अनुपमा हत्याकांड ज्यात शरीराचे ७२ तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवले होते…

श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची हत्या प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता.

यानंतर आठवण काढली जात आहे ती २०१० मध्ये घडलेल्या अनुपमा हत्याकांडाची 

राजेश गुलाटी हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. देहरादुन येथे पत्नी अनुपमा आणि मुलांसासोबत राहत होता. अनुपमा आणि राजेश ने १९९९ मध्ये लव्ह मॅरेज केला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्या वादविवाद व्हायायला सुरुवात झाली होती. मात्र त्यांचे लव्ह मॅरेज झाल्याने राजेश तिची कधी हत्या करेल असा कोणालाच वाटलं नव्हते. 

लग्नानंतर अनुपमा अमेरिकेला गेली होती. २००८ मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर अनुपमा आपल्या माहेरच्या घरात मुलांसोबत राहू लागली. दोघांमधील हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. दोघांना दोन मुले होती.

दुसरीकडे राजेश नोकरीसाठी कोलकाता येथे गेला होता. यादरम्यान त्यांची एका सहकाऱ्याशी जवळीक वाढली आणि दोघेही एकत्र राहू लागले. महिलेचे आधीच लग्न झाले होते. स्थानिक लोकांनी विरोध सुरू केल्यावर आर्य समाज मंदिरात लग्न लावून दिले. मंदीमुळे राजेशची नोकरी गेली आणि महिलेचा पती परत आला. 

दरम्यान, अनुपमानेही ई-मेलद्वारे संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. राजेश परत आला पण कलकत्त्याच्या महिलेशी त्याचे नाते तुटू शकले नाही. राजेश सहमत न झाल्याने पुन्हा भांडण वाढले. यानंतर राजेशने इंटरनेटवर हत्येचे व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली आणि ‘सायलेन्स ऑफ द लँब’ हा चित्रपट पाहिला होता.

घटनेच्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर २०१० ला मुलं बाहेर गेले असतांना राजेशने आपल्या पत्नीची हत्या केली. मात्र आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने अनुपमाच्या शरीराचे ७२ तुकडे केले. त्यानंतर हे शरीराचे तुकड्यांची विल्हेवाट कशी लावायची याचं टेन्शन राजेश आलं होत. 

पत्नीच्या मृतदेहाचे ७२ तुकडे केल्यानंतर त्यांनी ते डीपफ्रीझरमध्ये ठेवले आणि मसुरीच्या घाटात एक एक करून फेकून दिले. बहीणाचा संपर्क होत नाही अनुपमाची माहिती मिळत नसल्याने तो तिच्या घरी गेला त्यानंतर ही घटना उघडकीस आली.  

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर डेहराडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने १ सप्टेंबर २०१७ ला राजेश गुलाटीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यासोबत १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

न्यायालयाने ७० हजार राज्य निधीत जमा करण्याचे आदेश दिले होते आणि उर्वरित रक्कम मुलांना देण्याचे आदेश दिले होते.  राजेश गुलाटी सध्या डेहराडूनच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.