‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीमागचा ऐतिहासिक संदर्भ माहित आहे का ?

प्रत्येक म्हणीमागे काहीतरी अर्थ असतो. अशाच एका रात्रीत कोणतरी लिहतो आणि म्हणी तयार होतात अस नसतय भिडू. म्हणजे सतराशे साठ भानगडी अशी म्हण आपण वापरतो.

या म्हणीं बद्दल सांगायचं झालं तर पानिपत युद्ध १७६१ साली झालं. त्या अगोदर वर्षभरापुर्वी लय भानगडी झाल्या. म्हणून त्यावेळीपासून सतराशे साठ भानगडी हा वाक्य मराठी मातीत रुजलं.

त्याचप्रमाणे बोफोर्स प्रकरण. तोफांचे भष्ट्राचाराचं हे प्रकरण इतकं गाजलं की कुणी पैशाची अफरातफर केली की लोक एकमेकांना त्याने बोफोर्स केला असे म्हणू लागली.

अशीच भानगड आपला हात जगन्नाथ या वाक्याची.

आपला हात जगन्नाथ हा शब्द मुळात सिंगल लोक लय वाईट अर्थाने घेतात. हे वाक्य कधी वापरतात, कशासाठी वापरतात हे सांगण्याएवढं आपण बालबुद्धी तर नसालच. असो पण खरच लोकांना जो अपेक्षित असतो तोच अर्थ या वाक्यामध्ये आहे का? की दूसरा अर्थ आहे? हे सांगण्यासाठी हा लेख.

पहिला मुद्दा आपला हात जगन्नाथ हे मुळचं हिंदी की मराठी. तर हे मुळचं ओरीसा मधलं. त्याचा हिंदी अनुवाद अपना हात जगन्नाथ असा झाला आणि मराठीत ते आपला हात जगन्नाथ अस आलं. याचा संदर्भ देखील पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी आहे.

तो नेमका कसा तर याबद्दलची एक दंतकथा सांगितली जाते.

हा आहे पुरीच्या जगन्नाथ मंदिराची मुर्ती. यामध्ये तीन देव दिसतात. पहिला आहे तो बलबद्र, दूसऱ्या सुभद्रा माता आणि तिसरे भगवान जगन्नाथ. फोटोत पाहिलं तर तुम्हाला या देवतांचे हात दिसणार नाहीत. म्हणजे हनुमान असो किंवा गणपती. प्रत्येक देवाला हात असतो व हातात कोणतरी शस्त्र असतं पण इथे हाताचे तळवेच नाहीत.

तर त्याबद्दलची अख्यायिका अशी की,

त्रेतायुगाच्या शेवटी पुरीच्या समुद्रकिनारी एका वडाच्या झाडाखाली इंद्रनील मणी च्या स्वरुपात जगन्नाथ प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने लोकांना मोक्ष मिळू लागला. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून लोकांची मुक्तता फक्त इंद्रनील मणीचे दर्शन घेतल्याने होवू लागली.

ही गोष्ट यमदेवाला पटली नाही म्हणून त्यांने हा मणी खोल जमीनीत पुरून ठेवला. त्रेतायुगानंतर द्वापरयुगात मालवाचे राजे इंद्रद्युम्न यांना हा मणी पुरल्याची गोष्ट माहित झाली. त्यांनी तप करुन विष्णुला प्रसन्न केले. विष्णुने त्यांना सांगितले की पुरीच्या समुद्रकिनारी जावून तिथे वहात असणारे लाकडाचे ओंडके शोध.

राजाने ते ओंडके शोधले पण याचे काय करायचे ते राजाला माहित नव्हते. म्हणून त्याने पुन्हा तप करुन नरसिंह देवाला प्रसन्न केले. नरसिंह देवाने या लाकडापासून विश्वकर्माच्या तीन वेगवेगळ्या प्रतिमा बनवण्यास सांगितले.

त्याच या प्रतिमा म्हणजे मुर्ती बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ.

या प्रतिमांना हात, कान, नाक, डोळे अस काहीही नव्हतं. त्या लाकडाच्या स्वरुपातच होत्या. पुढे नारदांनी या तीन प्रतिमांपासून तीन मुर्त्या व त्यासाठी भव्य मंदिर उभारण्याची आज्ञा इंद्रद्युम्न राजाला केली. राजाने त्यासाठी विश्वकर्माला प्रसन्न केले. विश्वकर्म विष्णुकडे गेला व विष्णु स्वत: सुताराच्या रुपात राजाच्या दरबारात पोहचले.

सुतार अर्थात विष्णुने सांगितलं की मी या प्रतिमांपासून भगवानांच्या मुर्ती तयार करेल पण त्यासाठी एक अट असेल ती म्हणजे या तीन मुर्ती तयार होत नाहीत तोपर्यन्त गाभारा उघडायचा नाही. राजाने ही अट मान्य केली.

सुताराने मंदिराच्या गाभाऱ्यात तीन प्रतिमांसह स्वत:ला कोंडून घेतलं आणि ते मुर्ती तयार करण्याच्या कामाला लागले.

काही आठवडे गेल्यानंतर राणीला सुताराच्या कामावर शंका आली. तीने गाभाऱ्याच्या दाराला कान देवून आतून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला कोणताच आवाज आली नाही. सुतार कोंडला जावून मेला असावा अशी शंका तिला आली व तीने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली.

राजाने दार उघडून पाहिले तर मुर्ती जवळपास पुर्ण झाल्या होत्या पण मुर्तीचे हात बनवण्याचे राहिले होते. दार उघडताच राजाने अट मोडली म्हणून सुतार गायब झाला. आणि त्या मुर्ती तशाच स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे या मुर्तींना हात नाहीत.

खालील फोटोंमध्ये हाताचे तळवे नसणारे जगन्नाथ आणि बलभद्र व सुभद्रा दिसतात. 

Screenshot 2020 05 20 at 5.22.57 PM

आत्ता त्यानंतर इथल्या प्रांतात एक म्हण रुढ झाली ती म्हणजे भगवान जगन्नाथ हाताशिवाय संपुर्ण विश्वाचा संभाळ करतात. आपल्याजवळ तर हात आहेत. आपण हात असल्यामुळे काहीही करु शकतो.

हे वाक्य चांगल्या कार्यासाठी वापरले जात. म्हणून आपला हात जगन्नाथ आहे अशी म्हणण्याची प्रथा सुरू झाली. ती वेगवेगळ्या राज्यात आपआपल्या भाषेत दृढ झाल्याचं सांगण्यात येत. मात्र लोकांनी एका विशिष्ट कामापुरताच याचा अर्थ घेतला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.