वर्गातल्या सगळ्यात हुशार मुलीने घरातल्या 7 जणांचा मर्डर केला होता…

प्रेमामध्ये जीव देणारे लय लोकं तुम्ही पाहिली, ऐकली असतील पण आजचा किस्सा आहे एका मुलीने प्रेम मिळवण्यासाठी 7 लोकांची हत्या घडवून आणली होती बाहेरच्या नाय तर घरातल्याच सात लोकांना तिने कायमचंच शांत केलं.

हा नेमका काय मॅटर होता तर लखनऊ मध्ये ही केस शबनम केस म्हणून ओळखली जाते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच एका महिलेला अपराधाबद्दल फाशी देण्याचा निर्णय घेण्यात येत होता आणि ती महिला म्हणजे शबनम. पण ही फाशी काही दिवसांसाठी टाळण्यात आली होती कारण तिचं डेथ वॉरंट अजून आलेलं नव्हतं. 

पण थेट प्रकरण फाशी पर्यंत गेलं होतं त्याला कारणीभूत शबनमने केलेलं कांड होतं.

लखनऊ मधील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूरच्या बावनखेडीमध्ये प्रियकर सलीमला सोबत घेऊन 15 एप्रिल 2008 रोजी मास्टर शौकत अलीची मुलगी शबनमने घरातल्या 7 जणांची हत्या केली होती. प्रेमात आडकाठी करत असल्याच्या कारणावरून हे हत्याकांड घडलं असं बोललं जातं.

या मृत व्यक्तींमध्ये शबनमचे वडील शौकत अली, आई हाश्मी, भाऊ अनिस आणि रशीद, वहिनी अंजुम, आते बहीण राबिया होते या सगळ्यांचे गळे कुऱ्हाडीने चिरले गेले होते तर पुतण्या अर्शची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

शबनम ही काही सिरीयल किलर वैगरे नव्हती, वर्गातली ती टॉपर विद्यार्थिनी होती. हे हत्याकांड घडल्यानंतर सगळा भारत हादरला होता. स्वतःच्याच घरातील 7 लोकांचा मर्डर करण्याचं धाडस एका महिलेत आलं कसं ? प्रियकराला मिळवण्यासाठी घरच्यांच्या जीवावर शबनम उठली अशा अनेक चर्चा घडू लागल्या.

पोलिसांनी शबनम आणि तिचा प्रियकर असलेल्या सलीमला अटक केली. 15 जुलै 2010 रोजी अमरोहा सेशन कोर्टमध्ये सलीम व शबमन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

पुढे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने देखील फाशीची शिक्षा कायम ठेवली. इतकंच काय तर दयेची याचिका मागितल्यावर त्या दोघांची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टात फेरविचार करण्याची मागणी केली तेव्हा शबनमची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आणि तिच्या प्रियकराच्या शिक्षेवर विचार करण्यात आला.

पण शबनमने केलेलं कृत्य जनसामान्यांना न पचणारं होतं त्यामुळे तिला फाशी देण्याचीच शिक्षा ठरली होती.  एका महिलेला फाशी देण्यात येणार ही स्वतंत्र भारताची पहिलीच घटना होती पण नंतर ती लांबणीवर पडली. या केसचं पुढे काय होणार याकडे सगळं लक्ष लागून आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.