मोबाईलचा बादशाह बनून फिरणारा ॲपल खरं तर अँड्रॉइडचे फीचर्स चोरून मोठा झालाय

‘मोबाईल इजे आलबेज लब’ आता कपाळावर आठ्या येईपर्यंत  विचार करू नका, जे लिहीलंय ते १०१ टक्के खरं आहे. मोबाईल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग बनलायं, ज्यासाठी लोक लाखो रूपये  खर्च करायला सुद्धा तयार आहेत. लाखो रूपये म्हंटल्यावर डोक्यात अॅपलचं नाव आलं असणारं, तर भिडू अंदाज बरोबर काढलायं, विषय अॅपलचाचं आहे.

अॅपल कंपनीचे स्मार्टफोन ज्याला आपण ‘आयफोन’ म्हणतो. अख्ख्या जगात या फोनची एक वेगळीच क्रेझ आहे. स्मार्टफोन कंपन्यांचा बादशाह म्हणून अॅपलला ओळखला जातं. नवनवीन आणि अनोखे फीचर्स, लूक, जबरदस्त कॅमेरा कॉलिटी, बॅटरी बॅकअप, ऑपरेटिंग सिस्टीम आणि  महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी हे सगळ्यांना खरा उतरणारा ब्रँड म्हणजे अॅप्पल.

बरं या आयफोनच्या किमतीसुद्धा काही साध्या सुद्या  नाहीत, ५०  हजारांच्या पुढं ते पार लाखोंच्या घरात आहे. पण तरी सुद्धा ईएमआयवर का होईना मंडळी आयफोन घेतातच. आज मोबाईल कंपन्यांच्या रेसमध्ये अॅपलचेचं फोन सगळ्यात जास्त विकले जातात. कारण आयफोन तुम्हाला फीचर्सच्या बाबतीत कधीच निराश करत नाही. 

आता अॅपलची एवढी प्रशंसा ऐकून अँड्रॉइड वापरणारे मंडळी जरा निराश झाले असतील, त्यात आपण सुद्धा आहे बरं का, आधीच दुसऱ्यांचे आयफोन बघून त्याच कौतुक ऐकून झालेली जखम त्यात ह्या स्टोरीत सुद्धा तेच वाचायचं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं. म्हणून काय लगेच बाहेर पडू नका. कारण स्टोरी अँड्रॉइडवाल्यांच्या कॉलर ताठ करणारी आहे. 

बऱ्याच जणांना माहित नसेल कि, अॅपल ज्या फीचर्सच्या जीवावर उद्या मारतोय, त्यातले बरेचसे फीचर्स हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममधून चोरलेले आहेत. अँड्रॉइड वापरणाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली असलं ना, येऊ द्या, कारण खरचं आहेत अॅपलनं बरेचचे फीचर्स हे अँड्रॉइडवरून कॉपी- पेस्ट केलेत. 

hey siri

आयफोनमध्ये ‘hey siri’ फिचर सगळ्यात महत्वाचं मानलं जात, जे आयफोनला अँड्रॉइडपेक्षा वेगळं दाखवतो. या सिरीच्या फीचरमुळे तुम्ही अॅपलच्या फोन्सवर तुमच्‍या आवाजाच्‍या मदतीने कुठलंही काम करू शकता. पण भिडू तुमच्या माहितीसाठी हे फिचर मुळचं अँड्रॉइडचं आहे. म्हणजे आपलं ok google. जे सगळ्यात आधी मोटो कंपनीच्या फोनमध्ये ते वापरलं गेलं होत. 

law battery mode 

लो बॅटरी मोड हे असं फिचर आहे, जे तुमच्या मोबाईलची चार्जिंग संपत आली कि, मोठं कामाला येत. पण बऱ्याच बर्‍याच वर्षांपासून लो बॅटरी मोडच्या बाबतीत iOS फोन अँड्रॉइडपेक्षा मागे होते.  नंतर हे फिचर iOS ९ मध्ये जोडले गेले.  यामुळे, बॅटरी कमी असताना बॅकग्राउंड अॅप्स आपोआप चालू होतात.   

पिक्चर इन पिक्चर मोड

पिक्चर इन पिक्चर मोड हे अँड्रॉइड फोनमधलं सगळ्यात आवडत फिचर आहे. ज्याच्या मदतीने अँड्रॉइड यूजर्स व्हिडिओ किंवा फिल्म पाहताना ती स्क्रीन मिनिमाइज करून इतर अॅप्सवरही काम करू शकतात. अँड्रॉइडमध्ये हे फीचर २०१७ मध्येच आलं होत.  जे अॅपलला जाम आवडलं ज्यांनंतर अॅपलने अलीकडेच iOS १४ ला सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये ते आणले.    

Home Screen Widget

अँड्रॉइडमधलं विजेट्सचे फिचर आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत.  या फीचरच्या माध्यमातून तुम्ही अँड्रॉइड फोन अॅपचे आयकॉन तुमच्या स्वतःनुसार बदलू शकता.  तसेच, याद्वारे तुम्ही अॅप न उघडता फास्ट मोडमध्ये माहिती मिळवू शकता. 

हे बघून आयफोनसुद्धा या फिचरच्या प्रेमात पडला आणि कंपनीने iOS १४ मध्ये Home Screen Widget चे फीचर देखील लॉन्च केले. फक्त त्यात काही जास्तीची फीचर्स जोडली आणि आपली हवा केली.  या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला कस्टमाइज करू शकता.  

वायरलेस चार्जिंग

आजकाल वायलेस चार्जिंगची जोरदार मागणी सुरुये. कारण कुठेही जाताना चार्जरची वायर घेऊन फिरणं म्हणजे मोठं अवघड काम. त्यामुळे मंडळी मोबाईल घेताना या फिचर बद्दल हमखास विचारतात. हे फिचर सगळ्यात आधी ‘Nexus 4’ स्मार्टफोनने बाजारात आणलं होतं.  याद्वारे, तुम्हाला फोनमध्ये वायर्ड चार्जर बसवण्याची गरज नाही.  तुम्ही लांबूनच स्मार्टफोन चार्ज करू शकता.  अॅपलने हे फीचर आपल्या फोनमध्ये खूप उशिरा आणलंय. 

Water Resistance

बरीचशी  मंडळी या फिचरचा विचार करूनचं आयफोनला पसंती देतात. कारण फोन चुकून पाण्यात पडण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यात पावसाळ्यात स्पेशली फोनसाठी प्लास्टिकच्या पिशव्या सोबत घेऊन हिंडावं लागत. त्यामुळे युजर्सकडून या फीचरसाठी सर्वाधिक मागणी केली जाते. ग्राहकांची ही  मागणी अँड्रॉइड स्मार्टफोन्सने आधी पूर्ण केली.  हे फीचर्स पहिल्यांदा सोनी फोनने आणले होते.  नंतर वाढती मागणी पाहता अॅपलने अँड्रॉइडवरून हे फिचर सुद्धा कॉपी केले.  

अॅप ड्रॉवर

तुम्ही जर खूप वर्षांपासून आयफोन वापरत असाल तर आठवेल कि, आधी iOS डिव्हाइसवर इंस्टॉल केलेले प्रत्येक अॅप तुमच्या होम स्क्रीनवर असायचं आणि ते लपवून ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते एका फोल्डरमध्ये ठेवणं. पण अँड्रॉइड वापरकर्त्यांकडे यासाठी अॅप ड्रॉवर सारखे फिचर होतं, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचे अॅप्स ड्रॉवरमध्ये लपवून तुमची होम स्क्रीन व्यवस्थित करू शकता.  अॅपलने नुकतेच हे फीचर कॉपी केलं आणि  iOS १४ मध्ये लॉन्च केलंय.

टाइप टू स्वाइप

अँड्रॉइड युजर्स बर्‍याच काळापासून ‘टाइप टू स्वाइप’ फिचरचा आनंद घेतायेत. ज्याच्या मदतीने तुम्ही टाईप करण्यापेक्षा कीबोर्डवरून बोट न हटवता नुसतं त्या लेटरवर डायरेक्ट स्वाईप करू शकता. अॅपलने हे फिचर सुद्धा कॉपी करून iOS १३ मध्ये  घेतलंय.  

 डीफॉल्ट अॅप्स सेट करणे

iOS १४ ने अॅपल वापरणाऱ्यांची डीफॉल्ट अॅप सेट करणे सोपं केलंय.  ही पहिलीच वेळ होती जेव्हा यूजर्स सफारी किंवा अॅपल मेल व्यतिरिक्त ईमेल आणि ब्राउझिंगसाठी डीफॉल्ट अॅप्स सेट करू शकत होते.  पण अँड्रॉइड यूजर्ससाठी ही गोष्ट फार जुनी आहे.

Wifi Updates

अॅपलचं ‘वायफाय अपडेट्स’ फीचर माहितेय, ज्याच्या मदतीने यूजर्स वायफायद्वारे त्यांचा फोन अपडेट करू शकतात. अॅपलने हे फिचर तेव्हा लॉन्च केलं जेव्हा इंटरनेटचा स्पीड खूप स्लो असायचा. परंतु अँड्रॉइड यूजर्ससाठी हे फिचर फार कॉमन आहे.  

आता एवढं सगळं बघून माझ्यासारखे अँड्रॉइड यूजर्स जरा सुखावले असतील कि, ‘चलो हमारे पास अॅपल नहीं है  तो क्या हुआ, उसका भी बाप है’. नुसतं लाखा- लाखाचे फोन असून काय उपयोग फिचर तर आपलेच कॉपी केलेले आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.