एकही एअरपोर्ट नसणाऱ्या अंटार्क्टिकावर पहिल्यांदाच प्रवासी विमान लॅंड झालंय…

तुम्ही म्हणालं की, एखद्या ठिकाणी प्रवासी विमान उतरविण्यात आलं त्याच एवढ काय कौतुक. मात्र,  अंटार्क्टिका खंड अशी जागा आहे जिथे १२ महिने बर्फ असतो. तिथेआपल्या सारख्या माणसाला चालायला सुद्धा जमत नाही. अशा बर्फाळ प्रदेशावर जायचं काय सोपं काम नसते. तिथे चक्क एक प्रवासी विमान उतरविण्यात आले आहे.

अंटार्क्टिकावर प्रवासी विमान उतरवून या कंपनीने इतिहास रचला आहे. ही कंपनी पर्यटन क्षेत्रात काम करणारी आहे. या कंपनीने एअरबस कंपनीचे ए-३४० हे मोठे प्रवासी विमान अंटार्क्टिकावर उतरविण्याचे धाडस केले आहे. या कंपनीने विमानं हे भाडेतत्वावर घेतले होते.

अंटार्क्टिकावर प्रवासी विमान उतरविणाऱ्या कंपनीचे नाव Hi Fly असे आहे. अंटार्क्टिकावर यशस्वी आणि सुरक्षितपणे प्रवासी विमान उतरविण्यात कंपनीला यश मिळाले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील एअरपोर्ट मधून विमाने उडाले होते. पाच तासांच्या प्रवासा नंतर हे विमान अंटार्क्टिकावर पोहचले. हा प्रवास २ नोव्हेंबर रोजी हे विमान अंटार्क्टिकावर उतरविण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या वतीने त्याचा व्हिडिओ आता पब्लिश करण्यात आला आहे. त्याच दिवशी तीन तासानंतर हे विमान परत केप टाऊन येथे गेले.

या प्रवासी विमानाची क्षमता २९० प्रवासी एवढी आहे.

Hi Fly ही कंपनी ही अंटार्क्टिकावर अनेक प्रकल्प राबवित आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, अंटार्क्टिकावर ही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. यावर कंपनीच्या वतीने काम करण्यात येत आहे.  पुढील काही वर्षात अंटार्क्टिका हे जगभरातील पर्यटकांचे केंद्र बनेल. त्यासाठी कंपनीच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

५ वेळा प्रयत्न केल्या नंतर २३ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा हे विमान अंटार्क्टिकावर लॅंड झालं आहे.

अंटार्क्टिका खंडावर वर्षभर काही मीटर उंच बर्फ जमलेला असतो. अशा भागावर विमान लॅंड करण्यासाठी रनवे बनविणे सोपे काम नव्हते. तो बनविल्या नंतर सुद्धा विमान योग्य प्रकारे लॅंड होईल की, नाही याची शाश्वती नव्हती. हा रनवे तीन हजार मीटर लांबीचा आहे.

हे विमान खुद्द Hi Fly कंपनीचे उपाध्यक्ष कॅप्टन कार्लोस मिरपुरी हे चालवीत होते. येथे विमान उतरविणे जिकरीचे काम आहे. त्यामुळे अनुभवीच वैमानिक हवा. 

२०१९ पासून अंटार्क्टिकावर प्रवासी विमान लॅंड करण्याचा ५ वेळा प्रयत्न करण्यात आला होता. ६ व्या प्रयत्नावेळी मात्र कुशल वैमानिकांनी अंटार्क्टिका खंडावर प्रवासी विमान लॅंड करून दाखविले. अंटार्क्टिकावर एकही विमानतळ नाही. तेथे ५० रनवे तयार करण्यात आले आहेत.

वुल्फ्स फॅंग या कंपनीचा एडवेंचर कॅम्प अंटार्क्टिका खंडाच्या दक्षिण टोकाला आहे. या विमानाद्वारे काही वस्तू या कॅम्प पर्यंत पोहचविण्यात आल्या आहे असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

अशा प्रकारे प्रवासी विमान अंटार्क्टिकावर लॅंड झाल्याने अनेकांसाठी पर्यटनाचे दार उघडे होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन देश अंटार्क्टिकावर होणाऱ्या प्रकल्पासंदर्भात आग्रही असल्याचे समजते. 

सध्या अभ्यासक, इच्छुक अंटार्क्टिकावर जहाजाद्वारे पोहचतात. मात्र २ नोव्हेंबर रोजी अंटार्क्टिकावर प्रवासी विमान लॅंड झाल्याने भविष्यात अनेक विमान कंपन्या इथे आपले विमान पाठवतील असे बोलण्यात येत आहे.   

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.