चीनमध्येही एक स्टीव्ह जॉब्स आहे, तो कॉपी करुन मोठा झालाय…

आज भारतातलं सगळ्यात जास्त मोबाइल विकणाऱ्या कंपन्यांत चायनीज कंपन्या सगळ्यात पुढे आहेत हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाहीये. तुमच्या पैकी अनेक जण हि बातमी तुमच्या रेडमीचीच्याच मोबाईलवर स्क्रोल करत असाल. आधी नुसते ॲप्पलसारख्या कंपन्यांना पार्टस बनवून देणारा चायना आज जगातले सगळ्यात जास्त मोबाइल कसे विकतोय हे तुम्हाला या कंपनीवरून कळेल.तर आपण बघतोय शाओमी कंपनीबद्दल. 

एमआय, रेडमी हे सगळे शाओमीचीचेच भाग आहेत. 

१६ डिसेंबर १९६९ रोजी जन्मलेला  लेई जून हा जगातल्या  तिसऱ्या सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्माता कंपनी – Xiaomi Inc चा संस्थापक आहे. लेई जून हा असा माणूस आहे ज्याने Xiaomi ची स्थापना केल्यापासून अवघ्या तीन वर्षातच चीनमधील स्मार्टफोन ब्रँडचा चौथा सर्वात मोठा ब्रँड बनवला आहे.  लेईचा जन्म चीनमधील हुबेई येथील झियानताओ येथे झाला. त्याचे बालपणीचे दिवस मध्य चीनमधील वुहानच्या औद्योगिक शहराजवळ गेले आणि नंतर १९९१ मध्ये वुहान विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात बीए देखील पूर्ण केले.

विद्यापीठात असताना, त्याने स्टीव्ह जॉब्सबद्दलचे पुस्तक वाचलं.

 तो पुस्तक पाहून तो खूप भरवून गेला होता. आपनही असाच व्यवसाय करायचा जो टॉप क्लासचा असेल असं त्याने ठरवलं. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी झपाट्याने महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे ठरवले होते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, लेईने १९९२ मध्ये किंग्सॉफ्ट या चिनी सॉफ्टवेअर कंपनीत (तेव्हा स्टार्ट-अप) इंजिनियर म्हणून काम करायला सुरुवात केली.

ज्यांना माहिती नाही अशा सर्वांसाठी सांगायचे म्हणजे किंग्सॉफ्ट मायक्रोसॉफ्टसारखंच काम करतं.

या कंपनीत त्याने मग आपल्या प्रतिभेच्या जोरावर CEO पर्यंत मजल मारली. त्याने कंपनीत असतानाच JOYO.कॉम ची स्थापना केली अमेझॉन सारखं पुस्तक विकणाऱ्या या कंपनीला अमॅझॉननेंच विकत घेतले. पुढे या कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा देत त्यांनी स्वतःची कंपनी काढायचं ठरवलं. शेवटी दोन वर्षांनंतर, वेगाने वाढणाऱ्या मोबाईल स्पेसमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, Lei ने २०१० मध्ये Xiaomi Inc ची स्थापना केली.

आता प्रश्न येतो अवघ्या तीन वर्षात कंपनी एवढी मोठी कशी झाली तर उत्तर आहे चीनमध्ये मोबाइल पार्टस आधीच बनत असल्याने सप्लाय चैन आधीच तयार होती.

नावाने येणाऱ्या कंपन्यांना फक्त ते ऑर्डर करून असेम्बल करायचे होते. आता या कंपन्या त्या पार्टस यामध्ये थोडे चेंजेस करून विकणार असल्याने डायरेक्ट कॉपी पण म्हणता येत नव्हतं. त्यामुळं स्वस्तात मस्त क्वालिटी देण्याच्या या तत्वाने शाओमी मार्केटमध्ये उतरले.

अप्पलनेही त्यांचे बरेच प्रोडक्ट कॉपी होत आहेत हे पाहूण कंपनीवर दावा पण ठोकला मात्र त्याचा काई फायदा होत नाहीये.

त्यात आता ब्रँड पण त्यांच्यावरचा कॉपीचा शिक्का पुसत जॅम पुढं गेला आहे. शाओमी  ब्रँड आता स्वतःची  टेक्नॉलॉजी  घेऊन मार्केटमध्ये उत्तरला आहे. त्यामुळं ज्या अमेरिकन कंपनीचे पार्टस कॉपी केले त्याच कंपन्यांना आज शाओमीनं मागे टाकलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.