अपघातावेळी मिस्त्रींची कार चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पारशी समाजासाठी यामुळे महत्त्वाच्या आहेत

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा काल कार अपघातात मृत्यू झाला. या कार अपघातामुळे बरेच जण हायवेवरचे ब्लॅक स्पॉट्स, बेन्झ मर्सिडीज एसयूव्ही कारआणि ऍक्सीडेन्ट बद्दल चर्चा करत आहेत.

तर काही जण अपघाताच्या वेळेस कार चालवत असलेल्या अनाहिता पंडोले यांच्याबद्दल सुद्धा चर्चा करत आहेत. पंडोल कार चालवत होत्या मात्र त्या काही कार ड्रायव्हर नाहीत. तर त्या प्रसिद्ध ग्लायनोकॉलॉजिस्ट आहेत.

ग्लायनोकॉलॉजिस्ट असण्याबरोबरच डॉ. अनाहिता पंडोले पारशी समाजासाठी फार महत्वाच्या आहेत. 

डॉ. अनाहिता पंडोले यांनी टीएनएमसी अँड बिवायएल नायर हॉस्पिटलमधून एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांना १८ वर्षांचा ग्लायनोकॉलॉजिचा अनुभव आहे. तसेच डॉ. अनाहिता या अल्पसंख्यांक पारशी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘जियो पारशी’ योजनेच्या इन्चार्ज सुद्धा आहेत. त्यामुळे संपूर्ण पारशी समाजासाठी त्यांचं मोठं महत्व आहे. 

पण ही पारशी समाजासाठी राबवली जाणारी जियो पारशी योजना नेमकी आहे तरी काय?

तर भारतात राहणाऱ्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांपैकी पारशी धर्मातील लोकांची संख्या ही सगळ्यात कमी आहे. तसेच पारशी धर्मातील लोकांची संख्या कमी असण्याबरोबरच दिवसेंदिवस आणखीनच कमी होत चालली आहे. १९४१ च्या जनगणनेनुसार भारतात एकूण १ लाख १४ हजार पारशी लोकं राहत होते. मात्र २०११ च्या जनगणनेनुसार भारतात केवळ ५७ हजार २६४ पारशी उरलेले आहेत. 

बाकी धर्मीय लोकांची संख्या वाढत आहे मात्र याउलट पारशी धर्मातील लोकांची संख्या कमी होत आहे.  दिवसेंदिवस घटत असलेली पारशी धर्मातील लोकांची लोकसंख्या वाढावी त्यासाठी केंद्र सरकारने २०१३ मध्ये ‘जियो पारशी’ नावाची एक योजना लागू केली होती. ही योजना केंद्र सरकारची असली तरी पारशी समुदायाच्या परजोर फाउंडेशनच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाते. 

या योजनेअंतर्गत पारशी धर्मातील लोकांची संख्या कमी होण्यासाठी जबाबदार असलेल्या समस्यांवर उपाय केले जातात. 

पारशी धर्मातील लोकांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारण आहेत. पारशी धर्मात लग्न करण्याऱ्या मुलींचं सरासरी वय २७ वर्ष आहे. तर मुलांचं सरासरी वय ३१ वर्ष आहे. तरीही पारशी समाजात लहान मुलांची संख्या कमी आहे. तब्बल ९ पारशी घरांपैकी एकाच घरात १० वर्षापेक्षा लहान मुलगा दिसतो.

पारशी धर्मात नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमी असण्यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे पारशी धर्मातील तब्बल ३१ टक्के लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. तर दुसरं कारण म्हणजे ३० टक्के पारशी लोकांनी आयुष्यात लग्नच केलेलं नाही. त्यामुळे पारशी समाजातील जन्मदर कमी झाला आणि पारशी समाजाची लोकसंख्या कमी झाली.

किमान जन्मदर हा १.८ असावा असं मानलं जातं परंतु पारशी समाजात वर्तमान जन्मदर हा ०.८ आहे.

पारशी समाजात मुळात जन्मदर कमी आहे आणि मृत्युदर कमी आहे. दरवर्षी साधारणपणे ३०० पारशी बालकांचा जन्म होतो तर साधारणपणे ८०० लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो. त्यामुळे पारशी समाजात जन्मदर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने जियो पारशी योजना लागू केलीय.  

या योजनेअंतर्गत पारशी धर्मातील महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व कमी करण्यासाठी उपचार केले जातात. प्रजननाशी निगडित असलेल्या सर्व समस्यांवर उपचार केले जातात. तसेच विवाह केल्यांनतर जोडप्यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावं यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. 

या योजनेत इन विट्रो फर्टिलायझेशन, इंट्रा सायट्रोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, एग डोनेशन हे सगळे उपचार सरकारतर्फे निशुल्क करण्यात येतात. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय आणि परजोर फाउंडेशनच्या माध्यमातून ही योजना चालवली जाते. याच योजनेच्या इन्चार्ज म्हणून डॉ. अनाहिता पंडोले यांची नियुक्ती करण्यात आली होती.

जियो पारशी योजनेत अनाहिता पंडोले यांच्या माध्यमातून मुलांच्या जन्मप्रमाणात सुधारणा होत आहे.

पारशी समाजातील मुलांच्या पारंपरिक जन्माबरोबरच या योजनेनुसार अधिकच्या मुलांचा जन्म होतोय. त्यात २०१४ मध्ये १६, २०१५ मध्ये ३८, २०१६ मध्ये २८, २०१७ मध्ये ५८, २०१८ मध्ये ३८, २०१९ मध्ये ५९ तर २०२० मध्ये ६१, २०२१ मध्ये ९४ तर २०२२ च्या जानेवारी ते मार्च महिन्यात एकूण ४२ मुलांचा जन्म झालाय.

बॉम्बे पारशी पंचायतीत सहभागी असलेल्या डॉ. अनाहिता पंडोले यांनी आपल्या ग्लायनोकॉलॉजिस्ट प्रोफेशनबरोबरच जियो पारशी योजनेला यशस्वी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. या योजनेअंतर्गत गेल्या ९ वर्षांमध्ये एकूण ४३४ पारशी बालकांचा जन्म झालाय. 

या योजनेत जेव्हा जेव्हा बालकांच्या जन्माचा आकडा कमी व्हायचा, तेव्हा तेव्हा डॉ. अनाहिता पंडोले यांनी पुढाकार घेऊन त्यात सुधारणा घडवून आणली. वरकरणी हा आकडा फार लहान वाटत असला तरी केवळ ५७ हजार लोकसंख्या असलेल्या पारशी समाजात हा फार महत्वाचा बदल आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.