अमर्त्य सेनच नाही तर केंद्राच्या कोरोना विषयक धोरणावर या दिग्गज विचारवंतांनी टीका केली आहे

देशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. संक्रमितांची संख्या जरी कमी- जास्त होत असली तरी संसर्ग काय पूर्णपणे संपलेला नाहीये. आरोग्य यंत्रणा खिळखिळी होऊन बसलीये. कुठ ऑक्सिजन तर कुठ खाटांचा तुटवडा जाणवतोय, त्यात आता अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामूळ नवं संकट उभं राहिलंय. अश्या परिस्थितीत सगळीकडून केंद्राच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जातायेत.  विरोधक आणि सामान्य जनतेसोबतचं आता तज्ञसुद्धा म्हणतायेत कि, पहिल्या लाटेनंतर जेव्हा वेळ होता, तेव्हा मोदी सरकारनं त्यावर काम का नाही केलं?

  • अमर्त्य सेन

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला मोदी केंद्र जबाबदार असल्याचं म्हंटलय. त्यांनी मोदी सरकारच्या कोरोनासंबंधित धोरणाविषयी टीका करत म्हंटल कि,  “केंद्राने झालेल्या गोष्टींच श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रित केलं. आणि कोविड १९ चा प्रसार रोखण्याकड दुर्लक्ष केलं,  त्यामुळच आज ही परिस्थिती निर्माण झालीये. “

त्यांच्यामते भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे, ज्याच्यामदतीने आपण या साथीचा योग्य प्रकारे सामना करू शकलो असतो. अमर्त्य सेन यांनी केंद्राच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर सुद्धा आपली भूमिका मांडली.

त्यांनी म्हंटल कि, ‘ भारत सगळ्या जगाला वाचवेल, अशी प्रतिमा  केंद्र सरकार जागतिक पातळीवर करत राहील. मात्र देशात होणाऱ्या परिस्थितीवर त्यान साफ दुर्लक्ष केल. या दरम्यान, भारतासाठी  आधीचं मोठी समस्या असणाऱ्या बेरोजगारी, मंद विकास आणखी गंभीर बनत गेल्यात.”

  • डॉ. फौची

भारतातल्या कोरोनाच्या वाढत्या संसार्गावर देशाबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आलीये. अमेरिकेचे टाॅप संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी  फौची यांनी म्हंटल कि,

एकीकडे प्रकरण वाढत असतांना  भारतानं  गैरसमज बनवला कि, आपल्या इथं कोरोना संपलाय. त्यामुळे त्यांनी वेळेआधीच देश अनलॉक केला. ज्यामूळ भारत आता गंभीर संकटात सापडलाय.

  • डॉ.रघुराम राजन

माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनीही भारतात सध्याच्या सुरु असलेल्या परिस्थितीला  दूरदृष्टी व सतर्क नेतृत्त्वाच्या अभावाचे उदाहरण असल्याचं म्हंटल. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीत सांगितल कि,

‘इतर देशांच्या तुलनेत पहिल्या लाटेनंतर भारताला कमी नुकसान झालं होत. पण त्यानंतर झालेल्या दुर्लक्षपणामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थितीत आणखी बिकट बनली. त्यांच्यामते भारत सरकार जर सावधान असत, सतर्क असत तर समजू शकल असत कि, देशातून कोरोना अजून गेला नाहीये.’ 

यासाठी भारतान जगात काय चाललंय ते पाहायला पाहिजे होत, खासकरून ब्राझीलमध्ये. पण सरकारनं याकडे कानाडोळा केला आणि कोरोना परत आला ते पण नवीन व्हेरीयंट घेऊन. यासोबतचं त्यांनी लसीकरणाच्या कासवगतीने सुरु असलेल्या प्रक्रियेलाही या परिस्थितीसाठी दोषी मानलंय. त्यांच्यामते, भारताच्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता होती. पण भारतानं आधी  दुसऱ्या देशांना लसी पाठवल्या. ती लस आता भारतासाठी कामी आली असती. ‘

  • रामचंद्र गुहा

गेल्या महिन्यात आयुष मंत्रालयाने  कोविड -१९ संकटाला तोंड देण्यासाठी काही उपाय सांगितले होते, ज्यात  तीळाच तेल, नारळ तेल आणि गायीच्या तुपाचा  सकाळ आणि संध्याकाळी वापर करायला  किंवा एक चमचा तीळाचं तेल किंवा नारळ तेल तोंडात  ठेवून आणि नंतर कोमट पाण्याने गुळणा करायला सांगितल. यात हर्बल टी, वाफ घेणही होत. आणि सांगितल गेल की,  जर देशभक्ताने या उपायांचे पालन केले तर त्याला कोरोना  होणार नाही. सत्ताधारी पक्षाचे नेतेही या कामात गुंतले.

यावर इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हंटल कि, भाजपा नेते आणि खासदार विजय संकेश्वर यांनी नाकात लिंबाचा रस घालण्याचा सल्ला दिला. ८० टक्के ऑक्सिजन वाढविण्याचा दावा यात केला गेला.  नंतर बातमी प्रकाशित झाली की,  त्यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांच्या अनेक कुटुंबांनी हा सल्ला मानल्यामुळे मृत्यू झाला. भाजपा नेते बी.एल. संतोष यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा वाफ घेतानाचा फोटोही व्हायरल केला. तर मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी ‘हवन’ कोरोनाशी लढण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून सांगितला. तर, साध्वी प्रज्ञाने गोमूत्र पिण्यामुळे कोरोना होत नाही, असा प्रचार केला.

यासोबतच गुहा यांनी ५ वाजून ५ मिनिटांनी टाळी- थाळी वाजवण्याची आणि रात्री ९ वाहता लाईट बंद करून मेणबत्ती लावण्याचा मोदींच्या  आग्रहाची आठवण करून दिली. गुहा यांनी मोदींच्या पुढाकाराने कुंभमेळ्याच्या आयोजनावर आणि नंतर कोरोना वाढल्यावर  त्याच्या बंदिवरही बोट ठेवलं.  

  • डॉक्टर शाहिद जमील

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटचा तपास करणाऱ्या आयएनएसएसीओजीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर शाहिद जमील यांनी गेल्या महिन्यातचं आपल्या पदावरून   राजीनामा दिला होता. त्यांनी यामागच  कारण सांगितल नव्हत. पण  डॉ. जमील यांनी देखील एका वृत्तपत्रात लेख लिहून भारतातल्या कोविड १९ मॅनेजमेंटवर टीका केली होती. ज्यात त्यांनी कमी टेस्टिंग, लसीकरणाचा मंद वेग, आणि लसींच्या तुटवड्यावर प्रश्न उपस्थित केले होते. आणि सोबतच देशात मोठ्या  हेल्थकेअर वर्कफोर्सची गरज असल्याचे म्हंटले होते.  

डॉ.जमील यांनी असेही लिहिले होते कि, त्यांच्या या वक्तव्याला अनेक वैज्ञानिक  साथीदार देखील सहमत  आहेत. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.