काही वर्षांपूर्वी तो कपड्यांच्या दूकानात काम करायचा, आज त्याची ४३.७ कोटींची कंपनी आहे

खरं सांगू का, माणसं श्रीमंत कशी होतात हा प्रश्न आम्हाला लय वेळा पडतो. त्यातही श्रीमंत लोकं श्रीमंत होतात यावर आमचा ठाम विश्वास होता. लहानपणापासूनच ठैवले अनंत तैसेची रहावे आणि पैसा पैशाला खेचतो ही दोन वाक्य ठामपणे मनावर कोरूनच ठेवली होती. पण झालं असं की आजूबाजूला सक्सेस स्टोऱ्या दिसायला लागल्या.

मग मत बदलत गेलं, भिडूंनो पैसा पैशाला खेचतो हे खरं असलं तरी तो आपण खेचायला लागतो.

तशीच ही स्टोरी आहे. बघायला गेलं तर साधी वाटणारी पण लय भारी…

तर अनुज मुंदडा अस या माणसाचं नाव. त्यांची कंपनी सध्या NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सेंज मध्ये लिस्टेड आहे. ४३.७ कोटींच कंपनीच भाग भांडवल आहे. आत्ता यात काय विशेष तर हे सगळं ज्याचं आहे तो काही वर्षांपूर्वी कपड्याच्या दूकानात गिऱ्हाईकांना कपडे दाखवण्याचं काम करायचा.

त्याला तेव्हा महिन्याला १,४०० रुपये पगार होता. महिना चौदाशे रुपये पगार ते ४०-५० कोटींची कंपनी म्हणल्यानंतर स्ट्रगल तर वाचलाच पाहिजे.

अनुज मुंदडा अस त्यांच नाव. जयपुरचा हा माणूस. २००१ साली तो जयपुरच्या एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. तेव्हा त्याला महिना पगार होता तो १४०० रुपये. या पगारात दिवसभर कपड्यांच्या घड्या घालायच्या, लोकांना कपडे दाखवायचे आणि जमल तस घर चालवायचं असं त्याच रुटिन झालेलं. त्यानं सुद्धा असचं मर-मर काम करुन आपल्याला आयुष्य काढायला लागणार आहे हे समजून घेतलेलं.

पण एक दिवस आलाच…

२००३ च्या सुमारास त्याने धाडसी निर्णय घेवून नोकरी सोडली. जयपुरी सुटचं सगळ्या भारतात मार्केट आहे हे त्याने ओळखलं. आपल्याला यातून महिना पाच-दहा हजार तरी कमावता येतील म्हणून तो काम करु लागला.

जयपुरी सुटसाठी जे कापडाचे तुकडे लागतात त्याचा व्यापार सुरू केला. विक्रेत्यांना जयपुरी सुटचे कटिंग विकणे हाच त्याचा बिझनेस. त्यानंतरच्या टप्प्यात गडी हळुहळु होईना का सेट होत गेला. दरम्यान लग्न झालं. ब्लॉक आणि स्क्रीन प्रिटिंग देखील सुरू करण्यात आली. खूप छोट्या पातळीवरचा खूप छोटा व्यापारी अशीच त्याची ओळख झाली..

आत्ता या पठ्ठ्याच्या आयुष्यात दूसरा क्लॉयमॅक्स आला..

झालं अस की, २०१२ साली एका कामासाठी अनुज दिल्लीला गेला. दिल्लीत त्याला मोठ्ठ मोठ्या होर्डिंगवर JABONG, SNAPDEAL, FLIPCART च्या जाहीराती दिसल्या. अरे हे तर ई कॉमर्स. तुमची आमची रिएक्शन अशीच असती. पण या गड्याला यातलं काही माहितीच नव्हतं. त्याने मग चौकशी केली. तेव्हा घरबसल्या शॉपिंगची सुरवात झालेली पण म्हणावी अशी विश्वासहार्यता त्यामध्ये नव्हती..

जयपूरमध्ये आल्या आल्या या माणसाने गावातला एक CA गाठला. त्याला सगळा प्रकार समजावून सांगितला.आत्ता आपल्याला ऑनलाईन जयपुरी सुट विकायचे आहेत म्हणून सांगितलं.

तेव्हा CA ने पहिला त्याला jaipurikurti.com नावाचं डोमेन घेवून दिलं. याच वर्षी नंदनी क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड सुरू करण्यात आली व त्याअंतर्गत जयपुरी कुर्ती डॉट कॉम सुरू करण्यात आलं.

धाडस करुन सगळीकडे जाहीरात करण्यात आली. याचा परिणाम काय झाला सांगायचं तर या माणसाने पहिल्याचं वर्षी ६० लाखांचा धंदा केला. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर यायला लागल्यानंतर त्याने पैसे उधार घेतले आणि शिलाई मशिन घेतले. स्वत:च मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारलं.

यावर अनुज सांगतो की, सुरवातीच्या काळात लोकांना खूपसाऱ्या शंका असायच्या. कपड्याच्या फिटींग पासून ते क्वॉलिटी पर्यन्त. पण याच काळाच एक फायदा आम्हाला झाला. तो म्हणजे २०१२ च्या सुमारास म्हणावे तसे प्रतिस्पर्धी नव्हते. आम्हाला ऑर्डर यायच्या तेव्हा सुट सोबत आम्ही आमच्या ब्रॅण्डचे जाहीरात टाकायचो. अशा जाहिराती भडकपणे न करता यावर जयपुरी कुर्ती काय आहे आमचा ब्रॅण्ड काय आहे याची ओळख करुन द्यायचो. त्याचा फायदा असा झाला की ब्रॅण्डवर लोकांचा विश्वास बसला.

सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे रिटर्न पॉलिसी.

आम्ही ती नेहमी खुली ठेवली. कारण इतर कपडे आणि जयपुरी सुटचं फिटींग यात तफावत असायची. लोकांना अंदाज यायचा नाही. एकदा एखाद्याने जयपुरी सुट घेतला आणि त्याला तो बसला नाही तर त्याच्यासोबतचा व्यवहार तिथेच थांबायचा. पण कस्टमर केअरच्या नंबरमुळे त्याला योग्य प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे झालं अस की एखादा ग्राहक दूसऱ्यांना आमच्याबद्दल सुचवायचा. ऑनलाईन का होईना पण लोकांना जोडून घेण्याचा या धंद्याने चांगला जम बसवला.

काही काळानंतर म्हणजे ऑक्टोंबर २०१६ साली NSE च्या एमर्ज मध्ये कंपनी लिस्टेड करण्यात आली. नंदिनी क्रिएशन ने आपली IPO सार्वजनिक केली. १४ लाख शेअर्स ४ कोटींनी विकण्यात आले. हीच आमची सुरवात होती.

जून २०१९ मध्ये कंपनीने साडे सात कोटींची विक्री केली. तर जून २०२० ला लॉकडाऊन असताना देखील ७ कोटींची विक्री करण्यात आली. आत्ता २०२१ मध्ये ही कंपनी वार्षिक १०० कोटींची विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईन स्टोअर काढण्याच्या तयारीत देखील तो आहे.

बघा कधीकाळी दूसऱ्याच्या कपड्याच्या दूकानात काम करणारा अनुज आज स्वत:च्या कपड्यांच्या दूकानातून वार्षिक १०० कोटींची विक्री करण्याचं ध्येय ठेवतोय.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kunal Shahuraje says

    विना सरकारी तिजोरीवर ताण न पडता!पेट्रोल च्या किमती कशा कमी करता येतील?

Leave A Reply

Your email address will not be published.