माजी विद्यार्थ्यानं आयआयटीला ७५ करोड दान दिलेत

आयआयटी इन्स्टिट्यूट कुणाला माहिती नाही ?  प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते कि, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घ्यावं…आपल्या सीव्ही मध्ये ‘आयआयटीयन’ लावणे म्हणजे एक प्रकारचं भूषण मानलं जातं. 

असो याच आयआयटीला भूषण वाटावं अशी बातमी आलीये…ती म्हणजे एका आयआयटीयननं आयआयटीला एक कोटी रुपये दान दिलेत. एखाद्या माजी विद्यार्थ्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात दान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आणि हा माजी विद्यार्थी कोण आहे माहितीये ?? नामांकित आयटी कंपनीचे प्रमुख सॉफ्टवेअरचे प्रमुख अनंत यार्डी !!!!

आयआयटी दिल्लीचे डायरेक्टर रामगोपाल राव यांनी माध्यमांना सांगितले की यार्डी सॉफ्टवेअरचे प्रमुख अनंत यार्डी यांनी दिलेले १ कोटीचे दान हे मागच्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स स्कूलच्या कार्यात वापरले जाणार आहे. 

संस्थेमार्फत प्रसारित करण्यात आलेल्या नोट मध्ये सांगण्यात आले की यार्डी यांच्यामार्फत आलेल्या दानाचा वापर AI स्कूलच्या उभारणीत करण्यात येईल. तेथे अत्याधुनिक प्रयोगशाळा निर्माण केली जाईल,ज्याद्वारे या क्षेत्रातील संशोधकांना या संस्थेकडे आकर्षित करण्याचे काम केले जाणार आहे.

तसेच हा निधी समाज, पर्यावरण आणि राष्ट्र यासाठी आवश्यक संशोधनासाठी याचा अत्यंत काटेकोर वापर केला जाईल असंही रामगोपाल राव यांनी सांगितलं आहे. 

हे अनंत यार्डी कोण आहेत ? आणि यार्डी कंपनीचा इतिहास काय आहे ?

अनंत यार्डी हे आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. अनंत यार्डी यांनी १९८२ मध्ये यार्डी कंपनीची स्थापना केली होती. यार्डी कंपनी हि मुख्य करून रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रदान करत असते.

अनंत यार्डी हे यार्डी कंपनीच्या सिस्टम्सचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. त्यांनी IIT दिल्लीला US$ १० दशलक्ष म्हणजेच अंदाजे ७५ कोटी भेट देण्याची तयारी दाखवली आहे. अनंत यांनी मालमत्ता व्यवस्थापन समाधानासाठी १९८२ मध्ये यार्डी सिस्टम्स रिअल इस्टेट प्रॉपर्टीची स्थापना केली. हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठे रिअल इस्टेट सॉफ्टवेअर प्रदाता आहे. याचदरम्यान अनंत यार्डी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जागतिक बदल घडवत आहे. मला आनंद आहे की माझ्या या सहकार्याने संस्था AI शाळेत काम करेल आणि या शाळेचा माझ्या मदतीमुळे काही विकास होईल. जेणेकरून हि शाळा उत्कृष्टपणे चालली तर त्यामुळे शिक्षण आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टता पुढे चालू ठेवण्यास मदत होईल.

आयआयटीचा इतिहास काय आहे ?

तर या प्रसिद्ध आयआयटी इन्स्टिट्यूटची स्थापना दिल्लीमध्ये १९६१ मध्ये झाली. सुरुवातीला या कॉलेजला कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे नाव दिले गेले.  इंडिया टुडेच्या २०१५ च्या निल्सन बेस्ट कॉलेजेस सर्व्हेमध्ये, भारतातील सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पाचव्या क्रमांकावर आले आहे. 

आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि संस्थेचे खूप चांगले सबंध असतात आणि ते शेवटपर्यंत टिकून राहतात. कारण आयआयटी ही संस्था माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील संवादावर भर देत असते. मागील काही वर्षात माजी विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्लीला सढळ हाताने बरीच मदत केली आहे. संस्थेच्या आकडेवारीनुसार  २०१८-१९ पासून २०२०-२१ च्या दरम्यान माजी विद्यार्थ्यांना मार्फत संस्थेला १०९ कोटींचे दान मिळाले.

  अलीकडेच अनंत यार्डी यांच्यामार्फत मिळालेले दान हे सर्वात मोठी रक्कम आहे.

राव यांनी ही देखील माहिती दिली कि ‘एंडाउमेंट मेरिट स्कॉलरशिप’ ची तेथे सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यानुसार दरवर्षी १५  विद्यार्थी आणि १५ विद्यार्थिनींना या मिळालेल्या दान रक्कमेतून  प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करण्यात येतो. अशा पद्धतीचा हा अभिनव उपक्रम असून मागच्याच वर्षी तेथे याची  सुरुवात करण्यात आलेली आहे.

कोरोना महामारीत संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती. 

संस्थेच्या ५२ व्या दीक्षांत समारोहात राव यांनी माहिती दिली की, संस्थेने विद्यार्थ्यांना कोरोना काळात कशा पद्धतीने मदत केली आणि ही देखील माहिती दिलीये कि, असे चारशे विद्यार्थी ज्यांच्याकडे ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी साधने उपलब्ध नव्हती अशा विद्यार्थ्यांकरीता संस्थेने लॅपटॉप आणि टॅब्लेटची  व्यवस्था केली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना घरी राहून क्लासेस करणं शक्य नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन काळात संस्थेने कॅम्पसमध्ये राहून क्लासेस करण्याची परवानगी दिली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.