिगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नियमित भेट द्यायच्या. मात्र, कुटुंबाला आवडत नसल्याने त्या पटियालामधल्या राजमहलला जात नाही.

अरूसा यांचे वडील अकलीन अख्तर पाकिस्तानच्या राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. १९७० च्या दशकात पाकिस्तानच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे समाजवादी नेते म्हणून त्यांची ओळख.   आणि त्यांची पाकिस्तानी लष्करी आस्थापनांच्या अगदी जवळच्या म्ह्णून त्यांना क्वीन जनरल असंही म्हटलं जातं. आईमुळेच त्या पाकिस्तानच्या सुरक्षा दलाशी जोडल्या गेल्या आणि संरक्षण पत्रकारिता करू लागल्या.

अगस्ता -९० बी पाणबुडी कराराबाबत आपल्या रिपोर्टींग साठी त्या ओळखल्या जातात. ज्यामुळे १९९७ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन नौदल प्रमुख मन्सूरूल हक यांना अटक करण्यात आली. महत्वाचं म्हणजे त्यांचं लग्न सुद्धा झालयं आणि त्या २ मुलांच्या आई आहेत. 

आता अरुसा आणि कॅप्टन यांच्या संबंधाविषयी बोलायचे झालं तर त्या माजी मुख्यमंत्र्यांना अमरिंदर सिंग महाराजा साहब म्हणतात. २०१७ मध्ये कॅप्टन यांच्या शपथविधी सोहळ्यात व्हीव्हीआयपी लेनमध्ये त्या बसलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. 

या दोघांची पहिली भेट २००४ मधली. ज्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग पाकिस्तानला गेले होते. यांनतर त्यांची मैत्री झाली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या व्हिसासाठी विनंती अर्ज केला होता, असं बोललं जात.

अमरिंदर सिंग यांच्या नात्याची चर्चा पहिल्यांदा २००७ मध्ये समोर आली, जेव्हा दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर आरुसा आलमने स्पष्टीकरण दिले होते की,  दोघेही फक्त मित्र आहेत.

अमरिंदर सिंग यांच्या ‘कॅप्टन अमरिंदर सिंग: द पीपल्स महाराजा’ या बायोग्राफीमधील एका चॅप्टरमध्ये त्यांच्या या नात्याची चर्चा झाली आहे. ही बायोग्राफी प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी लिहिली आहे.

आता यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा माध्यमातून रंगू लागलीये.

तर झालं असं कि, सुरु असलेल्या वाद- विवादात पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून येन ट्विट टाकलं. ज्यात त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अरूसा आलम यांच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं.

पण काहींचं वेळात त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. पण ते पत्रकारांच्या नजरेत पडलंच. त्यानंतर पत्रकारांनी सुखजिंदर सिंग यांना प्रश्न विचारला कि, अरूसा आलम पाकिस्तानच्या एजंट आहेत का? त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं कि,

“पंजाबला आयएसआयकडून धोका असल्याचे कॅप्टन सांगत आहेत. त्यामुळे आम्ही अरूसा आलम यांच्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधाबाबत पोलीस महासंचालकांना तपासाचे आदेश दिलेत. सोबतच  पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनचीही चौकशी होणार आहे.”

या वादात उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही उडी घेतली. त्या म्हणाल्या, “कॅप्टन यांच्या काळात पैशांच्या बदल्यात पोस्टिंग करण्यात यायचे. अमरिंदर सिंग पोस्टिंगसाठी पैसे घ्यायचे आणि अरुसाला भेटवस्तू द्यायचे.”

कॅप्टन यांच्या नवीन पक्षाच्या स्थापनेच्या घोषणेवर नवज्योत कौर म्हणाल्या, “पंजाबमध्ये कॅप्टनच्या नव्या पक्षाने काँग्रेसला काही फरक पडणार नाही. कॅप्टन राजमध्ये भेदभावाने काम केले गेले. पण आता प्रत्येक क्षेत्रात विकासकामे मोठ्या प्रमाणावर केली जातील. कॅप्टन साहेबांचे वय सध्या पाठपूजा करण्याचे आहे. आणि आपला उर्वरित वेळ त्यांनी  अरुसा आलमसोबत घालवावा. 

आता यावर कॅप्टन थोडीना गप्प बसणार आहेत. अमरिंदर सिंग यांचे सल्लागार रवीन ठुकराल यांनी अमरिंदर सिंग यांच्या हवाल्याने एकामागून एक ट्वीट केले. त्यांनी सोनिया गांधी आणि अरूसा याचाही फोटो पोस्ट केलाय.

 

सोबतच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले,

“कॅबिनेटमधील सहकारी म्हणून सुखजिंदर सिंग यांनी कधीही अरूसा यांच्याबाबत तक्रार केल्याचं मला आठवत नाही. अरूसा मागील १६ वर्षांपासून भारत सरकारच्या मंजुरीनुसार भारतात ये- जा करतात. त्यावेळी तुम्हाला हा गुप्तचर संबंध आठवला नाही जो आता सापडलाय. त्यावेळी NDA आणि UPA सरकारचा काळ होता. त्यांचाही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”

कॅप्टन एवढ्या वरचं थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “सध्या दहशतवादाचा धोका देशावर आहे आणि त्यात सणसुद सुद्धा जवळ आलेत, अश्या वेळी कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं असताना तुम्ही पोलीस महासंचालकांना आधारहीन आरोपांचा तपास करायला लावताय. तुम्ही व्यक्तिगत हल्ले करण्यापेक्षा  बरगारीमधील पवित्र ग्रंथाची चोरी आणि ड्रग्जप्रकरणी दिलेली मोठमोठी आश्वासनं पूर्ण करण्यावर भर दया. ते कधी करणार?

आता आरोप- प्रत्यारोपाचं हे सत्र सुरूच राहणार आहे. पण पुढे काय घडणार हे सुद्धा ते पाहून सुद्धा तितकंच इन्टरेस्टिंग असेल एवढं नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.