देशातील धनाढ्य मुकेश अंबानी सध्या अनमोल अंबानींमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेत

देशातील सगळ्यात श्रींमत व्यक्तींमध्ये ज्यांचं नाव येतं ते मुकेश अंबानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये झळकत असतात. सध्याही ते चर्चेत आले आहेत मात्र यामागे त्यांची एखादी डील किंवा त्यांना व्यवसायात झालेला लॉस असं काही कारण नाहीये. शिवाय त्यांचा स्वतःचा यामध्ये समावेश नाहीये तर यामागचं कारण आहे ‘अनमोल अंबानी’.

अनमोल अंबानी यांनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. कृशा शाह असं अनमोल यांच्या साथीदाराचं नाव सांगण्यात आलंय. मात्र अंबानी कुटुंबाकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

कोण आहेत अनमोल अंबानी?

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी आणि वहिनी टिना अंबानी यांचा मुलगा म्हणजे जय अनमोल अंबानी. यांच्याबद्दल अनेकांना माहित नाहीये कारण अनमोल अंबानी यांना लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९९१ चा. आज त्यांचं वय ३० वर्ष आहे. मुंबईत जन्मलेल्या अनमोलने कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि नंतरच शिक्षण ब्रिटनमधील सेव्हन ओक्स स्कूलमध्ये पूर्ण केलं. तर वॉरविक बिझनेस स्कूलमधून पदवी देखील मिळवली आहे.

त्यानंतर काही महिने रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी इंटर्नशिपही केली. यावेळी ते फंड हाऊसच्या संशोधन विभागात कार्यरत होते. नंतर त्यांना ऑगस्ट २०१६ मध्ये रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालक म्हणून समाविष्ट करण्यात आलं, तेव्हा ते अवघे २४ वर्षांचे होते. ही कंपनी आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संबंधित आहे.

रिलायन्स कॅपिटल एकेकाळी विमा आणि म्युच्युअल फंडांसह प्रमुख क्षेत्रातील उपकंपन्यांसोबत वित्तीय सेवांचं पॉवरहाऊस होती. जेव्हा त्यांनी ही कंपनी जॉईन केली होती तेव्हा त्याच्या विकासासाठी ते आधीच कामाला लागले होते. ते इंटरनल बिजनेस रिव्यूजमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे. वडिलांच्या व्यवसायातील अनमोलच्या सक्रियतेमुळे त्यांची चांगली प्रतिमा बनली. 

कंपनीचे मालक असलेल्या अंबानी यांचं नाव जरी अनमोल अंबानी लावत असले तरी त्यांच्यासोबत संपर्क साधनं सोपं असायचं इतके ते डाऊन टू अर्थ आहेत, असं त्यांचे सहकारी सांगतात. ते सर्वांशी हसतमुखाने बोलत असत. सोबतच अनमोल यांनी अनेक महिलांना रोजगाराशी जोडलं आहे. विशेषत: पहिल्यांदाच आई बनलेल्या महिलांना वाढीव रजा किंवा घरून काम करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली.

रिलायन्स कॅपिटल आधी बीएफएसआय क्षेत्रात होती, तरीही अनमोल यांनी क्लाइंट्स सोबत थेट संपर्क येणाऱ्या लोकांना सोडून सर्वासाठी कॅज्युअल पोशाख घालण्याचा नियम आणला. त्यांचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असून ते नेहमी सहायक कंपन्यांच्या सीईओंना भेटी द्यायचे, असं देखील त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अनमोल सध्या तीन कंपन्यांमध्ये संचालक आहेत. या कंपन्या म्हणजे कायझर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडकायझर परसूएट प्रायव्हेट लिमिटेड, मांडके फाउंडेशन (Mandke Foundation).

इतकंच नाही तर जय अनमोल अंबानी कुटुंबातील इतर मुला-मुलींप्रमाणे लक्झरी लाइफ जगतात. एका रिपोर्टनुसार, त्यांना आलिशान आणि महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्यांची ही आवड ते जोपासतात म्हणून त्यांच्याकडे अनेक लग्झरी गाड्यांचा संग्रह असून खाजगी जेट देखील आहे. जय अनमोल यांचा अजून एक छंद म्हणजे फुटबॉल. ते रिअल माद्रिद क्लबचे चाहते असल्याचं सांगितल्या जातं.

कृशा शाह कोण आहेत?

कृशा निकुंज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निकुंज शहा यांची मुलगी आहे. तर तिची आई नीलम शाह या फॅशन डिझायनर आहे. कृशा  स्वतः एक व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कृशा तिचा भाऊ मिशाल शाह सोबत DYSCO नावाची कंपनी चालवते. यासोबतच ती त्याची सह-संस्थापक देखील आहे. 

कृशा आणि अनमोल यांची भेट त्यांच्या कुटुंबाने करून दिली होती. हळूहळू ते एकमेकांना ओळखत गेले आणि आता गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली आहे. कृशाचं तिच्या कामाप्रती इमानदार असणं आणि समर्पकता बघून अनमोल तिच्याकडे आकर्षित झाले होते. शिवाय त्यांच्या अनेक गोष्टींतील आवड एक असल्याने ते एकमेकांच्या जवळ आल्याचं सांगण्यात येतंय. 

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Suresh says

    I dont find the news about Anmol – Mukeshbahi Ambani. Incomplete story.

Leave A Reply

Your email address will not be published.