सुभाषबाबूंशी टक्कर घेणाऱ्या नेत्यानेच आंध्रा बँकेचे स्थापना केली होती

स्वातंत्र्योत्तर इतिहासात असे अनेक दिग्गज नेते होऊन गेलेत, ज्यांचा इतर मोठ्या व्यक्तिमत्वाशी मतभेद होते. अशा अनेक जोड्या आपल्या वाचनात आल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे, भोजराजू पट्टाभी सीतारामय्या आणि सुभाषचंद्र बोस यांची जोडी. असं म्हणतात कि, पट्टाभी सीतारामय्या यांचं सुभाषबाबुंसोबत मतभेद होते. पण या चर्चा चघळता- चघळता मात्र पट्टाभी सीतारामय्या त्यांच्या योगदानाकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. पण आपण आज त्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल बोलूया..

भोजराजू पट्टाभी सीतारामय्या असे या व्यक्तीचे नाव आहे. लोकं त्यांना पट्टाभी सीतारामय्या म्हणून ओळखतात. सीतारामय्या यांनी त्यांच्या हयातीत बऱ्याच क्षेत्रात काम केले आहे.  त्यांची ओळख म्हणजे एक डॉक्टर, तसेच एक पत्रकार याचसोबत एक स्वातंत्र्यसैनिक !!

एवढी उत्तुंग झेप घेतलेल्या व्यक्तीबद्दल एकाच निमित्ताने चर्चा होते. ती म्हणजे त्यांची आणि  सुभाषचंद्र बोस  यांच्यातील स्पर्धा. पट्टाभी सीतारामय्या हे १९३९ च्या त्रिपुरी अधिवेशनात कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महात्मा गांधींनी पाठिंबा दिलेले कॉंग्रेसचे उमेदवार होते, परंतु सुभाषचंद्र बोस यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हाच्या घडलेल्या राजकारणामुळे ते लोकांच्या लक्षातच राहिले. 

असो  पट्टाभी सीतारामय्या आणि सुभाषचंद्र बोसशी यांच्यातल्या स्पर्धेमुळे ते चर्चेत न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक योगदानामुळे देखील लक्षात राहिले पाहिजे म्हणून हा अट्टाहास. 

तुम्हाला देशभरात प्रवास करायची आवड असेल तर तुम्हाला प्रत्येक राज्य, तेथील शहरांमधील गोष्टींची माहिती असेल. देशभरात फिरतांना तुम्हाला देशातील बहुतांश भागात विशेषत: शहरे आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये आंध्र बँकेच्या शाखा दिसल्या असतील. 

पूर्वी ही खाजगी क्षेत्रातील बँक होती, परंतु एप्रिल १९८० मध्ये इंदिरा गांधींनी काही खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं होतं त्यात हि आंध्र बँके देखील होती.  

पण ही बँक कोणी सुरु केली माहीत आहे का?

पट्टाभी सीतारामय्या यांनी २८ नोव्हेंबर १९२३ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजेच सध्याचे आंध्र प्रदेश येथील मछलीपट्टनम येथे या आंध्र बँकेची स्थापना केली होती. जेणेकरून बँकिंग सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना घेता यावा.  या बँकेच्या स्थापनेवेळेस त्यांना राजा यारलागड्डा शिवराम प्रसाद यांनी हि संस्था सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. या बँकेची २० नोव्हेंबर १९२३ रोजी नोंदणी झाली होती. 

१९५६ मध्ये, राज्यांचे भाषिक विभाजन लागू करण्यात आले आणि हैदराबादला आंध्र प्रदेशची राजधानी बनवण्यात आली. आणि त्यामुळे आंध्र बँकेचे नोंदणीकृत कार्यालय तसेच आंध्र बँकच्या इमारती, सुलतान बाजार, हैदराबाद येथे हलविण्यात आल्या होत्या. 

एप्रिल १९८० मध्ये सुरू झालेल्या व्यावसायिक बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात, बँक पूर्णपणे सरकारी मालकीची बनली. १९६४ मध्ये, बँकेचे भारत लक्ष्मी बँकेत विलीनीकरण झाले आणि आंध्र प्रदेशात या बँकेचे स्थान आणखी मजबूत झाले. 

आजच्या काळात हीच बँक आपल्या सेवा-सुविधांचा विस्तार करता करता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. 

पण अलीकडेच झालेल्या बँकांचे खाजगीकरणामध्ये आंध्र बँक देखील आहे.  

पूर्वी ही खाजगी क्षेत्रातील बँक नंतर इंदिरा गांधींनी त्याचे राष्ट्रीयकरण केले आता पुन्हा एकदा या बँकचे खाजगीकरण झाले.

३० ऑगस्ट २०१९ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केली जाईल. प्रस्तावित विलीनीकरणामुळे युनियन बँक ऑफ इंडिया ही ₹१४.५९ लाख कोटींची मालमत्ता आणि ९,६०९ शाखांसह देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी बँक बनेल.

या घोषणेनंतर आंध्र बँकेच्या संचालक मंडळाने १३ सप्टेंबर रोजी विलीनीकरणास मान्यता दिली. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने ४ मार्च रोजी विलीनीकरणास मान्यता दिली आणि १ एप्रिल २०२० रोजी हे विलीनीकरण पूर्ण झाले.

आंध्र बँकेशिवाय त्यांनी प्रादेशिक स्तरावर इतर अनेक वित्तीय आणि विमा कंपन्याही सुरू केल्या. तसं तर पट्टाभी सीतारामय्या हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक नव्हते ज्यांनी बँकेची स्थापना केली होती. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी देशाच्या आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँका सुरू केल्या होत्या. मुंबईत फिरोजशाह मेहता यांनी पारशी समाजातील प्रतिष्ठित लोकांसह सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुरू केली होती, जी आजही देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक म्हणून गणली जाते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.