बिपीन रावत यांनी सांगितलेलं, गोरखामध्ये राहून जे काही शिकता आले ते कुठंही मिळालं नाही

तामिळनाडू मध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची एक धक्कादायक बातमी आली आहे. 

तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळलेय.  पण याही पेक्षा दुख:द बातमी म्हणजे, या  हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील होते असा दावा करण्यात आलेला आहे.  चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अशा पदावर ते रुजू होते.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिपीन रावत हे तेच बहुचर्चित सीडीएस जनरल आहेत ज्यांच्या प्रोफाईलच्या अनुषंगाने या पदाची निर्मिती करण्यात आली होती.  

प्राथमिक माहितीनुसार, कुन्नूरच्या घनदाट जंगल परिसरात अग्निशमन दलाच्या जागेवर हे  हेलिकॉप्टर कोसळलेय. त्या अपघातामध्ये गंभीर जखमीं झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच आपत्कालीन दल घटनास्थळी पोहोचल्याचे देखील वृत्त समोर आले आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते आणि ते एका कार्यक्रमाला जात होते अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये १४ लोकं होते आणि त्यात वरिष्ठ अधिकारी सामील होते. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र त्यात कोण-कोण सहभागी होते याची  माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.

मात्र काही माहिती समोर आली आहे कि, सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच इतर ९ जण आणि काही कुटुंबातील सदस्य तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कोसळलेल्या IAF Mi-17V5 helicopter मध्ये होते. 

सीडीएस जनरल रावत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेलिंग्टन आर्म्ड फोर्सेस कॉलेजमध्ये गेले होते. तेथून परतांना ते कुन्नूरच्या दिशेने येत होते. त्यांची पत्नी मधुलिका रावत, त्यांच्या संरक्षणाखाली तैनात असलेले पाच कमांडो आणि वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी, एक ब्रिगेडियर आणि एक लेफ्टनंट कर्नल हेही हेलिकॉप्टरमध्ये होते. कुन्नूरला पोहोचल्यानंतर सीडीएस दिल्लीला रवाना होणार होते.

तसेच, त्यात बिपीन रावत होते कि नाही याबाबत लष्कराच्या बाजूने अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र हा अपघात घडल्याचे मात्र त्यांनी ट्वीट त्यांनी केले आहे.  

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते ८० टक्के भाजलेले आहेत. त्या जळलेल्या अवशेषाखाली काही मृतदेहही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

कोण आहेत बिपीन रावत ????

जनरल बिपिन रावत, सेंट एडवर्ड स्कूल, शिमला तसेच पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासलाचे बिपीन रावत हे माजी विद्यार्थी आहेत.  इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे डिसेंबर १९७८ मध्ये त्यांना अकरा गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले होते, जिथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला होता.

ते नेहमी म्हणायचे की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं. 

बिपीन रावत भारताचे ‘चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ’ (सीडीएस) होते. हे पद जेंव्हा निर्माण केले जाणार होते तेंव्हा याच बरीच चर्चा झाली होती, तसेच या पदाच्या शर्यतीत अनेक वरिष्ठ अधिकारी होते. त्यातून बिपीन रावत यांची निवड झाली. 

 

 

English Summary:

An Indian Air Force (IAF) Mi-17V5 helicopter crashed near Tamil Nadu’s Coonoor having Chief of Defence Staff Gen Bipin Rawat and 13 others on board on December 8. A total of 14 people including Bipin Rawat, his wife, Defence Assistant, security commandos, and IAF pilots were on board the chopper, reported news agency ANI citing sources.

 

WebTitle: Army Helicopter crash at Coonoor news and update: Army helicopter with CDS Gen Bipin Rawat on board crashes in Tamil Nadu’s Coonoor. Details awaited

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.