मुंडे शेवटपर्यंत आग्रही होते परंतु आनंदराव बापूंनी शेकाप सोडली नाही..

शेतकरी कामगार पक्ष म्हंटल की लागलीच सांगोल्याचे स्व. गणपतराव देशमुख, सांगलीचे एन. डी. पाटील, रायगडचे जयंत पाटील, कंधारचे केशवराव धोंडगे यांची नाव समोर येतात. असच एक नाव जे बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाशी शेवटपर्यंत एकरूप राहील ते म्हणजे आनंदराव (बापु) चव्हाण यांच.

शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सहकार महर्षी भाई आनंदराव चव्हाण. ते एके काळचे जिल्ह्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते तसेच सहकारावर मजबूत पकड असणारे नेते होते. बीड जिल्ह्यात शेकाप वाढवण्यामध्ये व लोकसभेला डाव्या विचारांच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सत्यशोधक चळवळीने भारावलेल्या आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाने कंटाळलेल्या काही मराठी तरुणांनी काँग्रेसलाच पर्याय होऊ शकेल असा पक्ष काढायचं ठरवलं.

साल होत १९४७. नाव ठरलं शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी लढणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष (शेकाप). मोरे, जेधे,जवळकर, उस्मानाबादचे भाई उद्धवराव पाटील अशा ताज्या दमाच्या तरुणांनी स्थापन केलेल्या पक्षाने अल्पावधीतच काँग्रेसला टक्कर देऊन राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष बनण्यापर्यंत मजल मारली. राष्ट्रीय पातळीवर पाळंमुळं घट्ट रोवलेल्या काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांचा अक्षरश: ढीग झाला होता.

काँग्रेसमधील प्रस्थापीत नेतृत्वामुळे न मिळणाऱ्या संधी, सत्यशोधकी विचारधारा, राज्यात दरारा असलेला, प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पुढे आलेला, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी लढणारा, डाव्या विचारांची धार कायम जिवंत ठेवणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष हा राज्यात झपाट्याने पुढे आला. शेकापच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र, शेतकरी आदी प्रश्नांसंबंधी उठवलेला बुलंद आवाज व त्यावरील त्यांची रोखठोक भाषण यांमुळे राज्यभरातील सर्व सामान्य घरातील युवक हे भारावून जाऊन त्यांच्याकडे आपसुकच खेचले जाऊ लागले.

बीड जिल्ह्यातही आनंदराव चव्हाण या तरुण युवकाने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शेकापचा झेंडा हाती घेतला. कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेल्या आनंदरावानी आपल्या हातोला गावापासून राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 

पूर्वीचा रेणापूर विधानसभा मतदार संघ हा लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुका असा विभागलेला होता. आनंदराव बापूंनी या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेऊन या भागात शेकापचा प्रभाव वाढवला. ग्रामीण राजकारणाचा पाया असलेल्या सहकार क्षेत्रात त्यांनी आपली मजबूत पकड निर्माण केली. 

१९५२ साली वामनराव देशमुख हे रेणापूर मतदार संघातून निवडून आले. यावेळी तरुण आनंदरावानी त्यांचा जोरदार प्रचार केला होता. १९६२ साली शेकाप-कम्युनिस्ट पक्षातर्फे रेणापूर मधून उभे असलेले गणपती अण्णा हे डाव्या विचार सरणीचे उमेदवार विधानसभेवर निवडून आले. 

पुढे १९६७ साली “पत्रीसरकार क्रांतिसिंह नाना पाटील हे आनंदराव चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. या गुरु शिष्याची ही अदृश्य युती पुढे अनेक दिवस टिकली. 

शेजारच्या लातूर जिल्ह्यातील शिवाजीराव कव्हेकर देखील मार्गदर्शनासाठी बापूंकडे येत. याच कव्हेकरांनी १९९५ साली लातूर मधून विलासराव देशमुखांचा पराभव केला होता. तीन वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले जयसिंगराव गायकवाड पाटील, मराठवाडा शिक्षक आमदार प.म. पाटील अशा अनेक सर्वसामान्य जनतेतील नेत्यांना आनंदराव बापूंनी नेहमीच सहकार्य, मार्गदर्शन केल. 

याच काळात सबंध राज्यभरात काँग्रेसने शेकापला हद्दपार केलं पण इथे बीड मध्ये मात्र शेकापने विरोधकांच्या साथीने काही काळासाठी का होईना जिल्ह्यातून काँग्रेसलाच हद्दपार केलं ज्यातुन आज देखील काँग्रेस पक्ष सावरलेला नाही.

पुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप मध्ये अनेक नेते गेल्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे बीड मध्येही शेकाप कमकुवत झाला. याच संधीचा फायदा घेऊन व आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेऊन उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडेंनी बापूंच्या हातोला या गावी भर सभेत आनंदराव बापूंनी आता शेकाप सोडून भाजप मध्ये यावं अशी खुली ऑफर दिली. राज्यातील सत्ताधारी भाजपचा तत्कालीन सर्वात ताकतवान नेता आपल्याला पक्षात येण्यासाठी जाहीर आवतन देतोय म्हंटल्यावर साहजिकच आयुष्यभर संघर्ष करून सत्तेत येण्याची स्वप्न पाहणारा कुठलाही नेता त्या आवाहनाला भुलला असता. 

पण स्वाभिमानी बाणा व तत्वनिष्ठा या महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून आनंदराव बापूंनी मुंडेंच्या विनंतीला नम्रपणे नकार दिला.

बीड जिल्ह्यातून लोकसभेला उभे राहिले. डाव्या विचारसरणीचा उमेदवार म्हणून आनंदराव बापूंनी आपल्या भागात त्यांचा झोकून देऊन प्रचार केला व काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून नाना पाटील हे विजयी झाले. याच वर्षी बापूंनी रेणापुर मतदार संघातुन विधानसभा निवडणूक लढवली परंतु यात त्यांचा पराभव झाला. परंतु खचून न जाता त्यांनी एकनिष्ठपणे आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन आपले कार्य सुरूच ठेवले. १९७२ च्या दुष्काळात अंबेजोगाई येथे त्यांनी काढलेला शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्व सामान्य लोकांचा मोर्चा हा त्याकाळी विक्रमी गर्दी खेचनारा, विरोधकांची धडकी भरवणारा होता.

पुढे १९७७ साली कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ गंगाधर बुरांडे हे बीड मधून लोकसभेला उभे राहिले. डाव्या विचारसरणीचे उमेदवार म्हणून शेकापने आपला उमेदवार उभा न करता बुरांडेंना पाठिंबा दिला.

 यात बुरांडेंच्या प्रचारासाठी त्यांच्यासोबतच्या आनंदराव बापू, कों. बापूसाहेब देशमुख, डॉ. द्वारकादास लोहिया व इतर सहकाऱ्यांनी सबंध बीड जिल्हा ढवळून काढला. त्याकाळी आजच्या एवढी दळणवळणाची साधन नसतानाही सर्वांनी गाव, वाड्या, तांडे, वस्त्यांवर जाऊन प्रचार केला. 

परिणामी गंगाधर अप्पा बुरांडे हे विजयी झाले. ९०च्या दशकापासून अस्मितांचं, सांप्रदायिकतेचं, जातीयवादाचं राजकारण वाढलं. त्यासमोर आनंदराव बापूंचा साधेपणा, सुसंस्कृतपणा, तत्वनिष्ठा टिकू शकली नाही.

आधुनिकीकरनाच्या नावाखाली स्वार्थ, सत्ता, पैसा आदी गुण असलेले पुढारी वेगाने पुढे येऊन लागले व मोठे होऊ लागले. आधी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीमध्ये शेकापच्या अनेक नेत्यांनी व त्यांच्या मुलांनी प्रवेश केला. सर्वाधिक काळ विरोधी पक्ष राहिलेल्या शेकापची जागा नंतर भाजप, सेनेन घेतली. याच काळात बीड जिल्ह्याच्या राजकारणात बहुजन समाजातील अंबेजोगाई येथे शिक्षण घेत असताना मुंडेंचा परिचय आनंदराव चव्हाण, भगवानराव लोमटे या त्यावेळच्या तालुक्यातील दिग्गज नेत्यांशी आला. मुंडेंनी रेणापूर मतदार संघातून १९७८ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.

राजकीय व आर्थिक बाजु कमकुवत असतानाही मुंडेंनी पुन्हा निवडणूक लढवली व त्यांनी काँग्रेसचे पंडितराव दौंड, हाबाडा फेम बाबुराव आडसकर यांचा पराभव केला. रेणापूर मतदार संघातील मुंडेंच्या या उदयाला आणि विजयाला आनंदराव चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. या गुरु शिष्याची ही अदृश्य युती पुढे अनेक दिवस टिकली. 

शेजारच्या लातूर जिल्ह्यातील शिवाजीराव कव्हेकर देखील मार्गदर्शनासाठी बापूंकडे येत. याच कव्हेकरांनी १९९५ साली लातूर मधून विलासराव देशमुखांचा पराभव केला होता. तीन वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले जयसिंगराव गायकवाड पाटील, मराठवाडा शिक्षक आमदार प.म. पाटील अशा अनेक सर्वसामान्य जनतेतील नेत्यांना आनंदराव बापूंनी नेहमीच सहकार्य, मार्गदर्शन केल. 

याच काळात सबंध राज्यभरात काँग्रेसने शेकापला हद्दपार केलं पण इथे बीड मध्ये मात्र शेकापने विरोधकांच्या साथीने काही काळासाठी का होईना जिल्ह्यातून काँग्रेसलाच हद्दपार केलं ज्यातुन आज देखील काँग्रेस पक्ष सावरलेला नाही.

पुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप मध्ये अनेक नेते गेल्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे बीड मध्येही शेकाप कमकुवत झाला. याच संधीचा फायदा घेऊन व आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेऊन उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडेंनी बापूंच्या हातोला या गावी भर सभेत आनंदराव बापूंनी आता शेकाप सोडून भाजप मध्ये यावं अशी खुली ऑफर दिली. राज्यातील सत्ताधारी भाजपचा तत्कालीन सर्वात ताकतवान नेता आपल्याला पक्षात येण्यासाठी जाहीर आवतन देतोय म्हंटल्यावर साहजिकच आयुष्यभर संघर्ष करून सत्तेत येण्याची स्वप्न पाहणारा कुठलाही नेता त्या आवाहनाला भुलला असता. 

पण स्वाभिमानी बाणा व तत्वनिष्ठा या महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून आनंदराव बापूंनी मुंडेंच्या विनंतीला नम्रपणे नकार दिला. 

संघर्षातून घडलेलं आणि भाई उद्धवराव पाटील, एन.डी.पाटील अशा दिग्गज स्वाभिमानी नेत्यांच्या तालमीत तयार झालेल्या आनंदराव बापूंच्या या निर्णयाच अनेकांना आश्चर्य वाटलं पण खुद्द मुंडेंना मात्र याच काही नवल वाटलं नाही कारण बापुंसारखा हाडाचा कार्यकर्ता, कर्मठ कार्यकर्ता येवढ्या सहजासहजी आपली निष्ठा बदलणार नाही हे मुंडे चांगलेच जाणून होते. 

पुढेही मुंडेंनी आनंदराव बापूंच मन वळवण्याचे,त्यांना पक्षात घेण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु आनंदराव चव्हाण यांनी शेकापची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. स्वछ पांढरा सदरा, धोतर हा बापूंचा पोशाख. कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी, मजूर, कामगार, अडला-नडला त्यांना केव्हाही सहज रित्या भेटू शकत होता. त्यांच्यातल्या साधेपणामुळेचं स्वार्थ, सत्ता, पैसा यांचा मोह त्यांना आयुष्यभर शिवला नाही. आयुष्यभर आनंदराव बापूंनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले तसेच अनेक लोकोपयोगी कामांची मुहूर्तमेढ रोवली.

“विना सहकार नाही उद्धार” या सहकाराच्या घोषवाक्याचे ते प्रचारक राहिले.

डी. एन. पाटलांना सोबत घेऊन त्यांनी १९७५ साली अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ केला. पुढे सतत दहा वर्षे त्यांनी तिथे संचालक म्हणुन कारभार पाहिला. 

गेली ४५ वर्षे अंबाजोगाई खरेदी विक्री संघाची त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. शिखर बँकेवर म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर ते अनेक वर्षे संचालक होते. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती यांवर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी कारकीर्द गाजवली. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, महाराष्ट्र राज्य देखरेख संघ, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण फायनान्स, कापूस पणन महासंघ व अन्नधान्य मार्केटींग कमिटीचे अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी अनेक वर्षे संचालक म्हणून काम केले. सहकारातील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. 

सहकार तसेच शेती प्रश्नांचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडे यासंबंधी सल्ला घेण्याकरता रांग लागत असे. मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर पाच वर्षांकरिता ते निवडून आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी हातोला या आपल्या गावी जिजामाता शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत महात्मा फुले विद्यालय चालवले जाते. 

आनंदराव बापुंच्या दूरदृष्टीमुळेच साखर कारखाना, बाजार समिती, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, सेवा सहकारी सोसायटी आदींच्या माध्यमातून या भागातील सर्वसामान्य नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, शेतकर्यांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली, स्थानिक कामगारांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळू शकले. त्यांनी सुरु केलेल्या गावातील एका शाळेमुळे पंचक्रोशीतील विद्याथ्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आणि शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचले. 

आजही त्यांच्या हातोला गावाची ओळख ही नौकरदारांच गाव म्हणुन आहे. याच श्रेय अर्थातच आनंदराव बापुंच.

 बापुंनी ठरवल असत तर ते ही आमदार-खासदार होऊ शकले असते, अनेक शाळा-संस्था उघडून तेही शिक्षण सम्राट बनू शकले असते. पण पक्षाशी, आपल्या विचारांशी आणि सर्वात महत्वाच म्हणजे ज्या सर्वसामान्य शेतकरी, कामगाराच्या जीवावर आपण उभे आहोत त्या सर्वांशी केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रतारणा करण हे आनंदराव बापुंनी कधीच मान्य केल नाही.

पुढे मुंडेंचे दुर्दैवी निधन झाले. बापूंचे सहकारी तसेच समकालीन नेतेही निर्वतले. वृद्धापकाळाने बापुही थकले. २०१७ साली गावच्या सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाली त्यात बापूंचे चिरंजीव उभे राहिले. 

आयुष्यभर थेट जनतेशी नाळ जोडली गेली असल्यामुळे साहजिकच त्यांचा पूर्ण पॅनल निवडून आला. यानंतर वाढते वय अन शारिरीक व्याधींमुळे सक्रिय राजकारणातून ते पूर्णपणे बाजूला पडले आणि नुकताच ३० ऑगस्ट रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतल काळातही स्वाभिमान, पक्षनिष्ठा,तत्वनिष्ठा, करारी बाणा जपणाऱ्या बीड जिल्ह्यातील या दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्वाला भावपुर्ण आदरांजली.

  •  जयेश बाळासाहेब चव्हाण
    अंबाजोगाई
    मोबाईल-८८३००३८८१७

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.