लक्षात असुद्या अर्णब काय कच्च्या गुरूचा चेला नाही…

अर्णब गोस्वामींच पुर्ण नाव आहे अर्णब मनोरंजन गोस्वामी. त्यांच्या वडिलांच नाव मनोरंजन रजनीकांत गोस्वामी. आजोबांचे नाव रजनीकांत गोस्वामी.

त्यांचे आजोबा हे सुप्रसिद्ध वकिल होते. विशेष म्हणजे ते कॉंग्रेसचे नेते होते. अर्णब यांच्या आईचे वडिल आसामचे मोठ्ठे  राजकारणी, स्वातंत्रसैनिक होते. त्यांच नाव गौरिशंकर भट्टाचार्य. ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे लिडर होते. म्हणजे कॉम्रेड. म्हणजे डावे.

अर्णब यांचे वडिल मनोरंजन गोस्वामी हे आर्मीत होते. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. गुवाहटी लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव कॉंग्रेसच्या उमेदवाराने केला होता.

अर्णब यांच्या आई सुप्रभा गोस्वामी या नावाजलेल्या लेखिका आहेत. त्यांचे मामा सिद्धार्थ भट्टाचार्य हे आसाम मधील भाजपचे वरिष्ठ नेते आहेत.

थोडक्यात सांगायचं झालं तर अर्णब अशा कुटूंबातून येतात ज्या कुटूंबात कॉंग्रेस, मार्क्सवादी, भाजप अशा सर्व पक्षांच वातावरण होतं.

नुसतं वातावरणच नाही तर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करण्याची धमक त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना दाखवली होती अशा पार्श्वभूमीतून अर्णब येतात.

अर्णब यांचे वडिल आर्मीत होते. त्यामुळेच एका ठिकाणी अर्णब यांच शिक्षण झालं नाही. त्यांचा जन्म गुवाहाटीत झाला. १० पर्यन्तच शिक्षण दिल्लीत झालं, १२ वी त्यांनी जबलपूरमधून पुर्ण केली, त्यानंतर पदवीच शिक्षण त्यांनी हिंदू कॉलेज दिल्लीतून पुर्ण केलं पुढील शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं सेंट एन्टोनी कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं. केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेण्याचा सन्मान देखील त्यांनी मिळवलेला आहे.

परिवार आणि शिक्षण यात टॉपला असलेल्या अर्णब यांची करियरबद्दल देखील तशीच गरुडझेप आहे. अत्यंत हूशार असणाऱ्या या माणसाची सुरवात टेलिग्राफमधून झाली. कोलकत्ता येथे ते काम करत होते. पण त्यांच प्रेम दिल्लीवर अधिक होतं.

अर्णब कोलकत्ता सोडून दिल्लीत आले.

दिल्लीत ते जिथे काम करू लागले त्या चॅनेलच नाव होतं NDTV.

आहे का? किती हा विरोधाभास. अर्णब NDTV त फक्त काम करत नव्हते तर NDTV चा प्रमुख कणा होते. NDTV ते वरिष्ठ संपादक म्हणून राहिले आहेत.  2006 साली टाईम्स नाऊ मध्ये जाण्यापुर्वी ते NDTV मध्ये वरिष्ठ संपादक होते.

NDTV ने त्यांना ओळख दिली. पत्रकारतेच्या क्षेत्रात वरिष्ठ संपादक या पदापर्यन्त घेवून जाणं त्याच काळात NDTV च एक अस्तित्व तयार करणं यासाठी अर्णब गोस्वामींना श्रेय दिलं जातं. आत्ता गंम्मत म्हणजे, मध्यंतरी आपल्या रिपब्लिक चॅनेलमधील चर्चेत काय झालं तर एक पाकिस्तानी महिला अर्णबला NDTV च्या संदर्भातून माहिती देत होती.

तेव्हा अर्णब म्हणाला,

NDTV नावाचा चॅनेल आहे का? मला माहित नाही असा कोणता चॅनेल आहे.

2006 पासून अर्णब गोस्वामी टाईम्सनाऊ साठी काम करु लागले. अर्णबने टाईम्स नाऊला काय दिले तर टाईम्स नाऊला अर्णबने देशातला सर्वाधिक TRP असणारा इंग्लिश चॅनेल बनवून दाखवलं. याचं पुर्ण श्रेय अर्णबला जातं.

न्यूज हॉर नावाच्या कार्यक्रमातून त्याने सर्वाधिक TRP गोळा केला. अस सांगण्यात येत की तेव्हा चॅनेलच्या टोटल रिव्हेन्यू पैकी 70 टक्के रिव्हेन्यू एकट्या अर्णबच्या चॅनेलमधून निघायचा.

टाईम्सनाऊ मध्ये असताना अर्णबची एक वेगळी ओळख झाली. इंग्रजी भाषेच्या पलीकडे जावून अर्णबला ओळख मिळाली. तो समोरच्याला भिडभाड न ठेवता प्रश्न विचारू लागला. अंगावर धावून जावू लागला.

पण याच्यात राजकारण नव्हतं, त्याची स्वतंत्र शैली म्हणून ती विकसित होवू लागली. फरवेज मुर्शरफ, नरेंद्र मोदी, इंग्लडचे माजी पंतप्रधना गॉर्डन ब्राऊन, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजई, दलाई लामा अशा प्रत्येकास थेट प्रश्न विचारण्याच धाडस अर्णबने दाखवलं होतं.

लक्षात राहण्यासारखी त्याची मुलाखत म्हणजे २०१४ साली त्याने घेतलेली राहूल गांधी यांची मुलाखत.

राहूल गांधींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला पहिला इंटर्व्हू द्यायचं निश्चित केलं. त्यासाठी त्यांनी कार्यक्रम निवडला तो फ्रॅन्कली स्पिकिंग विथ अर्णब. संपुर्ण इंग्लिशमधून झालेल्या मुलाखतीतून राहूल गांधीचा पुर्ण बाजार उठवण्याच काम अर्णबने केलं.

त्यानंतर तो वेळोंवेळी भाजपकडे झुकल्याचा दावा करण्यात आला. तशाप्रकारची टिका त्याच्यावर करण्यात आली.

अर्णबचे नक्की काम सांगायचं झालं तर अर्णबने २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सलग २६ तास एँकरिंग केलं आहे. त्यामध्ये त्याने २०० हून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. २६/११ च्या घटनेनंतर ६५ तासांची त्याने रिपोर्टिंग केली आहे.

अर्णबने न्यूजरुममधल्या राजकारणाला कंटाळून स्वत:चा रिपब्लिक चॅनेल सुरू केला. त्यानंतर तो पुर्णपणे उजवीकडे झुकल्याची टिका होवू लागली. त्याच्या डिबेट एकांगी होवू लागल्या. लोकांना बोलू न देण्याबद्दल तो प्रसिद्ध होवू लागला. स्वत:च्या चॅनेलमध्ये त्याने स्वत:चे नियम लावून घेतले. चर्चेसाठी येणाऱ्या लोकांना नेशन वॉन्ट्स टू नो म्हणत तो ओरडू लागला.

आत्ता चॅनेल म्यूट करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली. बहुआयामी असणारा अर्णब आत्ता एका चौकटीत अडकून बसला इतकंच..

नेशन वॉन्ट्स टू नो च्या पाठीमागचा किस्सा..!

अर्णब आपल्या एका मुलाखतीत सांगतो जेव्हा मी वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती घ्यायचो तेव्हा माझ्या लक्षात यायचं की माझ्याहून अधिक मोठ्ठे पत्रकार मुलाखती घेत आहेत. अशा वेळी समोरचा नेता माझ्यासमोर का बोलेल.

अर्णब वॉन्ट्स टू नो अस विचारलं तर तो बोलणार नाही. एकदा मी प्रफुल्ल पटेल यांची मुलाखत घेत होतो तेव्हा माझ्याकडून त्यांना विचारण्यात आलं नेशन वॉन्ट्स टू नो. अर्णबला त्याचीच लाईन खूप आवडली व त्याने ती कंटिन्यू केली.

अर्णब या सर्वातून सुटू शकतो का?

बेसिक आहे पाठीमागे रसद नसताना अर्णब एखाद्या सत्ताकेंद्रावर तुडून पडण्याचं धाडस करणार नाही. त्याचा प्रवास पाहिला तर तो तितकाच राजकीय शहाणा असल्याचं दिसतं. आपल्या पत्रकारीतेचा राजकीय फायदा घेता येतो हे त्याला आत्तापर्यन्त कळालच आहे.

कायदेशीर रित्या तो कितपत यात अडकतो यापेक्षा महाराष्ट्रातलं राजकारण या निमित्ताने पेटवण्यात तो कितीपत यशस्वी होतो हे पाहणच आत्ता मनोरंजक ठरणार आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू. 

4 Comments
 1. mangesh pathak says

  I like such real news

 2. Shubham says

  Shevti ky gunegarch na
  Ksle gungan gatay
  Court sathi koni army person cha mulga politician cha mulga nahi only Gunegar
  Jyani case keli ahe, atmhatya keli tyan baddal pn bola ata 2 shabd changle hich apeksha
  JAI MAHARASHTRA

 3. Sushant Patil says

  अजून थोड्या जाहिराती हव्या होत्या.
  जाहिरातींमधून तुमचं आर्टिकल वाचन म्हणजे सत्वपरिक्षाच आहे

 4. Dr.B.V.PAGURE says

  Wow…,what an amazing person, he is..!
  Whats His crime in this case is that he dissected openly the “Haraamipanna” of the Tripod Uddhyastta Government…!
  The follow up of Palghar lynching and such “Deeds ” of these Three political parties and mainly calling Soliyaji by her Real Name…!
  But we common people of the Hindustan just know, ” Sattya Mev Jayate..!”

Leave A Reply

Your email address will not be published.