कोरोनाची दुसरी लाट वाढलीय आणि आरोग्य सेतूचं रेटिंग दिवसेंदिवस ढासळत चाललंय..

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संक्रमितांच्या आकड्यांबरोबर मृत्युच्या संख्येतही वाढ नोंदवली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्याची दुसरी लाट जास्त भयंकर असल्याचं म्हंटल जातय. अश्या परिस्थितीत देशभरात ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे.  लोकांना घरी बसल्याचे आवाहन केले  जात आहे.

मात्र या दरम्यान, गेल्या वर्षी  कोरोना व्हायरस संसर्गासाठी तयार केल्या गेलेल्या आरोग्य सेतू  या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅपची भूमिका कमी पडताना दिसत आहे. 

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करण्यास फायदेशीर 

आरोग्य व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे (एनआयसी) आरोग्य सेतु अ‍ॅप विकसित केले गेले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते.

जे  संक्रमित रूग्ण, हॉटस्पॉट क्षेत्र आणि इतर माहितीसाठी सुरू करण्यात आले होते. यामुळे कोरोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी बऱ्यापैकी मदत झाली.  

आरोग्य सेतू अ‍ॅप  अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही स्मार्टफोनवर डाउनलोड केले जाऊ शकते. जे ब्लूटूथ आणि जीपीएसच्या मदतीने कोरोना पॉझिटिव्ह लोकांबद्दल शोधण्यात मदत करते. यासाठी अ‍ॅप  इंस्टॉल होताच त्याला सर्व परवानग्या द्यावा लागतात, ज्यात आपला मोबाइल नंबर, ब्लूटूथ आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगसाठीचा जीपीएस डेटा वापरला जातो. यासोबतच ते रंगानुसार निर्देशण करते, जे हिरव्या आणि पिवळ्या कोडमध्ये आपल्याला जोखीत दर्शवितो. सोबतच आपल्याला सूचित करते कि, आपण या परिस्थतीत काय करावे. 

हॉटस्पॉट आणि संक्रमिताबाबत मिळत होता अलर्ट.. 

हे अ‍ॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल होताच युजरला आणि  ५०० मीटर ते १ किलोमीटरच्या आत संसर्गित रुग्ण आढळल्यास अलर्ट जारी करत होता. जे कालांतराने  अपडेट करून १० किमी पर्यंत करण्यत आले.  बाजारामध्ये किंवा कुठल्याही भागात संक्रमित रूग्णाच्या संपर्कात येताच फोनवर अलर्ट दिला जात होता.

यासोबतच एखाद्या संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आल्यावर लोक कोरोना विषाणूची लक्षणे देखील तपासत होती. ज्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळ्यास संबंधित कोरोना चाचणी सेंटरची माहिती देखील उपलब्ध करून देत असे.  अ‍ॅपमध्ये अज्ञात संक्रमित रूग्णांची माहिती मिळायची, ज्यामुळे लोकं सावधगिरी बाळगत होती.

नागरिकांकडून मिळाला चांगलाचं प्रतिसाद 

याचा उपयोग पाहता लोकांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला. लॉंचिंगनंतर ४० दिवसात ते जवळपास १० कोटी लोकांनी डाउनलोड केले. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी माहिती देणारे सरकारी अ‍ॅप आरोग्य सेतु अ‍ॅप एका महिन्यातच  जगातील टॉप १० डाउनलोड केलेल्या मोबाइल अ‍ॅप्सपैकी एक ठरले.

कालांतराने या अ‍ॅपच्या युजर्सची संख्या वाढत गेली. जी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवळपास १७ ते १८ कोटी होती. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील या अ‍ॅपची प्रशंसा केली होती.

परिस्थितीनुसार यात बदल केले गेले. कोरोना चाचणी केंद्राबरोबरच लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर यात लसीसाठी नोंदणी करणे देखील सोपे झाले. ज्यामुळे लसीकरणाला वेग आला. यासोबतच त्यात लसीकरण नोंदणी वेबसाईट  को- विन देखील इनबिल्ड करण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंदावली सेवा  

दरम्यान, मध्यंतरी  कोरोनाच्या संख्येत घट होत गेल्याने अनेकांनी आरोग्य सेतुकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर वापर होत नसल्याने हे अ‍ॅप मोबाईलमधून हटवून टाकले. तर अनेकांच्या मोबाईलमध्ये असले तरी ते अपडेट केलेले नाही. त्यामुळे संक्रमण वाढतच चालले आहे.

तांत्रिक बिघाडाची प्रकरणे आली समोर 

मध्यंतरी या  अ‍ॅपमध्ये डेटा तक्रारीच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या, ज्यानंतर सरकारने  माहिती (डेटा) प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये काही नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना तुरूंगवासाची तरतूदही करण्यात आली.  तसेच यात तांत्रिक बिघाडीची देखील प्रकरण समोर आली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मुंबईत राहणाऱ्या जितेंद्र यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मे २०२० मध्ये कोरोना सकारात्मक आढल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि  शासकीय नियमांनुसार क्वारंटाइन  ठेवण्याचे नियम पूर्ण केल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मे महिन्यानंतर देखील जवळपास ९ महिने ते अ‍ॅपच्या माध्यमातून सकारात्मक  असल्याचे सांगितले जात होते.  यामुळे जितेंद्रचे आर्थिक जीवन आणि वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम झाला.

युजर्सने नाराजी व्यक्त करण्यास केली सुरुवात 

अ‍ॅपच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जी १७ कोटीवरून १० कोटींच्या आत आली आहे. त्याचे रेटिंग पॉईंट देखील ३.९  वर आले आहेत जे गेल्या वर्षी ४.६ ते ४.७ वर गेले होते. यासोबतच या अ‍ॅपबाबत लोकांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे.

गुगल ऍपच्या रिव्हिव्ह सेक्शनमध्ये जर गेलं तर तिथे संजय शर्मा नावाचे युजर म्हणाले की,

त्यांच्या सोसायटीतील एका  कुटूंबाला संसर्ग झाला आहे, ज्याची माहिती या अ‍ॅपवर नव्हती, ब्लूटूथ चालू असतानादेखील याबाबत कोणताही अलर्ट जारी केला गेला नाही.ज्यामुळे त्यांनी या अ‍ॅपचा वापर टाळला.

तर अमित वर्मा नावाच्या युजरने सांगितले कि, हे  अ‍ॅप निरुपयोगी आहे. मी आणि माझी बायको दोघेही पॉझिटीव्ह आहोत, परंतु या अ‍ॅपमध्ये माझी बायको सुरक्षित असल्याचे सांगत आहे. तसेच स्कॅन केल्यानंतर देखील ती कोणत्या कोरोना संक्रमिताच्या संपर्कात असल्याचेही दाखवत नाहीये. यासोबतच हॉटस्पॉट क्षेत्राबाबतही ते अपडेट नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.  त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.