अन् थलपतीचा रेकॉर्ड झालाय, त्याच्या या 9 पिक्चर्सनी 100 कोटींचा टप्पा पार केलाय..
थलपती विजय..नुसतं नाव जरी काढलं ना तर मागं म्युझिक चालू होतय. सगळं जग स्लो मोशनमध्ये जातय. डोक्यावरचा फॅन पण कुरकुर करत हळुहळु बंद होतोय. खिडक्यांमधून वारं सुटतय. धुरळा उडतोय आणि म्युझिक लाऊड होत जातय.
आणि धुरळ्याच्या राड्यात ऱ्हिदम बसतोय आणि विजयची एन्ट्री होतेय. विजयचं नाव जरी निघालं ना तरी इतकं सगळं आजूबाजूला घडत असल्यासारखं वाटतं.
याच विजयने आत्ता आपल्या करियरमधले 10 सिनेमे 100 कोटींच्या घरात नेलेत.
इकडं अख्ख्या बॉलिवूडला वर्षभरात हजारभर पिक्चर काढून जमत नाही ते विजय दरवर्षी करतो. म्हणजे आत्ता विजयनं एक मार्केट सेटच केलय. ते म्हणजे तो काहीही करो 100 कोटी तर फिक्सचं.
आत्ताची बातमी काय आहे…
झालेलं काय पुष्पा आला सुपरहिट झाला,RRR, KGF पण हिट झाले.. याच राड्यात विजयचा बिस्ट आला. सोशल मिडीयावर सिनेमाची म्हणावी तितकी हवा झाली नाही. लोकं बोलली बिस्ट पडला पण साऊथचं मार्केट वेगळं असतय.
या सिनेमानं जगभरात अडीचशे कोटींचा गल्ला मारलाय तर एकट्या तामिळनाडूत हा आकडा 128 कोटींचा झालाय. थोडक्यात काय साऊथवाल्यांसाठी आत्ता दिड दोनशे कोटींचा गल्ला हाणला तरी सिनेमा पडला अस झालय.
पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिटच झालाय. आणि त्याचबरोबर आपले 10 सिनेमे 100 कोटींच्या घरात घेवून जाणारा विजय किंग ठरलाय..
खालील परिच्छेद विजय कोण आहे हे माहित नसणाऱ्यांनी वाचावा,
बाकीच्या मंडळींनी थेट खाली जावून विजयच्या 100 कोटींचा आकडा पार करणाऱ्या 10 सिनेमांच्या यादीची नोंद घ्यावी.
कोणाय थलपती विजय..
तामिळ स्टार थलपती विजय ४७ वर्षांचा सुपरस्टार. फिल्म प्रोड्युसर आणि दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर आणि पार्श्वगायीका शोभा चंद्रशेखर यांचा विजय हा मुलगा. पण आईवडिलांची आणि विजयची स्टोरी वेगळी आहे. ती यापूर्वी बोल भिडूने केलेली होती. खालील लिंकवर क्लिक करुन आपण ती वाचू शकता.
विजयची तामिळ सिनेमात एन्ट्री झाली ती १९९२ साली आलेल्या नालया थीरपू या सिनेमातून. त्यानंतर सेंढूरापंदी मध्ये त्याने विजयाकंथ सोबत काम केलं होतं. पुढे रसिगन, विष्णु, देवा मध्ये काम केलं. शिवाजी गणेशन यांच्यासोबत वन्स मोर या सिनेमात त्याला काम करण्याची संधी मिळाली.
पण १९९६ साली आलेला पुवे उनक्कांगा सिनेमामुळे तो स्टार झाला. कधालुक्कू मरियाधई हा त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमासाठी विजयला तामिळनाडु सरकारने सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देखील दिला.
त्यानंतर कुशी, प्रियामानावाले, फ्रेन्डस् आणि बद्री यातून विजय थलपथी विजय होत गेला. इथपर्यन्त पडणं आपटणं उभा राहणं चालूच होतं. पण २००४ साली घिल्ली रिलीज झाली. ही विजयची सर्वात सुपरहिट फिल्म होती. त्यानंतर त्याला ॲटलिची सोबत मिळाली आणि खेळ सुरू झाला तो पैशाचा..
आत्ता थलपती विजयच्या १०० कोटींच्या सिनेमाची एकदा यादी पाहू..
1) Thuppakki
थुप्पक्की हा थलपती विजयचा पहिला शंभर कोटीचा गल्ला केलेला सिनेमा होता. या पिक्चरमध्ये विजयने आर्मी ऑफिसरचा रोल केला होता. २०१२ साली आलेल्या या सिनेमाने १२० कोटींचा गल्ला केलेला. विद्युत जामवाल, काजल अग्रवाल देखील या सिनेमात होते.
2) Kaththi
ए.आर. मुरूदास या दिग्दर्शकांचा २०१४ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने १३० कोटींचा गल्ला कमावला. या सिनेमात विजय सोबत समंथा होती. तमिळ सिनेमातला बेसिक जॉनर गावकऱ्यांना एकत्र करून अन्यायाच्या विरोधात उभा राहणं ही बेसिक लाईन होती.
3) Theri
थेरी हा पिक्चर हिट होण्याचे कारण यात विजयने डबल रोलमध्ये धमाका केला आहे.एकीकडं त्यानं सामान्य वडीलांची भूमिका केली आहे. तर दुसरीकडं त्यानं पोलीस ऑफिसरचा खतरनाक ॲक्शन रोल केला. यात विजय ने पोलीस ऑफिसरचा भूमिका तर लयचं खतरनाक केली .
या सिनेमाने १५० कोटींचा गल्ला केलेला..
4) Bairavaa
बैरावा हा विजयच्या सुपरहिट पिक्चरपैकी एक. या पिक्चरमध्ये विजय केलेली फायटिंग आणि किर्ती सुरेशने अन्याया विरूद्ध उठावलेला अवाज.
विजय केलेली एक्टींगमुळे हा पिक्चर विजय, किर्ती, आणि विलेन या तिघांमुळे हा पिक्चर बॅाक्स ऑफिसवर चालला झाला. विजयने केलेली फायटिंग हिट होण्याचे एक कारण आहे. या पिक्चरची कमाई ११४ कोटी रूपये झाली आहे.
5) Mersal
मर्सल हा विजय कुमारचा निर्माता एटली कुमारसोबतचा दुसरा पिक्चर होता. मर्सल ही विजय फिल्म आरोग्य, हॉस्पिटल, ओषधे या विषयाला केंद्रस्थानी ठेवूनच तयार केलेली आहे. यात अवयव विक्रीला आळा कसा घालता येईल.
यासाठी विजय कुमारने ॲक्शन केली. या सिनेमात काजल अग्रवालनी हिरोइनची भूमिका साकारली आहे. विजयने लोकांना न्याय देण्याचे काम केले. या कारणांनी हा चित्रपट हिट झाला आहे. हा पिक्चर २०१७ मध्ये रिलीज झाला होता. मर्सल या पिक्चरने २६० कोटीची कमाई केली होती.
6) Sarkar
थलपाथी विजयच्या सरकार पिक्चरनं बॅाक्स ऑफिसवर लयच राडा घातला होता. पिक्चर हिट होण्याचं कारणं त्यातील एक्शन, स्टाईल, गुडांना मारण्याची स्टाईल, एक्टींगची पद्धत, सिगारेट ओढण्याची स्टाईल, बारीक सारीक गोष्टीने पाहणारे विजयचे फॅन होतात.
विजयचे पिक्चरमधील स्टंट, पाहण्यासाठी निम्मे कार्यकर्ते येतात. त्याची बोलण्याची स्टाइल, यामुळं पिक्चर हिट होत आहे. या पिक्चरचा बॅाक्स ऑफिसचा गल्ला २४३ कोटी झाला तर वर्ल्डवाइड कमाई ही २७० कोटी झाली आहे.
7) Bigil
हा विजयचा फुटबॅाल, राजकारणांशी संबंधित पिक्चर आहे. या पिक्चरमध्ये विजय दोन रोलमध्ये काम करत आहे. एकात रावडी तर दुसऱ्या रोलमध्ये कोच दिसतो. यात हिरोइन नयनतारा सहगल आहे. यात विजय फुटबाॅल कोच व राजकारणी असतो.
विजय या पिक्चरमधील स्टंट लयच खतरनाक आहे. त्यामुळे तर पिक्चर हिट झालेला दिसतो. या पिक्चरची कमाई भारतात ११० कोटी झाली तर वर्ल्डवाइडचा एकूण गल्ला ३०१ कोटीच्या पुढं गेला आहे.
8) Master
मास्टर पिक्चरमध्ये तर विजयने फुल राडा केला आहे. त्यात तो प्राध्यपक असतो. पण भयानक खतरनाक फायटिंग केली, मुलं तर सोडा गुंडे पण लय टरकत असतात. काही पिक्चर तर त्याच्या नावामुळंच हिट होतात.
हा पिक्चर २०२१ ला आला, पण करोनामुळ प्रदर्शित होवू शकला नाही करोनानंतर प्रदर्शित होणारी ही पहिली फिल्म होती. या पिक्चरची भारतातील कमाई १५४ कोटी तर वर्ल्डवाइड कमाई २२३ कोटी रूपये झाली होती.
9) Beast
नुकताच आलेला हा पिक्चरपण धुमाकुळ करतोय. त्यामुळच विजयने १०० कोटी कमाई करून दिलेल्या सिनेमांची यादी ९ झालेली आहे. सध्या या सिनेमाचा गल्ला २२० कोटींच्या घरात गेल्याचं सांगितलं जातं.
हे ही वाच भिडू
- पुष्पाला श्रेयस, बाहुबलीला शरद केळकर असाच KGF च्या रॉकीला सचिन गोळेने आवाज दिलाय
- काश्मिर फाईल्सला २०० कोटींसाठी २ आठवडे लागले, RRR ने ४ दिवसात कसं गणित जमवलं..
- बाकीचे नेते राजकारणासाठी फेसबुक वापरतात, तर तामिळ नेते सिनेमा…