शाहरुख खानचे 8 पॅक खरंच आहेत की फोटोशॉप केलंय

यंदाचं वर्ष शाहरुख खानसाठी जरा वादग्रस्त ठरल्याचे दिसून येत. पहिलं म्हणजे मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात झालेली अटक. तर दुसरीकडे ४ वर्षांनी पठाण पिक्चरच्या माध्यमातून होणार कमबॅक अडचणीचं ठरतं आहे.

पठाण चित्रपटावरून वाद चांगलाच पेटलेला आहे. चित्रपटातलं बेशर्म रंग हे गाणं आणि गाण्यातला दीपिकाचा लूक हे या वादाचं कारण ठरत आहे. यात अजून एक चर्चा होतीये ती म्हणजे शाहरुख खानच्या बॉडीची. पठाण पिक्चरच्या ट्रेलर मध्ये शाहरुख खानचे ८ पॅक दिसत आहेत. यामुळे एक चर्चा रंगली आहे की, खरंच या वयात सुद्धा शाहरुख फिट आहे का ? किंवा तो फोटो एडिट करून टाकण्यात आला आहे.

 आगोदरच क्लियर सांगतो. शाहरुख खानच्या तगड्या फिटनेस मधील जो फोटो व्हायरल होत आहे ते सगळे फोटो खरे आहेत. म्हणजे फोटोशॉप करून ८ पॅक चिपकवण्यात आले नाहीत. 

याची माहिती खुद्द शाहरुख खानचा जिम ट्रेनरने दिली आहे.

मागच्या दोन दशकापासून प्रशांत सावंत हे शाहरुख खानचे जिम ट्रेनर आहेत.

सावंत यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,  मागच्या २४ वर्षांपासून मी त्याचा फिजिकल ट्रेनर आहे. शाहरुख कुठल्याही कामात असुद्या फिटनेस रुटीन आणि डायट फॉलो करतो. मात्र पठाण पिक्चरसाठी त्याने विशेष मेहनत घेतली.

कोरोनाच्या काळात त्याने फिट राहण्यासाठी आपला वर्क आऊट घेतला. त्या काळात तो जास्तीत जास्त वजन उचलत होता. त्यापूर्वी शाहरुख कार्डिओ वर्कआऊट करायचा. मात्र कोरोना काळात त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे तो चांगला आणि मोठा दिसू लागला. आता दिसतो तो शाहरुख होण्यामागे दोन वर्षांची मेहनत असल्याचे सावंत सांगतात.

तसेच शाहरुख अजून एक गोष्ट पाळतो म्हणजे त्याच्या आहार.

मागच्या दोन वर्षांपासून शाहरुखच्या आहारात कॅलरी असणारे पदार्थ वाढले आहेत. जसे की, अंडांचा पांढरा भाग, मसूर सारखे पदार्थ त्याच्या जेवणात दररोज असतात. त्यांच्या खाण्यातील प्रत्येक गोष्ट मोजून देण्यात येत होती. आणि खाण्याचा वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. त्यावेळातच तो खात असायचा. त्यात फॅट, कॅर्ब, प्रोटीनचा समावेश होता.

मध्यंतरी त्याला दुखापत झाली होती. तरीही शाहरुख डेड लिफ्ट, पूल अप्स मारत होता. दुखापत झालेल्या पायावर त्याने बरेच काम केले आणि तो मजबूत केला. त्याच्यात शिस्त ही कौतकास्पद आहे.

कठोर परिश्रमामुळे शाहरुख वयाच्या ५७ वर्षी सुद्धा एवढा फिट आहे. कोरोना काळात शारीरिकच नव्हे मानसिक आरोग्य राखणे अवघड झाले होते. सगळे जण एकाच जागी अटकून पडल्यामुळे चिंतेत होते. मात्र शाहरुख खान ने या काळात शरीरावर बरीच मेहनत घेतली आणि त्यामुळे हे साध्य झालंय.

आठवड्यातून ५ दिवस शाहरुख वर्क आऊट करतो. दररोज साधारण १ तास २० मिनिटे तो वर्क आऊट करतो. अभिनया बरोबरच शाहरुख खान हा फिटनेससाठी ओळखला जातो.

– हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.