सैराटमुळे जातीची बंधने तुटली असतील, तर अनुप जलोटामुळे वयाची बंधने नक्कीच तुटतील.

करुन करुन भागलं आणि देव पुजेला लागलं. गावाकडच्या म्हणी या शाश्वत असतात. माणसं म्हातारपणी देवधर्माला लागतात हा इतिहास आहे. पण काही माणसं प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासाठीच जन्माला येतात. अनुप जलोटा हे देखील त्यापैकीच एक. शाश्वत म्हणीला खोटं ठरवण्यासाठीच आयुष्यभर देवपुजा करुन शेवटाकडे जाताना करायची भारी हौस आली म्हणून सध्यस्थिती ते टिकेस पात्र ठरत आहेत. 

असो मुद्दा असा आहे की, अनुप जलोटा सध्या त्यांच्या २८ वर्षीय जसलीन मथारू या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आले आहे. त्या दोघांनी बिग बॉसमध्ये भाग घेतलाय. आत्ता बिग बॉस वाले आयत्या संधीच्या शोधात असतातच. हिच संधी भजनसम्राट व्यक्तिमत्वाने दिली तर मग काय शो ला चांद चांदच लागले. तर सध्या काहीस अस बिग बॉस आणि अनुप जलोटांच झालं आहे. 

दिलीप कुमार सायराबोनो, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया, सचिन तेंडुलकर आणि अंजली, करिना कपुर आणि सैफअली खान, प्रियंका चौप्रा आणि निक जोनास आणि हो गेलाबाजार आपला मिलींद सोमण आणि अंकिता कौंवर हे आलेच तर अशी लांबलचक लिस्ट आपल्यापुढे आहेत. तर मॅटर असाय की अशीच आपल्याला कुठं काय शिजलं की चर्चा करायची दांडगी हौस. त्यात वयात बसत नसलं, जातीत बसतं नसल, एक डावं एक उजवं असलं की लगेच पारावर बसायची घाई करायची असते. साहजिक आहे हे खूप खूप वर्षांपुर्वीपासूनच चालत आलय तर आपण तरी काय करणार. 

शेवटी काय आमचं काम आहे सांगण. कोण तरी कुणाच्या तरी कानाला लागून अनुप जलोटाचं समजलं का म्हणून तुम्हाला सांगाय येणार आणि तुप लावून चार वाढीव गोष्टी सांगणार म्हणून आम्हीच सांगाव म्हणलं ते पण वाढीवपणा न करता. जस्स हाय तस्स. 

तर अनुप जलोटा कोण कुठेल कसले त्यांनी काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी कितीजरी घोडे दामटवले असले तरी असल्या चर्चांमध्ये त्याचा काहीएक उपयोग नसतो मुद्दा फक्त असतोय. कस, कस आणि कुणाबरोबर ! 

तर अनुप जलोटांची पहिली बायको !

सोनाली सेठ अस त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव. ते एकत्र भजनाचे कॉन्सर्ट करायचे. यामध्येच त्यांची मैत्री झाली. मैत्रीतून पुढे प्रेम आणि प्रेमातून लग्न. तो काळ देखील टिपीकल प्रेमाचा असल्यानं यात चर्चा करण्यासारखं विशेष अस काही निघालं नाही. पण कहानीत थोडासा ट्विस्ट म्हणून सोनाली सेठ यांनी अनुप जलोटांना राजीनामा दिला आणि सिंगर रुप कुमार राठोंड सोबत लग्न केलं ! 

अनुप जलोटांची दूसरी बायको ! 

बिना भाटिया अस त्यांच नाव. लव्ह मॅरेंजवरचा विश्वास उडाला कि माणूस अरेंन्ज मॅरेजकडे वळतो. अनुप जलोंटांच देखील तसच झालं. लव्ह मॅरेंजनंतर त्यांनी घरातल्यांच ऐकून ठरवण्याचा कार्यक्रम केला. घरातल्यांनी मुलगी फिक्स केली. कांदेपोहे झाले आणि लग्न झालं. ठरल्याप्रमाणे घटस्फोट देखील झाला. 

अनुप जलोटांची तिसरी बायको ! 

हे वरचढ प्रकरण होतं. म्हणजे कस तर तुम्हाला गुजराल माहित आहेत का ? हां तेच ज्यांच्या विदेशनिती वर दोन चार मार्काचा प्रश्न MPSC अधनंमधनं विचारत असते. ते आपले पंतप्रधान होते आणि त्या पंतप्रधानांची पुतणी ( हा सख्खी पुतणी)  तर त्या शेखर कपुर यांच्या पत्नी होत्या. त्यांच बिघडलं आणि अनुप जलोटांनी तिसरं लग्न म्हणून त्यांच्याशी लग्न केलं.

हेच ते पुस्तक.

आत्ता फुल्ल आणि फायनल संसार चालू झाला. या दरम्यानचा देखील एक किस्सा आहे तो देखील इस्त्राईल मॉडेलचा. तर २००९ च्या दरम्यान रिना गॅलोन नावाची मॉडेल भारतात स्ट्रगल करण्यासाठी आली. तिने इथे जे काही झालं त्यावर पुस्तक लिहलं याच पुस्तकातं तिने सांगितल की एका कंपनीच्या संदर्भातून तिची आणि अनुप जलोटांची मैत्री झाली. अनुप जलोटांनी तिला तिच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली. तीने सोबत काम करायचं निश्चित केलं. त्यानंतर ती लिहते की, अनुप जलोटा तिच्यावर महेरबान होत गेले. ते त्यांच्या पत्नीच्या आजारपणामुळे तिच्यापासून दुरावले असल्याचं सांगितलं. पुढे तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करु लागले आणि अध्यात्मिक प्रेम म्हणजे काय इथपासून ते आपलं कस जुळेल याबाबत गप्पा मारू लागले. 

हे ही वाचा –  

पण हे प्रकरण थेट पुस्तकात छापून आलं. इस्त्राईलची मॉडेलने त्यांना चारा टाकला नाही. असो पण अनुप जलोटांनी आत्ता अधिकृतरित्या चौथ्यांदा प्रेमात पडलेत. त्यांच्या वयाचं अंतर ३७ वर्ष आहे. हे ही नसे थोडके !!!

सैराटमुळे जातीची बंधने तुटणार असली तर अनुप जलोटांमुळे वयाची बंधने तुटावीत अशी किमान अपेक्षा आपण व्यक्त करुच शकतो. सांगायचं इतकचं कि कित्येक प्रेमांना आपण लफडी म्हणूनच बघतो. वाचताना देखील तशीच वाचतो. पण त्या दोघांच नेमकं काय हे आपणाला माहित नसतं. त्यातून अंदाज लावून चर्चा करण्यापेक्षा आशिर्वाद द्यायचं काम करा. नायतर पुढच्या जन्मी वडाचं झाड म्हणून जन्माला याल.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.