पाकिस्तानच्या संसदेत ‘हनुमानाची गदा’ का ठेवली जाते…?

पाकिस्ताच्या संसदेतील कामकाजाचे अनेक रंजक व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असतात. अशाच एका व्हिडीओमधील एक गोष्ट सोशल मिडीयावर लोकांचं लक्ष वेधून घेतेय. ही गोष्ट म्हणजे ‘हनुमानाची गदा’

लोकांकडून प्रश्न विचारला जातोय की पाकिस्तानच्या संसदेत ही हनुमानाची गदा नेमकी काय करतेय. गदा नेमकी तिथं कुणी आणि का ठेवली..? लोक प्रश्न विचारताहेत आणि त्यावर अनेक लोक अनेक रंजक उत्तरंही देखील देताहेत. बऱ्याच जणांना हा व्हिडीओ एडीटेड वाटतो.

tweets

तर भिडू लोकांसाठी आम्ही घेऊन आलोय या प्रश्नाचं नेमकं आणि अचूक उत्तर.

व्हिडीओज एडीटेड आहेत का..?

सर्वप्रथम तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्या की हे व्हिडीओज एडीटेड नाहीत किंवा त्यांच्यासोबत काही छेडछाड देखील करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या संसदेत खरंच अशा प्रकारची गदा ठेवण्यात येते.

पाकिस्तानच्याच नाही तर लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेल्या इतर अनेक देशांच्या संसदेत देखील अशी गदा असते. स्वातंत्र्यापूर्वी भारतात देखील अशी गदा वापरण्यात येत असे पण स्वातंत्र्यानंतर ती हटवण्यात आली.

गदा ठेवण्यामागचा नेमका तर्क काय..?

संसदेतील सभापतीसमोर गदा असण्याला तार्किक कारण आहे. गदा ही फक्त एक शस्त्र म्हणून नाही तर व्यक्तीच्या स्वायत्ततेचं लक्षण मानली जाते.

हिंदू धर्मानुसार गदा धारण करणारी व्यक्ती ही क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, वासना  यांसारख्या मानवी दोषांपासून मुक्त असते. म्हणूनच हनुमानाव्यतिरिक्त इतरही हिंदू देव-देवतांकडे आपल्याला गदा बघायला मिळते.

गदा ही व्यक्तीला शासन करण्याचा अधिकार देखील प्रदान करते. म्हणूनच लोकशाही देशांमध्ये या गदेला ‘राजदंड’ म्हणूनही संबोधण्यात येतं.

कुठल्याही लोकशाही देशातील संसदेची जी सभागृहे असतात त्यांच्या प्रमुखाने देखील आपले सर्व पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित असतं. सत्ताधारी आणि विरोधक या दोहोंपैकी कुठल्याही पक्षाप्रती त्याची निष्ठा असू नये आणि त्याने दोघांनाही समानतेने वागवावं असं अपेक्षित असतं.

ज्या व्यक्तीसमोर गदा ठेवलेली असते ती व्यक्ती मानवातील उपर्रोलिखित दोषांपासून मुक्त असल्याचं मानण्यात येत असल्याने तसेच ही गदा त्या व्यक्तीला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं यांचं भान देत असल्याने संसदेत अध्यक्षासमोर किंवा सभापतीसमोर अशी गदा ठेवण्याचा प्रघात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.