कधीकाळी वेटर म्हणून काम करणाऱ्या निलेशच्या चित्रांचं प्रदर्शन ताज आर्ट गॅलरीत भरणार आहे

परिस्थिती अनेक गोष्टी शिकवत असते. त्यातील एक गोष्ट म्हणजे अड्जस्ट करणे होय. निलेशला तशी लहानपणापासून चित्रांची आवड होती. ७ व्या वर्गात असतांना निलेशच्या चित्रकलेच्या स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. पेपर मध्ये नाव सुद्धा छापून आले होते. 

लहान वयातच घराची जबाबदारी आली आणि चित्र काढण्याऐवजी हॉटेल मध्ये काम करावे लागले. मात्र निलेशने हार मानली नाही. दिवसा काम, रात्री शाळा करून निलेश चित्रकार होण्याचे स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन कुलाबा येथील ताज आर्ट गॅलरीत घेऊ असे सांगितले. हे चित्र प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या चित्र प्रदर्शनाला रतन टाटा सुद्धा भेट देणार आहेत. 

निलेश मोहितेचा जन्म मुंबईचा. 

तो सतत आजरी पडत असल्याने त्याला आजीकडे पाठवण्यात आले. त्यामुळे निलेशच लहानपण आईच्या गावी रायगड जिल्ह्यात गेले. दोन्ही भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर होती.निलेशची आई आपल्या भावांसोबत राहत  घरकाम करायच्या. 

गावात असतांनाच निलेशला चित्र काढण्याची आवड निर्माण झाली होती.  निलेशचे ८ वी पर्यंतचे शिक्षण हे गावाकडेच झाले. त्यानंतर निलेश यांनी सुद्धा मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या शाळेत ऍडमिशन घेतले. मात्र याच सुमारास निलेशच्या आईचे ऑपरेशन झाले आणि डॉक्टरांनी त्यांना काम बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे निलेशने आपले शिक्षण सोडले आणि काम करायला सुरुवात केली.   

सकाळी ७ ते ९ पार्ट टाईम जॉब मंत्रालय समोरील युनियन बँकेत साफ सफाईचे काम निलेश करायचा. त्यानंतर परत घरी येऊन १० ते ६ या वेळेत कुलाब्यातील एका ऑफिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. कामावरून परत आल्यानंतर सिद्धार्थ कॉलेजे मध्ये नाईट स्कुल मध्ये जात असे. कफ परेड मच्छिमार नगर येथे तर ही गोष्ट आहे ८ बाय ८ च्या झोपडपट्टीत निलेश राहत.   

मात्र दुसरीकडे निलेशने चित्र काढायचे सोडले नव्हते. घरी देऊन उरलेल्या पैशातून तो एक एक कलर विकत घेत असे. त्यावेळी निलेशला जहांगीर आर्ट गॅलरी बद्दल माहिती दिली. आणि महत्वाचं म्हणजे निलेश राहत असलेल्या जागेपासून ती आर्ट गॅलरी हाकेच्या अंतररावर होती.

जहांगीर आर्ट गॅलरी जवळ असल्याचे आणि चिंत्राची आवड असल्याने निलेश जसा वेळ मिळेल तसा तिथे जाऊ लागला. इथे त्याला अनेक दिग्गज चित्रकारांची पेंटिंग पाहायला मिळाली. त्यामुळे त्यानं चित्रावर जास्त काम करण्याचा निश्चय केला. मात्र त्यांनी इतर मोठ्या चित्रकाराच्या पेंटिंग पाहून कुठला कलर कुठे वापरता कसे वापरता याचा बारीक अभ्यास केला. या सगळ्या गोंधळात निलेशला १० वीचे पेपर देता आले नाही.

५ वर्षांपूर्वी निलेश क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये वेटर म्हणून काम करत असे.

उचभ्रु लोकांचा हा क्लब समाजाला जातो. निलेश इथे वेटर म्हणून काम करायचा. ऑर्डर घेण्यासाठी गेल्यावर त्याला २ ते ५ मिनिट मिळायची. त्यावेळेत निलेश समोरच्या व्यक्तीचे डायरीवर चित्र काढत असे. ऑर्डर घेतांना निलेश डायरीत काही तरी करत असल्याचे मॅनेजरने पाहिले. मॅनेजरला वाटले हा काही तरी टाईमपास करत आहे. मात्र ज्यावेळी मॅनेजर निलेशने काढलेले चित्र पहिले तो आनंदी झाला.

त्यानंतर त्या मॅनेजरने निलेश काढलेले चित्र त्या व्यक्तीला दाखवले. ते आश्चर्यचकित झाले आणि निलेशला प्रश्न केला की, तुम्ही वेटर म्हणून काय करता आहे? त्याव्यक्तीने निलेशची इतर लोकांशी ओळख करून दिली. ज्या आपले पेंटिंग काढायचे होते.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मधील व्यक्तींनी पेंटिंगचे निलेश त्याचा अपेक्षे पेक्षा जास्त पैसे दिले. निलेशला वाटले की, आपण महिना भर काम करून सुद्धा एवढे पैसे मिळत नाहीत. एक पेंटिंग जर एवढे पैसे मिळवून देत असेल तर आपण इतर काम का करायचे असे निलेशच्या लक्षात आले. त्यानंतर निलेश बाकीचे काम डोसून दिले आणि फुल्ल टाइम पेंटिंग काढण्याचे काम करू लागला

रतन टाटांची एक भेट निलेशला सगळं काही देऊन गेली

फायटर विमानात रतन टाटा चढत आहे असे चित्र निलेश याने काढले होते. निलेशला हे चित्र टाटांना द्यायचे होते. मात्र त्यांच्या पर्यंत कसे पोहचावे हे त्याला समजत नव्हते. निलेश अनेक दिवस रतन टाटा यांच्या ऑफिस समोर जाऊन उभा असायचा. मात्र त्याला टाटा यांना भेटण्याची  संधी काही मिळाली.

टाटा यांच्या वाढदिवसा निम्मित ऑफिस मध्ये अनेक जण भेटायला जात असतं. २०१९ मध्ये  रतन टाटा यांचा वाढदिवसा निम्मीती कुलाब्यातील काही राजकीय नेते टाटा यांना भेटायला जात होते. त्यांच्यासोबत निलेशला टाटा यांची भेट घेता आली.

यावेळी पहिल्यांदा निलेशची भेट टाटा यांच्याशी झाली. निलेशने काढलेलं पेंटिंग पाहून रतन टाटा प्रभावित झाले. तसेच टाटा यांनी निलेशशी बोलतांना घरी कोण कोण असतं,  घराची परिस्थिती कशी आहे. हे सगळं विचारलं. त्यावेळी निलेश ने घरची सत्य परिस्थिती सांगितली. लहानपणी वडील वारले, आई घरोघरी जाऊन मोलकरणीचे काम करते. निलेश हॉटेल आणि इतर ठिकाणी काम करून चित्रकलेची आवड जपत असल्याचे सांगितले. एवढा मोठा कलाकार अशा प्रकारे राहत असल्याने त्यांना वाईट वाटले होते. 

टाटांनी निलेश दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला यायला सांगितले भेटल्यावर टाटा म्हणाले की, तू ८ बाय ८ च्या खोलीत राहतो. तिथे चित्र काढायला, ते ठेवायला जागा पुरत नसेल. असं म्हणतं रतन टाटा यांनी निलेश समोर कोरा चेक धरला आणि सांगितले की, तुला हवे तेवढी पैसे लिह आणि घे. त्यामुळे तू एखादी चांगली रूम घेऊ शकशील.

मात्र निलेश ने साफ शब्दात नकार दिला. तुम्ही मला ज्या पेंटिंगसाठी पैसे देत आहेत ते वाढदिवसाचे गिफ्ट आहे. त्यासाठी मी पैसे घेऊ शकत नाही. तुम्हाला तर माझ्या कलेची कदर असेल तर मला काम द्या असं निलेशने सांगितले. मला पेंटींगचे काम द्या ते पैसे मी घेईल असे निलेशने सांगितले.

निलेश यांच्या पेंटिंगच प्रदर्शन चांगल्या जागी भरवण्यात येईल असे टाटांनी सांगितले होते.

 मात्र मध्यंतरी लॉकडाऊन मध्ये ते घेता आले नव्हते. त्यानंतर मात्र टाटा यांनी निलेशच्या चित्रांचं प्रदर्शन घेण्याचे ठरविले. यानंतर निलेश टाटा यांना २० ते २२ वेळा भेटला आणि त्याला भेटायला कधीही टाटा नाही म्हणत नाहीत.  टाटा यांनी निलेश बोलावून घेतले आणि तुझ्या चित्रांचं प्रदर्शन कुलाबा येथील ताज आर्ट गॅलरीत घेऊ असे सांगितले. हे चित्र प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. 

याबाबत बोल भिडूशी बोलतांना निलेश म्हणाला की, 

चित्रांचे प्रदर्शन भरत असल्याने आनंद होत आहे. या प्रदर्शनाला रतन टाटा सुद्धा येणार आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाचे सार्थक झाले आहे असे वाटत आहे. अनेकांकडून कामाचे कौतुक होते त्यामुळे बळ मिळते. 

गरिबीची जाण असलेले निलेश हे सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत. त्यांनी अनेक गरजवंतांना मदत केल्याची उदाहरणे आहेत. कधीही आर्ट कॉलेजे मध्ये न गेलेल्या निलेशच्या चित्रांना लाखो मिळत आहे. 

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.