पडद्यावर अनेक नारदमुनी झाले पण दामलेंसारखी भूमिका कोणी साकारू शकलं नाही.

बऱ्याच ठिकाणी नारदाच्या भूमिका झाल्या असतील पण अनंत दामलें सारखी भूमिका कोणाला जमली नाही. मराठी रंगभूमीवर नारद मुनींची भूमिका इतक्या उत्तमपणे कुणालाच वठवता आली नाही अपवाद अनंत दामले यांचा. तर आपण नूतन पेंढारकर अर्थात अनंत दामले यांच्याबद्दल जाणून घेऊया.
मराठी नाटक क्षेत्र समृद्ध होतंच त्यावर मातब्बर कलाकारांनी जीव ओतून काम करत त्यात हुंकार भरला आणि महाराष्ट्रात नाटक परंपरा पोहचत गेली. 11 सप्टेंबर 1915 रोजी अनंत दामलेंचा जन्म झाला. लहानपणी अभिनयाचं वेड तर त्यांना होतच ते घरातल्या लोकांना अभिनय करून दाखवत, नकला करून दाखवत असे त्यावेळी घरच्यांना त्यांचं भविष्य तेव्हाच दिसलं होतं की पोरगं नाटक क्षेत्रात काहीतरी मोठं काम करेल.
अनंत दामले यांची कारकीर्द जर बघितली तर त्यांनी 1930 ते 1990 अशी जवळपास 6 दशके रंगभूमी गाजवली. मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या गायनाने आणि अभिनयाने अनंत दामलेंनी 92 नाटकांमध्ये अभिनय करत अनेक नविन नवीन भूमिका प्रेक्षकांसमोर उभ्या केल्या.सहा दशकांच्या आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीत अनंत दामलेंनी अनेक भूमिका वठवल्या पण ते प्रमुख्याने लक्षात राहीले ते म्हणजे नारदाच्या भूमिकेसाठी.
1939 सालची ही गोष्ट. न.चि. केळकर हे अनंत दामलेंचं कृष्णार्जुन युद्ध या नाटकाचा प्रयोग बघायला आले होते. हे नाटक बघत असताना न.चि. केळकरांना सारखं असं वाटत होतं की अनंत दामले हे बापू पेंढारकर यांच्यासारखे डायलॉग घेत आहेत. पण बापू पेंढारकर हे निघाले अनंत दामलेंचे गुरू.,
1940 साली ऑपेरा हाऊसला सत्तेचे गुलाम या नाटकाचा प्रयोग लावण्यात आलेला होता. हा प्रयोग एका धर्मांर्थ संस्थेला देणगी देण्याच्या आग्रहातून लावण्यात आला होता. या प्रयोगाला प्रमुख उपस्थिती ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लावली होती. तेच कार्यक्रमाचे अध्यक्षसुद्धा होते. या प्रयोगाच्या वेळी अ. ह. गद्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हस्ते अनंत दामले यांना नूतन पेंढारकर ही पदवी देऊ केली. पदवी देऊन झाल्यावर सावरकर हळूच अनंत दामलेंच्या कानात म्हणाले पदवी मिळवणे सोपे असते पण ती टिकवणे कठीण असते बरं…!
अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत पंढरपूर, रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला ,शारदा अशा अनेक नाटकांमध्ये कामं केली. पुण्यातील भारत गायन समाज हे अनंत दामले यांचं श्रद्धास्थान होतं. 9 ऑक्टोबर 1999 रोजी अनंत दामलेंचं निधन झालं. मराठी रंगभूमीवर अजरामर असा नट म्हणून अनंत दामले ओळखले जायचे.,
नारदमुनी म्हणजे अनंत दामलेबुवा आणि अनंत दामले म्हणजे नारदमुनी असं एक समीकरण सेट झालं होतं. मराठी रंगभूमीवर जवळपास 3 हजार पेक्षा जास्त वेळा नारदाची भूमीका साकारण्याचा पराक्रम अनंत दामलेंनी केला होता.
हे ही वाच भिडू :
- घाणेकर, लागूंनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी अजरामर केला….
- निळूभाऊंनी केलेला प्रॅन्क दादांना चांगलाच महागात पडला होता……
- फिल्मस्टार नर्गिसच्या प्रयत्नांमुळे निळू फुले श्रीराम लागूंचा सामना थेट बर्लिनमध्ये झळकला होता..
- च्यवनप्राशची जाहिरात केली म्हणून डॉ. लागूंचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला होता.?