कायपण म्हणा अशनीर ग्रोव्हर बाप होता, त्यानं पैसा लावलेली कंपनी तिप्पट झाली

भारतात रियालिटी शोची एक पद्धत ठरली आहे. त्यात चार जज असतात, १० सहभागी लोक, शेवटच्या एपिसोड मध्ये एकाला विजेता घोषित करून लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतात एक वेगळा शो आला होता. त्याला शार्क टॅंक असं नाव देण्यात आलं.

शार्क टॅंक मधील जज हे सक्सेसफुल उद्योजक होते. सहभागी होणाऱ्याची नवं उद्योजकाची कन्सेप्ट आवडली तरी त्यात जज इनव्हेसमेंट करत.  स्टार्टअप असणाऱ्या नवीन व्यवसायिकांसाठी ही एक सुवर्णसंधी होती.

इतर रियालिटी शोचा विचार केला हा शो वेगळा होता. यात तुम्हाला तुमची कन्सेप्ट एकदाच सांगावी लागत. तुमच्याकडे लय भारी बिझनेस आयडिया असेल तर तुमची डील पक्की झाली समजा. पहिल्या  सीजन मध्ये नवीन आयडिया घेऊन येणाऱ्या तब्बल ६७ जणांना फंडिंग मिळाल आहे. यातील ४० कंपन्यांना तर पूर्वी कोणीही फंडिंग दिल नव्हतं. ते केवळ शार्क टॅंकच्या माध्यमातून मिळालं आहे. 

या शो मध्ये एकूण ७ जज होते. या सगळ्यात उजवा होता तो म्हणजे अशनीर ग्रोव्हर. त्याने शो दरम्यान विचारलेल्या कडक प्रश्नामुळे तो लक्षात राहिला. तसेच शो सुरु असतांना तो संस्थापक असणाऱ्या ‘भारत पे’ मधून त्याची उचलबांगडी करण्यात आली.  

शो संपून आता २ महिने झाले आहेत. आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोव्हर चर्चेत आला आहे. नवीन आयडिया घेऊन येणाऱ्या अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या अशनीर ग्रोव्हरने केरळच्या केळीच्या चिप्स तयार करणाऱ्या एका कंपनीत इंव्हेसमेंट केली होती. अशनीरच्या गुंतवणुकीमुळे त्या कंपनीला ३ पट नफा झाला आहे. तेही केवळ सहा महिन्याच्या आत.

अशनीर ग्रोव्हर कडक शिस्तीचा उद्योजक म्हणून ओळखला जातो. उद्योग का इमोशनली करायचा नसतो असे ग्रोव्हर नेहमी सांगायचं. यात पैसे कुठं आहेत. पुढे काय होईल असे थेट प्रश्न विचारून समोरच्याला अडचणीत आणत.  यामुळे अशनीर सारख्या बिजनेस मॅन कडून इनव्हेसमेंट मिळवणं तसं सोपं काम नव्हते. मधू मानस ने कमी अधिक नाही तर ५० लाखांची इनव्हेसमेंट मिळविली होती. 

 मानसच्या कंपनीत अशनीरने इनव्हेसमेंट केली म्हटल्यावर त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

मानस मधू तरुण उद्योजक केरळचा असून बियॉड स्नॅक्स; केरळा बनाना चिप्स नावाची त्याची कंपनी आहे. ५० लाख रुपये अशनीर ग्रोव्हरने त्याच्या कंपनीत इन्व्हेस्ट केले. बियॉड स्नॅक्स केळीचे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये चिप्स तयार करते. शार्क इंडिया मध्ये मानसने त्याचा ब्रँडचे जज समोर प्रेजेंटेशन केले होते. त्यावेळी माणसने बाजारात एकही मोठा ब्रँड केळीचे चिप्स तयार करत असल्याचे सांगितले होते.

अशनीरकडून इनव्हेसमेंट करण्यात आल्यानंतर कंपनीचा कसा फायदा झाला. 

सार्क टॅंक मधून इनव्हेसमेंट मिळाली म्हणून बियॉड स्नॅक्सची देशभर जाहिरात झाली.अमेझॉन, फ्लिपकार्टवर अगोदरच बियॉड स्नॅक्सचे चिप्स उपलब्ध होते. शो नंतर मागणी वाढली. कंपनीला संघटित स्वरूप आले. कंपनीकडून  वस्तू घेणे असुद्या, ट्रान्सपोर्ट करणे यात सगळ्यात फरक पडला. इनव्हेसमेंटमुळे कंपनीतील सगळे वातावरण बदलून गेले. अशनीरला रिटेल बाजाराची संपुन माहिती होती. त्याने हि सगळी माहिती मधू मानस सोबत शेअर केली होती. 

सार्क टॅंक नंतर आता ब्रॅण्डची एक वेगळी ओळख निर्माण झाल्याने त्याचा फायदा विक्री वाढीस झाल्याचे मधू मानस सांगतो. 

या याबाबत अशनीर ग्रोव्हर मानस मधू सोबत एक इंस्टाग्राम पोस्ट करून त्याला कॅप्शन दिलं आहे की, बियॉड सँक्सच्या संस्थापकाशी भेटून चांगलं वाटत आहे. केरळ बनाना चिप्स हा शार्क टॅंक सिझन एक मधील पहिला करार होता. त्यात सहा महिन्याच्या आता ३ पटीने फायदा झाला असल्याची माहिती देतो. 

 केरळ मध्ये फिरतांना मधुच्या लक्षात आले होते की, एकूण उत्पादनापैकी ४० टक्के केळी खराब होत आहे. आपल्या शहराचे  केळी वेगळं नातं आहे. होणारी नासाडी थांबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनच बियॉंड सँक्स कंपनी स्थापन केल्याचे मधू मानस सांगतो. एकही मोठी कंपनी केळीचे चिप्स बनवत नसल्याचे हा गोष्टीला मार्केट मध्ये स्कोप असल्याचे मधू मानसने शार्क टॅंक मधील जजच्या लक्षात आणून दिले होते.  

आपल्या ब्रँड बद्दल बोलतांना मानस मधू सांगतो की, बियॉंड सँक्सचे चिप्स हे टेस्टी, हेल्दी आहेत. देशात दुकानात, हॉटेल मध्ये प्रत्येक बटाटयाच्या चिपच्या पॅकेट्च्या बाजूला केरळी केळीची चिप्स असायला हवं. असे स्वप्न मानस बोलून दाखतो. हे चिप्स ४ फ्लेवर मध्ये मिळतात. मागच्या  डिड वर्षात ४० मेट्रिक केल्याचे चिप्स बाजारात आणले आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.