१०० कोटी रुपये वसुली प्रकरणातील नाट्यमय घडामोडी अनिल देशमुखांची अडचण वाढवणार का?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरण आजकाल रोजच वेग-वेगळं  वळण घेतांना दिसत आहे. त्यात भरीस भर म्हणजे काल रात्री काही नाट्यमय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. त्या पाठोपाठ अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. आणखी एक म्हणजे सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देखील अटक करण्यात आली.

या सगळ्या झटापट घडामोडींमुळे प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळालं आहे.

सीबीआय ला जेंव्हा सर्वोच्च न्यायलयाने ग्रीन सिग्नल दिला होता आणि दरम्यान अनिल देशमुख यांचे अपील देखील फेटाळण्यात आले होते. त्यामुळे येत्या काही दिवसात सीबीआयची चौकशी सक्रीय होणार हे नक्कीच होतं. आणि त्याचीच प्रचीती म्हणजे कालपासून घडत असलेल्या ह्या नाट्यमय घडामोडी.

आधी सीबीआयचा गोपनीय अहवाल माध्यमांमध्ये लिक करण्यात आला.

रविवारी सीबीआयचा एक गोपनिय अहवाल माध्यमांपर्यंत पोहचतो, परंतु या अहवालावर कोणत्याही अधिकृत अधिकार्याची सही नसते आणि या अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सबळ पुराव्यांअभावी क्लिन चिट देत असल्याचा मजकूर असतो.

“अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने क्लीनचिट दिली आहे आणि सीबीआयने प्राथमिक तपासानंतर ही क्लीनचिट दिली”, असा अहवाल असलेली एक पीडीएफ फाईल सोशल मीडियावर काही काळापासून व्हायरल होत होती.

मात्र व्हायरल झालेल्या या रिपोर्टवर सीबीआय चा कसल्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा येत नाही. पण तो अहवाल नेमका कुठून लीक झाला? याची चौकशी करण्यात आली. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा आरोप केला जातो. या घडामोडींमध्ये सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. अभिषेक तिवारी यांनीच पैसे घेऊन हा गोपनिय अहवाल  लीक केल्याचा आरोप केला गेला आहे. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. 

याच दरम्यान काल अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं, चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं. मात्र गौरव चतुर्वेदी यांना अधिकृतपणे चौकशी साठी न बोलवता, अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी असा आरोप केला आहे कि, गौरव चतुर्वेदी यांचं सीबीआय च्या ९-१० जणांनी वरळीतील त्यांच्या निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण केलं आहे.

त्याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली होती.

मात्र अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का म्हणजे त्यांच्या वकिलांच्या टीमपैकी एक वकिल असणारे आनंद डागा यांना देखील सीबीआय ने अटक केली आहे, सीबीआय ला अशी शंका आहे कि, अभिषेक तिवारी आनंद डागाच्या संपर्कात होते, काही टेलिफोनिक संभाषणाच्या पुराव्याच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.

आनंद डागा यांचे आणि तिवारी यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील सीबीआय ला संशय आहे त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि अलाहबाद येथे रात्री उशीरा पासून सीबीआयचे छापे मारणे देखील सुरु झाले आहे.

सीबीआयची टीम आनंद डागा यांच्या पुढील चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जात असल्याची अधिकृत बातमी देखील मिळाली आहे. 

तसेच आनंद डागा यांचा ट्रान्सीट रिमांड घेतला जाणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हा हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता नागपूर येथे धाड पडलीच तर त्यातून अशी एक  शक्यता समोर येऊ शकते कि, आनंद डागा यांना पैसे कोणी दिले हे देखील स्पष्ट होईल.

यातील काही अपडेट्स म्हणजे अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार आला असून, दुस-या खंडपीठापुढे दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांचे निर्देश अले४ आहेत तर  ईडीच्या सद्याच्या कारवाईविरोधात अनिल देशमुखांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता हि याचिका तातडीनं दुस-या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. 

पण ज्या प्रकारे १०० कोटी रुपये वसुली प्रकरणातील नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्यावरून तरी हे स्पष्ट आहे कि, अनिल देशमुखांची अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.