अनिल देशमुखांच्या घरावर CBI चे छापे ; २०१९ ला त्यांनी इतकी संपत्ती सांगितली होती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपानंतर सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत सध्या वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने ही छापेमारी केली आहे.

पण अनिल देशमुख यांची संपत्ती नेमकी आहे तरी किती?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे नागपूरमधील काटोल या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक अर्जात भरलेल्या माहितीनुसार,

त्यांची एकूण मालमत्ता १४ कोटी ५७ लाख आणि उत्तरदायित्व म्हणजेच लाएबिलिटी ४ कोटी ५६ रुपये रुपये इतकी आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये त्यांनी १६ लाख ८५ हजार १९३ रुपये इन्कम टॅक्स परतावा दाखल केला होता. तर ३ लाख १२ हजार रोख रक्कम त्यांच्याजवळ होती. सोबतच ७ लाख २५ हजार रुपये मुंबई आणि नागपूरमधील विविध बँका आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये जमा करण्यात आले आहेत.

रिलायन्ससह बऱ्याच शेअर्समध्ये देशमुखांची गुंतवणूक आहे

अनिल देशमुख यांनी बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही ३ लाख ८६ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात २४२ रुपयांचे रिलायन्स पॉवरमध्ये ९३ शेअर्स खरेदी केले आहेत, दुसरीकडे ८ हजार ७६० रुपयांमध्ये इन्टेग्रा इंजिनीरिंगचे २०० शेअर्स खरेदी केले आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे १२० शेअर्स १ लाख ५६ हजार ४४४ रुपयांत खरेदी केले आहेत.

त्याशिवाय त्यांनी ३ हजार २०० रुपयांमध्ये रमा पेट्रोकेमिकल्सचे ४०० शेअर्स, १६ हजार २९५ रुपयांमध्ये ग्लेनमार्क फार्माचे ५१ शेअर्स, २० हजार ३५८ रुपयांमध्ये ल्युपिनचे २९ शेअर्स, मारुती सुझुकीच्या २५ शेअरमध्ये १ लाख ६९ हजार ६५० रुपये गुंतविले आहेत. यासोबतच रिलायन्स कम्युनिकेशन, ऋषी टेकटेक्स यांचे देखील अनिल देशमुख यांच्याकडे शेअर्स आहेत.

इतर गुंतवणूक 

एलआयसीमध्ये देखील देशमुखांनी २ लाख ९७ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तर दागिन्यांमध्ये एकूण २९ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक आहे.

इतर मालमत्तांमध्ये म्हणजे एस. एस एन्टरप्रायझेस, एस सोयाटेक, एच डी एन्टरप्रायझेस अशांमध्ये १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

स्थावर संपत्तीची माहिती

स्थावर मालमत्तेबद्दल सांगायचे झाल्यास अनिल देशमुख यांच्याकडे १ कोटी १९ लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर ४ कोटी १५ लाख रुपयांची बिगर शेती जमीन आहे. व्यावसायिक इमारत २ कोटी २३ लाख आणि निवासी इमारत ५ कोटी २७ लाख रुपयांची आहे. यात मुंबईतील वरळी आणि नवी मुंबई एक – एक फ्लॅटचा देखील समावेश आहे. यात त्यांच्या पत्नीचे नावही आहे. हे एकूण मूल्य १२ कोटी ८५ लाख रुपये आहे.

४ कोटी ६० लाख रुपयांचे उत्तरदायित्व 

अनिल देशमुख यांनी ५७ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज आणि बँक आणि वित्तीय संस्थांकडून ३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज घेतलं आहे. अशा प्रकारे एकूण लाएबिलिटी ४ कोटी ६० लाख रुपये आहे.

पत्नी आणि कुटुंबाचा देखील इन्कम टॅक्स परतावा 

या सगळ्या व्यतिरिक्त अनिल देशमुख यांच्या पत्नीने देखील २०१८ – १९ या आर्थिक वर्षात १४ लाख ८१ हजार रुपयांचा इन्कम टॅक्स परतावा दाखवला, सोबतच २०१८ – १९ या आर्थिक वर्षात त्यांच्या कुटुंबातील स्वतंत्र इन्कम टॅक्स परतावा २ लाख ९० हजार रुपये दाखवला आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.