या पुण्याच्या पोरीने यंदाच्या रक्षाबंधनाला भावांसाठी गिफ्ट्सची सोय केलीय…
आज रक्षाबंधन. अजून किती वर्ष आपण ‘कूछ मीठा हो जाए’ म्हणत बहिणींना कॅडबऱ्या वाटत फिरणार? जरा हटके काहीतरी विचार कराय लागतोय भिडू.
आपल्या भारतीयांना खाण्या पिण्यापलीकडे आणि त्याहीपेक्षा गोडाधोडा पलीकडे इतर काही देण्याची पद्धत माहीतच नसतेय.
आता काय द्यायचं सुचत नाही हा प्रॉब्लेम आहे का? तर भावानो आम्ही सांगतो. आमच्याकडे लय ऑप्शन्स आहेत. त्यातल्या त्यात एक ऑप्शन तर हमखास चालणारा ऑप्शन आहे, बघा..
तो म्हणजे हँडमेड गोष्टी देण्याचा. कारण महिलांमध्ये हल्ली हँडमेड गोष्टी वापरायचं लय फॅड आहे.
त्यात पण कोणते प्रॉडक्ट वापरायचे? कोणते ब्रॅंड्स बघायचे तेही सांगतो.
हँडमेड कपडे किंवा शोभेच्या वस्तु सुद्धा हल्ली कॉमन झाल्या आहेत शिवाय हाताने इतरही बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात.
पण पुण्याची एक मुलगी आहे, ती तर हॅन्ड मेड साबण बनवते, एवढंच काय तर तिचा स्वतःच्या प्रोडक्ट्सचा एक ब्रॅंड सुद्धा आहे.
हा ब्रॅंड म्हणजे, Aर्क By Shivani: Beauty, Cosmetic & Personal Care प्रोडक्टसचा. हे प्रोडक्टस दिले की तुमची बहीण खुश होत्या हे फिक्स, खुल्ल चॅलेंज आहे आमचं.
आता जरा डीटेलमध्ये सांगतो की हा Aर्क ब्रॅंड नेमका काय आहे ?
वरती म्हटल्याप्रमाणे Aर्क By Shivani हा ब्रॅंड, पुण्यातल्या २५ वर्षांच्या शिवानी हांगे हिचा आहे. ब्रॅंडचं नाव ऐकलं किच आपल्याला हे प्रोडक्टसविषयी साधारण अंदाज येऊन जातो.
अर्क म्हणजे एक प्रकारचा रस, एक्सट्रॅक्ट ज्याचा वापर शिवानी आपल्या प्रोडक्टस मध्ये करते, नैसर्गिक साबण बनवण्याच्या प्रक्रियेत करते. अर्क या ब्रॅंडचे रेग्युलर सोप, बेबी सोप, व्हीप्ड सोप, कस्टमाईझ्ड सोप, बॉडी बटर, बाथ सॉल्ट, असे वेगवेगळे होममेड प्रोडक्टस आहेत.
शिवानीचं अख्खं बालपण पुण्यातच गेलं. ती लहानपणापासूनच क्रिएटिव होती. पुढे तिने लंडनला जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं. लंडनच्या किंग्स्टन विद्यापिठातून इनोवेशन मॅनेजमेंट आणि उद्योजगतेचं पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केलं आणि पुन्हा भारतात येऊन स्वतःचा बिझनेस सुरू केला.
लंडनला जाण्याआधी शिवानी हा बिझनेस फक्त छंद म्हणून करायची. पण लंडनमध्ये तिला बिझनेसविषयीचं एक व्हिजन मिळालं आणि इथे येऊन तिने हा बिझनेस प्रोफेशन म्हणून, एक करियर म्हणून करायला सुरवात केली.
घरी बिझनेसचं काही बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तिने स्वबळावर बिझनेस सुरू केला आणि वाढवला.
तिच्या सोप्स, बॉडी वॉश, बॉडी बटर अशा प्रोडक्टसच्या हॅम्पर्सना खूप जास्त मागणी असते आणि म्हणून रक्षाबंधन, दिवाळी, ख्रिसमस अशा सणावारांना हे हॅम्पर्स सगळ्यात जास्त विकले जातात.
आता या हाताने साबण बनवण्याला सुद्धा तीन वेगळ्या प्रोसेस आहेत, एक आहे मेल्ट अँड पोर, दुसरी आहे कोल्ड प्रोसेस आणि तिसरी असते हॉट प्रोसेस. एका साबणाचं फायनल प्रॉडक्ट बनवायला साधारण आठवड्याभराचा वेळ लागतो.
आता महत्वाची गोष्ट म्हणजे अर्क ब्रॅंडची स्पेशल गोष्ट किंवा आपल्या फायद्याची गोष्ट काय आहे तर हे सगळे प्रॉडक्ट नैसर्गिक आहेत, ह्यात जे रंग वापरले आहेत ते केमिकल लेस आहेत. जे कुठले प्रॉडक्ट आहेत ते सल्फेट फ्री आहेत.
हे प्रॉडक्ट डोळ्यात गेले तरी डोळ्यांना त्रास होत नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हे प्रॉडक्ट चालणारे असतात.
अजून एक भारी गोष्ट म्हणजे हे प्रॉडक्ट टिकतात खूप आणि लागतात कमी. म्हणजे रोजच्या वापरासाठी जरी वापरले तरी त्यांची क्वांटिटी फार लागत नाही. तुम्ही प्रवासात सुद्धा हे प्रोडक्ट्स सोयीने वापरू शकता.
https://instagram.com/arkbyshivani?igshid=YmMyMTA2M2Y= तुम्ही अर्कच्या इंस्टाग्राम पेजवरून वरील प्रकारची सर्व साबण ऑर्डर करू शकता.
आता तुम्ही म्हणाल इतके भारी प्रोडक्ट्स आहेत म्हणल्यावर पैसे पण भारी असणार.. पण नाही. तुम्हाला अतिशय स्वस्त दरात हे प्रॉडक्ट मिळतात, २०० ते ४०० रुपये बजेटमध्ये तुमचं काम होतंय.
तर आता फक्त किंमत कमी आहे म्हणून नाय तर क्वालिटी भन्नाट आहे म्हणूण Aर्क चे प्रॉडक्ट बहिणीला रक्षा बांधनाला गिफ्ट करायला विसरू नका.
हे ही वाच भिडू:
- घरात कामाला आलेल्या वेंधळ्या सुतारामुळे करोडोच्या बिझनेसची आयडिया सुचली.
- ‘चुंबक’ ब्रॅंडने आपलं नाव एवढं मोठं केलंय की या ब्रॅंडच्या गोष्टी विकत घेताना कोणी किंमत बघत नाही.