अपमानाचा बदला म्हणून स्मिता पाटीलने व्यावसायिक सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला

अभिनेत्री स्मिता पाटील आणि शबाना आजमी या दोघींचा रुपेरी पडद्यावर प्रवेश एकाच वेळी झाला. दोघींच्याही अभिनयाच्या बाबतीत काही साम्य स्थळे होते. दोघीही समांतर सिनेमाच्या अभिनेत्री होत्या. त्या दोघींचाही प्रवेश समांतर सिनेमा मधूनच झाला होता. दोघींचेही पालक सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले होते. शबानाचे वडील खेळताना गीतकार कैसे आजमी तर आई रंगभूमीवरील कलावंत होती. 

स्मिता पाटील चे वडील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते तर तिचे आई देखील बऱ्याच सामाजिक संस्थांसोबत जोडलेली होती. त्यामुळे दोघींवर संस्कार हे अभिनयासोबतच सामाजिक जाणीवांचे झाले होते. त्यामुळे दोघींची चित्रपटातील कारकीर्द ही जशी समांतर होती तशीच एकमेकींच्या स्पर्धक असल्याची देखील होती. 

दोघींमध्ये एक प्रकारचे कोल्ड वॉर होते. बऱ्याचदा मीडिया मधून त्यांच्या या सुप्त संघर्षाच्या बातम्या त्या काळात येत होत्या. शबानाने तर एकदा स्मिता बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील केली होती. नंतर तिने त्याचा कायम पश्चाताप होतो असे देखील सांगितले होते.

स्मिता पाटीलने कलात्मक चित्रपटातील आपला प्रवास चालूच ठेवला. 

लवकरच ती समीक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. शबाना आजमीने मात्र कलात्मक चित्रपटांच्या सोबतच व्यावसायिक चित्रपटातून अभिनय करायला सुरुवात केली होती. स्मिताला देखील व्यावसायिक चित्रपट काम करण्याची इच्छा होती; परंतु तिला तिच्या इमेज मुळे व्यावसायिक सिनेमा मिळतच नव्हते. हि खंत तिला कायम वाटत होती. 

१९७८ साली  सई परांजपे यांनी स्मिता पाटील कडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवले. बासू भट्टाचार्य निर्मित हा चित्रपट होता ‘स्पर्श’! स्मिताला स्क्रिप्ट खूप आवडले. तिला असे वाटले की यातील कविताची भूमिका तिला ऑफर होणार आहे. त्या पद्धतीने तिने त्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका कशी चांगली होईल याचा अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु एक दिवस अचानक तिला एका सिने मॅगझिनमधून असे कळाले की ती भूमिका शबाना आजमीला देण्यात आली आहे! 

स्मिता पाटील अर्थातच खूप नाराज झाली. ज्यावेळी तिला ही भूमिका तिला न देता शबानाला देण्याचे कारण कळाले त्यावेळी तिला जास्त वाईट वाटले. कारण सई परांजपे ने नकळतपणे स्मिता पाटील पेक्षा शबाना आजमी मध्ये जास्त कमर्शियल व्हॅल्यू आहे म्हणून ही भूमिका तिला ऑफर केली असे सांगितले होते. 

स्मिताला हा स्वतःचा अपमान वाटला. तिने त्याच क्षणी ठरवले की काहीही झालं तरी आपण देखील व्यावसायिक सिनेमात पदार्पण करायचेच आणि तिथे देखील यशस्वी होऊन दाखवायचे. 

स्मिता जिद्दी होती, करारी होती.

एकदा ठरवलं तर कितीही अवघड असले तरी ते काम करून दाखवायची जिद्द तिच्यात होती. आता तिच्या अस्तित्वाची लढाई होती. तिच्यात ‘कमर्शियल’ व्हॅल्यू नाही असे कॉमेंट तिच्याबद्दल केले गेले होते हे तिने खूप पर्सनली घेतलं.  

तिने ताबडतोब स्वतःमध्ये आमुलाग्र बदल केला. अनेक व्यावसायिक निर्माते दिग्दर्शकांना ते भेटत राहील आणि त्यातूनच तिने प्रकाश मेहरा यांचा  ‘नमक हलाल’ रमेश सिप्पी यांचा ‘शक्ती’ हे चित्रपट साईन केले. सई परांजपे च्या एका कमेंटने तिच्यातील स्फुल्लिंग चेतवले गेले आणि तिला कमर्शियल सिनेमात काम करायला प्रेरित केले!

स्मिता पाटील ने कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांची योग्य सांगड घालत पुढची पाच ते सात वर्ष अभिनयाचे विविध रंग परीक्षांना दाखवली या काळात  एका बाजूला जेव्हा स्मिता पाटील बाजार, अर्थ, मंडी उंबरठा, अर्ध सत्य  सारखे कलात्मक  चित्रपट करत होती त्याचवेळी दुसऱ्या बाजूला तिल दर्द का रिश्ता, शराबी,गुलामी, बदले कि आग, आखिर क्यू, कसम पैदा करने वाले की असे तद्दन व्यावसायिक सिनेमे देखील करत होती.

अवघे ३१ वर्ष आयुर्मान लाभलेल्या आमी सिनेमाच्या दुनियेत केवळ १० वर्ष कार्यरत राहिलेल्या स्मिता पाटील ने भारतीय सिनेमा साठी फार मोठे योगदान दिले आहे. हिंदी सोबतच मराठी, बंगाली, कन्नड, गुजराती, आणि  मल्याळम या भाषांमधील चित्रपटातून स्मिता पाटील यांनी अभिनय केला!

भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.