२० फेक अकाउंट आणि ६५८ महिलांना अश्लिल मॅसेज करणारी एॅन्जल प्रिया अटकेत !!! 

 

नाशिक येथील तिकडे कॉलनीत राहणारी एक तरुणी. तीच फेसबुकवर अकाऊंट आहे. जस तुमचं आमचं आहे तसच. त्या तरुणीला एक दिवस सोनल नावाच्या मुलीचा मॅसेज आला. बहूदा J1 झालं का पासून सुरवात झाली असावी. खऱ्याखुऱ्या मुलींन या खोट्या मुलींच्या मॅसेजकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काही दिवसात त्या मुलींन अश्लिल मॅसेज पाठवण्यास सुरवात केली. तिनं थेट खोट्या सोनललां ब्लॉक केलं. 

आत्ता प्रकरण संपल होतं. फेसबुकवरुन ब्लॉक केलं की प्रकरण संपत अस खऱ्या तरुणींला वाटणं साहजिक आहे. पण म्हणतात ना, “कितनें एँन्जल मारोगें घर घर सें एँन्जलं नकलैंगी.” या तरुणीला पुन्हा सोनल नावाच्या दूसऱ्या मुलीचे मॅसेज यायला लागले. तिनं पुन्हा दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिला थेट व्हिडीओ कॉल यायला लागले. तिनं धाडस करुन एक कॉल उचलला. तिला समोर काय दिसलं तर एक तरुण नग्नाअवस्थेत बसला आहे. तिनं फोन कट केला. ब्लॉक केलं. 

याठिकाणी महाराष्ट्रातल्या लैंगिक अत्याचाराच्या कथा संपतात. ब्लॉक केलं की विषय़ संपतो पुढं तो शिकारी दुसरं सावज पकडतो. पण हित त्या मुलींन धाडस केलं दोन्ही अकाऊंटच्या डिटेल्स पोलिसांनी दिल्या. 

घडलेली हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी सोनल नावाच्या या एँन्जलाचा शोध लातूरमधल्या अवंतिनगर मध्ये जावून संपला. लातूरच्या अवंतीनगर मधल्या विश्वजीत जोशी याला ताब्यात घेण्यात आलं. विश्वजीतला अटक करुन त्याच्याकडे असणाऱ्या फोनची तपासणी केली तेव्हा मुलींच्या नावे तब्बल २० फेक अकाउंट सापडले. या पठ्यानं तब्बल विक्रमी अशा ६५८ मुलींना अश्लिल मॅसेज केले होते. आत्ता या सगळ्याच मुली, महिलांचा विनयभंग करण्याची केस याच्यावर लागू शकते. पण केव्हा तर त्या ६५८ मधल्या एका मुलींन समोर येवून धाडस दाखवलं तर धाडस या महिलांनी दाखवलं तरच. 

तुर्तास एक एँन्जल सापडली म्हणून खूष व्हायचं कारण नाही. फेसबुकवर अशा पोत्यांन एँन्जल आहेत. कधी ना कधी त्या जाळ्यात सापडतीलच तोपर्यन्त J1 झालं का विचारताना आणि विचारणाऱ्याबद्दल काळजी घ्या इतकच. 

Leave A Reply

Your email address will not be published.