तो दाढीवाला माणूस नेमका कोण आहे ज्याचं वानखेडे कनेक्शन सांगितलं जातंय.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यापासून महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांनी क्रूझवर पाडलेला छापाही खोटा असल्याचे म्हटले आहे. त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाही असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

या सगळ्या घडामोडीमध्ये एक ट्वीस्ट आलाय तो म्हणजे, ‘तो दाढीवाला माणूस कोण आहे’?

तपास यंत्रणेच्या पक्षातील तो दाढीवाला कोण आहे, त्याचा समीर वानखेडे यांच्याशी काही सबंध आहे, याचा तपास झालाच पाहिजे असं मलिक यांनी म्हणलं आहे.

मलिक ज्या दाढीवाल्या माणसाबद्दल बोलत आहेत त्याचं नाव आहे काशिफ खान. 

ते फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी आहेत. मलिक म्हणाले की, काशिफ खानवर देशात अनेक गुन्हे दाखल आहेत. काशिफ वानखेडेचा जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई झाली नाही. मलिकने काशिफवर मोठ्या प्रमाणावर पॉर्न रॅकेट चालवल्याचा आरोपही केलाय. 

काशिफ खानने कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन केले होते. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत या पार्टीत पोहोचला होता. काशिफची गर्लफ्रेंड रुक्मिणी हुड्डा हिचे बंदुकीसोबतचे काही फोटोही आहेत. तसेच या  काशिफला अनेकवेळा फॅशन शोमध्ये पाहिले गेले आहे.

नवाब मलिक यांचा आरोप आहे की, काशिफ खान एकदा तिहार जेलमध्ये देखील गेला होता. काशिफ खान जेव्हा भोपाळमध्ये एफ सलूनच्या उद्घाटनासाठी आला होता तेव्हा तो चर्चेत आला होता. यावेळी त्यांनी भोपाळच्या जनतेचे मोठं कौतुक केलं होतं.

समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने काशिफ खानला क्रूझवर जाण्याची परवानगी का दिली याची चौकशी एनसीबीने करावी, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, काशिफ खानवर ड्रग पार्टी आयोजित करणे, पोर्नोग्राफी रॅकेट चालवणे आणि सेक्स रॅकेट चालवणे असे आरोप आहेत.

 या अशिफ खानचा आर्यन खान प्रकारणाशी काय सबंध ?

आर्यन खान प्रकरणी नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे कि, मुंबई क्रूझ ड्रग पार्टीमध्ये दाढीवाला काशिफ खान फॅशन टीव्हीचा प्रमुख असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाच ड्रग माफिया समीर वानखेडेचा मित्र असून तो देशभर ड्रग्ज विकतो आणि सेक्स रॅकेट चालवतो. 

त्यांनी असेही सांगितले की, संध्याकाळी ६.२३ चा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मुंबई क्रूझ पार्टीत काशिफ खान आपल्या प्रेयसीसोबत डान्स करत होता. नवाब मलिक म्हणाले की, मुंबई क्रूझ पार्टीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यातलाच कार्यक्रम काशिफ खानचा देखील होता. 

तो भारतभारत अनेक कार्यक्रम आयोजित करतो, ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या देखील डील होत असतात.

याच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे काशिफ खानला बऱ्याच दिवसांपासून वाचवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, एनसीबीच्या अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितले की, मला काशिफ खानवर कारवाई करायची आहे, पण समीर वानखेडे मला थांबवत असतात आणि कारवाई करण्यास नकार देत असतात.

समीर वानखेडे आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर आरोप झालेल्या नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आपण अधिकृत माहितीशिवाय आणि परवानगी शिवाय काहीही केले नाही.

मलिक यांनी सांगितले कि, हे फोटो रात्री दोन वाजता हे फोटो माझ्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. फोटो पाठवणाऱ्या महिलेनेच मला ते सार्वजनिकरित्या पोस्ट करायला सांगितले. मलिक म्हणाले की, त्यांनी त्यांची सध्याची पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

आता ह्या काशिफ खानची चौकशी होणार कि नाही आणि झालीच तर काय कारवाई होऊ शकते हे पाहणे महत्वाचे ठरते. 

हे हि वाच भिडू : 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.