म्हणूनच या दोन विदेशी राष्ट्राध्यक्षांना भारताच्या संसदेने श्रद्धांजली वाहिलीय
आज सकाळी नेहमीप्रमाणं राज्यसभेचं कामकाज सुरु झालं. दरम्यान, सभागृहाचं काम सुरु होण्याआधी सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी काही नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. नायडूंनी माजी सदस्य वसीम अहमद यांचा उल्लेख करत सांगितलं कि, २६ एप्रिल २०२१ ला वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आता वसीम अहमद हे नाव राजकारणाशी संबंधित असल्यामूळ अनेकांच्या कानावर पडलंही असेल. ज्यांनी नोव्हेंबर १९९६ ते जुलै १९९८ पर्यंत वरच्या सभागृहात उत्तर प्रदेशाचं नेतृत्व केलं होत.
दरम्यान, सभागृहात आणखी दोन नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे हे दोन्ही विदेशी नेते होते. सभापतींनी मॉरिशियसचे माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ आणि झाम्बियाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर केनेथ कोंडा यांना श्रद्धांजली वाहिली.
आता ही काय पहिली वेळ नसेल जेव्हा विदेशी नेत्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आलीये. पण काही खास संबंधाशिवाय वरच्या सभागृहात कोणा विदेशी नेत्यांना श्रद्धांजली दिली जात नाही. हेदेखील तितकचं खरं आहे. अश्या परिस्थतीत जाणून घेऊया कि, विदेशी नेते असूनही या नेत्यांना इतकं महत्व का दिलं गेलं?
अनिरुद्ध जगन्नाथ
तर अनिरुद्ध जगन्नाथ हे मॉरिशियसचे महत्वाचे एक नेते होते. ज्यांना आधुनिक मॉरिशियसचा निर्माता देखील म्हंटल जात. महत्वाचं म्हणजे जगन्नाथ हे भारतीय वंशाचे होते. ते नेहमी म्हणायचे कि, “माझे भारताशी रक्ताचे नाते आहे.” कारण त्यांचे पूर्वज भारतातूनच मॉरिशियसला गेले होते. उत्तरप्रदेशातल्या अठिलपुरा गावातून काही जण शेतमजूर म्ह्णून मॉरिशियसला गेले होते, ज्यात जगन्नाथ यांच्या कुटुंबाचा देखील समावेश होता. मॉरिशियस मध्येच त्यांचं कुटुंब स्थायिक झालं आणि तिथलं एक महत्वाचं घराणं बनलं.
दरम्यान, भारत आणि मॉरिशस यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात अनिरुद्ध जगन्नाथ यांचा महत्वाचा वाटा मानला जातो. त्यांनी आपल्या देशात हिंदीच्या विकासासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. ज्यामुळे त्यांना भारत सरकारने ‘पद्म विभूषण’ या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
जगन्नाथ आणि भारताचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसमध्ये तीन दिवस सुरु असलेल्या जागतिक हिंदी परिषदेत दिसून आले. श्रोत्यांनी खाचखक भरलेल्या सभागृहात त्यांनी हिंदी आणि भारताबद्दल भावुक करणारी करणारं भाषण दिल होत. त्यांनी भाषणात म्हंटल कि,
‘जर आपण भारताला माता म्हणतो तर मॉरिशिस त्या मातेचा पुत्र आहे. ‘
पंतपधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले कि, ‘सर अनिरुद्ध जगन्नाथ हे हिंद महासागर क्षेत्रातील बड्या नेत्यांपैकी एक होते. त्यांना मॉरिशसशी भारताच्या खास मैत्रीचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांची आठवण होईल. ‘
I called @MauritiusPM Pravind Jugnauth to convey heartfelt condolences on the sad demise of Sir Anerood Jugnauth. He will be remembered as one of the tallest leaders of the Indian Ocean Region and a principal architect of India's special friendship with Mauritius.
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2021
केनेथ कोंडा
झांबियाचे पहिले राष्ट्रपती आणि डॉ. केनेथ कोंडा यांचा उल्लेख करताना सभागृहाचे अध्यक्ष म्हणाले की, आधुनिक झांबियाचे संस्थापक कोंडा यांनी १७ जून २०२१ ला वयाच्या ९७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज आफ्रिकी नेता कोंडा एक समर्पित गांधीवादी होते. ज्यांनी जागतिक समुदायात आपला देश प्रस्थापित करण्यासाठी अनेक परिश्रम घेतले. भारताशी जवळचे संबंध असलेले कोंडा हे झांबियाचे लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले पहिले अध्यक्ष होते.
केनेथ कोंडा यांना १९६० च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या अहिंसक अॅक्टिव्हिझमसाठी ‘आफ्रिकेचा गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. एका सेकेंडरी स्कुलचा शिक्षक ते देशाचा पहिला राष्ट्रपती बनण्याचा यांच्या प्रवास निश्चितच भुवया उंचावणारा आहे.
१९५० च्या दशकात सुरुवातीला नॉर्दन रोडेशिया अफ्रीकन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून ते पहिल्यांदा राजकारणात उतरले. १९५५ ते १९५९ मध्ये त्य्यांना जेलची हवाही खावी लागली होती. जेलच्या बाहेर पडताच ते नव्यानं तयार झालेल्या ‘युनायटेड नॅशनल इंडिपेडन्स पार्टीचे अध्यक्ष बनले.
जेव्हा नॉर्दन रोडेशिया ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून स्वतंत्र झाला तेव्हा कोंडाने १९६४ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक जिंकून तिथले पहिले अध्यक्ष बनले आणि देशाचे नाव ‘झांबिया’ ठेवलं.
आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षातच कोंडा यांनी झाम्बियात शिक्षण व्यवस्थेचा वेगाने प्रसार करायला सुरुवात केली. सोबतच झांबियाची आरोग्य व्यवस्था बळकट केली, जेणेकरून बहुसंख्य श्वेत लोकांना आरोग्य सुविधा मिळू शकतील.
हे ही वाच भिडू :
- एक साथीचा रोग युरोपियन देशांना आफ्रिका जिंकायला उपयोगी पडला
- जगातील सर्वात भयानक मिलिट्री ऑपरेशन, ज्यात इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा भाऊ शहीद झाला होता.
- या तीन भावंडांमुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांविरोधात भांडण सुरु झाली आहेत….