ओम प्रकाश बिर्लांची पोरगी UPSC ची परिक्षा न देताच IAS झालीए का…?
काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लाच्या पोरीने UPSC पास केल्याची बातमी आली. आत्ता UPSC निकाल आपल्याला सवयीचा झालाय. म्हणजे कस निकाल लागला तर पत्रकार लगेच सक्सेस स्टोऱ्या करायला घेतात.
पण इथं मुख्य मॅटर असा झाला महाराष्ट्रातून किमान आठ-दहा जणांच्या सक्सेस स्टोऱ्या तरी बातम्यात यायला पाहीजे होत्या. पण तसं झालं नाही. फक्त ओम प्रकाश बिर्ला यांचीच पोरगी पास झाल्याची बातमी आली, साहजिक लोकांच्या कन्फ्यूजनमध्ये यामुळे भरच पडली..
आत्ता दूसरी गोष्ट, मोठ्या बापाचं कोण पास झालं की वशिला हे आपल्याकडचं सर्वसामान्य तत्व आहे. एखाद्याने लय पैसा कमवला की तो दोन नंबर करत असणाराय हे सर्वसामान्य गृहितक ठोकून द्यायचं आणि निवांत रहायचं. म्हणजे समोरच्याच्या कष्टाची किंमत तो कुठून येतो, कुणाच्या घरातला आहे यावर ठरतं. आणि अशा गोष्टीतून अन्याय होतो.
आत्ता विषयांतर करायचं तर आलिया भट्ट आणि रनबीर कपूर खरच भारी एक्टर आहे. पण बापाच्या जिवावर असा टॅग त्यांनापण मारला जातोच…
असो तर महत्वाचा मुद्दा ओम प्रकाश यांच्या पोरगीने अशी अडवळणी कोणती परिक्षा दिली आणि इतरांची माहिती न येता तिचीच स्टोरी का व्हायरल झाली…
तर या पोरगीचं नाव अंजली बिर्ला. तिने २०१९ ची UPSC ची सिव्हील सर्विस एक्साम दिली होती. २०१९ च्या परिक्षेचा निकाल लागला होता तो ४ ऑगस्ट २०२० साली. ही जाहिरात एकूण ९२७ जागांसाठी होती. पैकी ८२९ जागांचे निकाल UPSC ने लावले होते तर पुढच्या ९८ जागा राखीव ठेवल्या होत्या. या ९८ जागांचा निकाल ५ जानेवारी २०२१ रोजी लागला. UPSC ९८ जागांच्या या राखीव जागेतील ८९ विद्यार्थांची लिस्ट जाहीर केली…
आत्ता राखीव जागा हा काय प्रकार आहे…
तर युपीएसी च्या आपल्या १६(४),(५) या नियमांनुसार युपीएसी काही जागा राखीव ठेवते. मेरीट लिस्ट लागल्यानंतर त्या खाली असणाऱ्या मुलांचा त्यांच्या त्यांच्या गुणानुसार हे क्रमांक असतात. हे अस का? तर समजा एखादा आत्ता IPS असणारा मुलगा पुढच्या अटेम्टमध्ये IAS ची तयारी करत असला. दूसऱ्या अटेम्प्टमध्ये देखील त्याला IPS चं भेटलं तर तो हे पद स्वीकारणार नाही. ही फक्त एक शक्यता झाली. एखादा पास झालेला पोरगा मेलाच तर? ही पण एक शक्यता झाली..
अशा अनेक शक्यतांमुळे बरीच मुलं सिलेक्शन झालं तरी गळपटतात. म्हणून ही राखीव जागांची तरतुद असते.
युपीएसी ने जी लिस्ट जाहीर केली त्यानुसार राखीव जागतील एकूण ८९ मुलांना त्यांनी निवडलं पैकी ७३ जण जनरल कॅटेगरीतून, १४ ओबीसी म्हणून, १ EWS तर ०१ SC कॅटेगरितून होते. याच यादीत अंदली बिर्ला ६७ व्या नंबरवर होत्या. म्हणजे त्या UPSC अगदी नियमानुसार, सर्वसामान्य मुलांप्रमाणेच प्रोसेसने पास झाल्यात…
आत्ता युपीएसीच्या साईटवर तुम्ही गेल्यानंतर ६७ व्या नंबरला जे अंजली बिर्ला यांचे नाव दिसते त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या UPSC च्या प्री आणि मुख्य परिक्षेचे रोल नंबर देखील दिसतात.
आत्ता यावर खुद्द UPSC नेच एक प्रेस नोट जाहीर केली आहे, त्यामध्ये UPSC म्हणते,
मुख्य रिझल्टमधील नावाबरोबरच UPSC एक कंसॉलिडेटेड म्हणजेच संयुक्त रिझर्व लिस्ट पण तयार करत असते. या लिस्टमध्ये जनरल कॅटेगरीच्या खाली त्यास कॅटेगरीचे मुलं आणि आरक्षित कॅटेगरीच्या खाली त्याच कॅटेगरीची मुलं असतात. रिक्त जागांवर अशा मुलांची नियुक्ती केली जाते आणि ही चालत आलेली प्रोसेस आहे त्यामध्ये नवीन अस काही नाही…
बाकी राहता राहिला ती IAS झाली आहे का? तर रॅन्कनुसार आत्ता तिला कोणतं पद मिळेल हे समजेल.
थोडक्यात काय तर ओम प्रकाश बिर्ला यांची पोरगी अगदी इज्जतीत, रितसर पास झालेय. पण आपल्या राजकारणापायी आपल्याकडून एक चुकीची गोष्ट घडते ती म्हणजे वर्षांनुवर्ष चालत आलेल्या निष्क्रिय प्रक्रियेवर आपण उगीचच प्रश्नचिन्ह निर्माण करुन गोंधळ निर्माण करतो.
यामध्ये सर्वसामान्य गरिब घरातला मुलगा अशा परिक्षा देण्याचा विचार सोडून द्यायची शक्यता असते. तस काही असतच तर एक विचार करा विश्वास नांगरे पाटील असोत किंवा संदिप पाटील असोत किंवा रोहिणी भाजीभाकरे असतो अशी कित्येक नाव आपल्या गावी देखील नसती…
बाकी त्यांचे फोटो टाकून त्यांच्या दिसण्यावरून किंवा कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांसाठी इतकच सांगता येईल की भावड्यांनो सुधरा बे…!
हे ही वाच भिडू
- सरकारने UPSC पास नसलेल्या ९ जणांची निवड अधिकारी म्हणून केली आहे.
- पुण्यात MPSC, UPSC करणारी पोरं हा राष्ट्रीय मुद्दा आहे, कारवाई करावी.
- ही पाच वाक्ये तुमच्या खोलीत नसतील तर MPSC साठी तुम्ही अपात्र आहात !