आरंभ है प्रचंड या गाण्यामागचा गर्दीचा हा किस्सा..

आरंभ है प्रचंड बोले मस्तको के झुंड
आज जंग की घडी की तुम गुहार दो
आन बान शान या के जान का हो दान
आज एक धनुष्य के बाण पे उतार दो….

हे गाणं भारतभरात तरुणाईच्या ओठांवर कायम दिसून येतं अगदी तोंडपाठ, कॉलेज काळात, निवडणुकांच्या वातावरणात, कोणाच्या बड्डेला, कोणाच्या राजकीय नेत्यांच्या प्रचाराला तर कोणाच्या सकाळच्या व्यायामाला हे गाणं एकदम परफेक्ट फिट्ट बसतं. आजकाल तर जेलमधून कोणी सुटलं किंवा काहीही झालं तरी हे गाणं असतं म्हणजे असतं. या गाण्यात कॉलेजमध्ये निवडणुकांचं वातावरण दाखवलेलं आहे आणि तरुणांना प्रेरित करण्यासाठी ओळीसुद्धा त्याच तोडीच्या आहेत

जीस कवी की कल्पना में जिंदगी हो प्रेमगीत
उस कवी को आज तुम नकार दो….

तर या गाण्याचा विषय निघालाय म्हणल्यावर या गाण्याचा इतिहास सुद्धा आपल्याला जाणून घेणं भाग आहे. तर हे गाणं होतं गुलाल या सिनेमातलं. केके मेनन अभिनित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित हा गुलाल सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर गुलाल किती चालला सांगता येणार नाही पण यातली सगळीच गाणी सुपरहिट होती. तर गुलाल सिनेमाचं म्युझीक केलं होतं पियुष मिश्रा यांनी. पियुष मिश्रा यांनी तोवर सिनेमात गाणं लिहायला सुरुवात केलेली नव्हती.

अनुराग कश्यप आणि पियुष मिश्रा हे दोघे कॉलेज काळापासून एकत्र होते. अनुराग कश्यप सिनेमाकडे वळला आणि पियुष मिश्रा थिएटर करत राहिले. गुलाल सिनेमा अनुराग कश्यप करत होता आणि त्याला आपल्या सिनेमासाठी म्युझिक कोण देऊ शकतो म्हणून पियुष मिश्रा या आपल्या कॉलेज काळातील जिगरी मित्राची आठवण झाली. पियुष मिश्राला त्याने सांगितलं की तुला गुलालचं म्युझिक करायचं आहे.

तेव्हा पियुष मिश्रा म्हणाले मला गर्दीच्या ठिकाणी गाणी सुचतात. मग ते गेले मंडी हाऊसला जिथं चौकात भयंकर गर्दी असते. वाहनाची गर्दी, तरुण मुलं मुलींची गर्दी त्या चौकात कायम असायची. पियुष मिश्रा यांनासुद्धा हेच हवं होतं. मुंबईहून ते थेट मंडी हाऊसला जाऊन पोहचले. त्या गर्दीची प्रेरणा पियुष मिश्रा यांना प्रेरणा मिळाली आणि 7 दिवसात गुलालचे 8 गाणे लिहून आणि संगीतबद्ध करून पियुष मिश्रा यांनी अनुराग कश्यपपुढे सादर केले.

गाणी कंपोज करून झाल्यावर पियुष मिश्रा यांनी अनुराग कश्यपला फोन केला आणि सांगितलं की गुलालचे गाणे रेडी झाले आहेत तू ऐकायला ए. मग एकत्र जमल्यावर दारू बिरु पिऊन गाण्याला सुरवात झाली आणि एका रात्रीत गुलालचं म्युझिक हेच असणार असं अनुराग कश्यपने डन करून टाकलं. गुलालचे गाणे रेडी झाले आहेत म्हणत अनुराग कश्यपने त्या रात्री निम्म्या बॉलीवूडला आमंत्रित केलं होतं.

आजही गुलालचं आरंभ है प्रचंड हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्याची जादू कधीही उतरणार नाही इतकं जबरदस्त ते गाणं आहे.

जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो
मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यूँ डरें
ये जाके आसमान में दहाड़ दो…..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.