भारतात एक असं ठिकाण आहे, जिथं शेतात आणि मोकळ्या मैदानात हिरे सापडतात…

मोकळा खिसा असला कि, प्रत्येकाला वाटतं आपल्याला वाटेत पैशांचं एखादं घबाड मिळावं. पण या पैशाऐवजी हिरे सापडले तर…भारतात एक असं ठिकाण आहे, जिथं लोक शेतात आणि मोकळ्या मैदानात हिरे शोधतात.  आता तुम्ही म्हणाल काय पण काय, पण हे खरं आहे भिडू.

आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशाला ‘हिऱ्यांची धरती’ म्हंटलं जातं. यामागचं कारण म्हणजे तिथले खनिज साठे. लोक तिथं हिऱ्यांचा शोध घेतात.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, पेरावली, तुग्गली, जोन्नागिरी आणि वज्रकूर सारखी ठिकाणं हिऱ्यांनी समृद्ध आहेत. इथल्या हिऱ्यांची माहिती आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही आहे, जे हिऱ्यांच्या शोधात इथं येतात. आणि आंध्र प्रदेशचं नाही तर लगतच्या राज्यांमधले लोकही हिरे शोधण्यासाठी इथं येतात.

एवढंच काय, हिरे आपले नशीब बदलेल या आशेने इथले लोक आपली रोजंदारी सोडून हिऱ्यांच्या शोधात येतात. डोळ्यात तेल घालून इथं लोक जमिनीवर हिरे शोधतं बसतात. 

हे हिरे मिळाल्यानंतर हे लोक थेट व्यापारांजवळ जातात, जे त्यांच्याकडून हे हिरे विकत घेतात आणि त्यांना थोडी रक्कम देतात. तसं पाहिलं तर हे सुद्धा एक कष्टाचं काम आहे, ज्यामध्ये सगळा खेळ नशीबाचा आहे.

पावसाळा सुरू होताचं इथे हिऱ्यांचा शोध घ्यायला सुरूवात होते. कोणत्याही माहितीशिवाय ही मंडळी हिरे शोधायचं काम करतात. कधीकधी ते अशी दगडं उचलून बॅगेत ठेवतात, जी त्यांना काही वेगळी वाटतात.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिथले गावकरी सांगतात की, इथे हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. जमिनीवर पडणाऱ्या सूर्य किंवा चंद्राच्या किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारे ते हिरे शोधण्यासाठी जागा निवडतात.

तर काहीजण कार्बन डायऑक्साइड नावाचा एक दगड दाखवत आणि म्हणतात की जिथे जिथे असा दगड सापडतो तिथे हिरे असतात. म्हणूनच आपण त्याच भागाच्या आसपास हिरे शोधतो.

या हिऱ्यांशी संबंधित काही रंजक कथाही प्रसिद्ध आहे. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर श्री कृष्ण देवरायांच्या राजवटीत व्यापारी खुल्या बाजारात हिरे आणि मौल्यवान दगड विकत असायची. नंतर, साम्राज्यांच्या पतनानंतर, नैसर्गिक आपत्ती आणि लढायांमुळे ही सर्व संसाधने नष्ट झाली पण आता पाऊस पडल्यावर ते जमिनीवर दिसतात.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “आंध्र प्रदेशातील कुर्नूल आणि अनंतपूर जिल्हे आणि तेलंगणातील महबूबनगर हे जमीनीत असणाऱ्या खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. जेव्हा पृथ्वीच्या आतील पृष्ठभागावर काही नैसर्गिक बदल होतात, तेव्हा हे हिरे जमिनीच्या वर येतात.

असं म्हणतात की, कथित कार्बन डाय-ऑक्साइड दगडाच्या आधारेच इंग्रजांनी येथे हिऱ्यांसाठी खोदकाम केलं होतं. जोन्नागिरी गावातील जॉन टेलर शाफ्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२० वर्ष जून्या विहीरीवरूव समजते की, ब्रिटिश राजवटीत इथं उत्खननाचं काम करण्यात आलं होतं.

या परिसराजवळ किम्बरलाइट पाईप्स दिसू शकतात. केंद्र सरकारने १९७० मध्ये या शाफ्टभोवती हिरा प्रक्रिया केंद्र सुरू केले. नंतर, त्याच जागेवर किम्बरलाइट पार्क आणि संग्रहालय बांधले गेले.

हिरे किम्बरलाइट आणि लॅम्प्रोईट पाईप्समध्ये ठेवलेले आहेत जे भूमिगत आहेत. हे कुर्नूल आणि अनंतपूर जिल्ह्यात पृथ्वीच्या वरच्या जमिनी भागावर आढळते. पाणी, पूर किंवा पाऊस त्यांना जमिनीवर फेकतात. हे देखील एक कारण आहे की, या भागातील लोक पावसाळ्यात हिऱ्यांचा शोध घेतात.

गेल्या ५००० वर्षात या भागातील मातीची धूप हे देखील हिरे जमिनीवर येण्याचे एक कारण आहे. GSI च्या अधिकाऱ्यांच्या मते, “पृथ्वीच्या खालच्या भागात १४०-१९० फूट खोलीवर असलेले कार्बन अणू जास्त तापमान आणि दाबामुळे हिऱ्यांमध्ये बदलतात.”

आता, एवढ सगळं आहे म्हंटल्यावर आध्र्यांला एक चक्कर मारावी लागतेय भिडू.

हे ही वाचं भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.