लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब..९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड

दिन दिन दिवाळी ,

गाई म्हशी ओवाळी….

म्हणत लहान पोरांच्या हाताला धरून घरातली वडीलधारी माणसं सुरसुऱ्या हातात घेऊन आनंद व्यक्त करत औक्षण करत असतात. नंतर फटाक्यांची आभाळभर होणारी आतिषबाजी आपण बघतच असतो. म्हणजे आपण आजवर ज्या दिवाळ्या साजऱ्या केल्या त्यात आपण किती प्रकारचे फटाके वाजवले असतील. लवंगी पासून सुरवात ते थेट 12 शॉट पर्यंत किंवा अजून त्याच्या पुढे कोणी गेला असेल. पण आजवर आपण जितके फटाके वाजवले त्यात बहुतांशी फटाके हे अनिल क्रॅकर्स फॅक्टरी मधून आलेले होते आणि अजूनही त्याच फॅक्टरी मधून भारतभर फटाके पोहचतात. तर जाणून घेऊया या अनिल ग्रुपच्या फटाका ब्रँड बद्दल.

1923 साली अनिल फटाक्यांची फॅक्टरी, शिवकाशी ही मूळ कंपनी अनिल ग्रुपच्या नॅशनल मॅचवर्क्सद्वारे १९२३ मध्ये अस्तित्वात आली, ज्याची स्थापना श्री.ए.पी.आर.एस.पी.पावनसा नाडर यांनी केली होती. 1923 मध्ये अनिल ग्रुपने 100 कामगारांच्या साहाय्याने मर्यादित साधनांसह आणि तंत्रज्ञानासोबत सेफ्टी मॅच बनवायला सुरवात केली. त्यावेळी मार्केटमध्ये तग धरेल की नाही याचीही शाश्वती नव्हती पण गेल्या 90 वर्षांपासून ही जास्त काळ उलटून गेला पण अनिल ग्रुप दर दिवाळीला भारतभर फटाके मोठया प्रमाणात विक्री करतो.

आता आपण काय फक्त दिवाळीलाच फटाके वाजवत नाही तर निवडणूक जिंकली की फटाके, तुळशीचं लग्न लागलं की फटाके बऱ्याच चांगल्या प्रसंगी आपण फटाके फोडतो. लक्ष्मी बॉम्ब पासून ते मीटर पर्यंतच्या लडी लावण्यापर्यंत आपली मजल जाते. अनिल फायर क्रॅकर्स लोकांची ही गरज उत्तम प्रकारे भागवली. 90 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीने फॅन्सी फटाक्यांना मानाचं आणि आघाडीचं स्थान दिलं. कंपनीच्या गेल्या महत्वाच्या 50 वर्षात फटाक्यांच्या प्रोडक्शन वर जास्त भर देत मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग मिळवला.

सिंगल साउंड क्रॅकर्स, स्पार्कलर्स, चक्कर, फुलदाण्या, चमकणारा तारा, पेन्सिल, गिफ्ट बॉक्स, फॅन्सी आयटम – ग्राउंड/स्काय फंक्शन (10-16 शॉट्स), फॅन्सी मल्टी इफेक्ट शॉट्स – 6/7 शॉट्स, फ्लॉवर पॉट फटाके, फटाके कारंजे, फ्लॉवर पॉट क्रॅकर्स अशा अनेक प्रकारच्या फटाक्यांची विक्री अनिल ग्रुप भारतभर करतात. यातले बरेच फटाके आपण वाजवलेही आहेत.

अनिल क्रॅकर्सचे अधिकारी सांगतात की आमची निर्दोष गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण वस्तू हे बाजारपेठेतील आमच्या प्रतिष्ठेचे मुख्य कारण आहे. प्रीमियम गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर कठोर गुणवत्ता नियंत्रण नियम आणि पद्धतींचे पालन करतो. भारतीय स्फोटक कायद्याने दाखवून दिलेल्या नियमांनुसार पायरोटेक्निक अॅल्युमिनियम पावडर आणि ब्लॅक पावडरच्या मिश्रणाने उत्पादने तयार केली जातात. संशोधन आणि विकास हा आमच्या कार्यप्रणालीचा अविभाज्य भाग आहे जो आम्हाला बाजारपेठेत आमची प्रतिष्ठित प्रतिष्ठा राखण्यात मदत करतो.

अनिल ग्रुप ऑफ कंपनी मध्ये इतरही त्यांचे ग्रुप आहेत त्यामध्ये अनिल साउंड कॅप्स, नॅशनल मॅच वर्क्स, अनिल लिथो, ग्राफिंग कंपनी, अनिल पोलाद उद्योग, पबनास केमिकल्स प्रा. लि., पबनास अॅग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि.

औद्योगिक क्षेत्रात सतत उभे राहिल्यानंतर अनिल ग्रुप पोटॅशियम क्लोरेट, कॉपर कोटेड वायर्स, कागदी नळ्या, कृषी उत्पादने, वनौषधींचे उत्पादन यासारख्या वैविध्यपूर्ण व्यावसायिक प्रकल्पातमध्ये गुंतलेल्या २५ औद्योगिक युनिट्सचा समावेश असलेल्या अनिल समूहाचा सध्याच्या युगात इतका मोठा विस्तार झाला आहे. उत्पादने, पारंपारिक ऑफसेट प्रिंटिंग युनिट इ. 5000 कामगारांच्या मजबूत सैन्यासह अजूनही अनिल ग्रुप कार्यरत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.